कॉम्प्युटर माऊस – प्रकार आणि कार्य

स्क्रिनवर (Screen) दिसणाऱ्या पॉइंट वर जो बाणाच्या (Arrow) आकारने दर्शवलेला असतो त्यावर माऊस या हार्डवेअरचे नियंत्रण असते म्हणून माऊस ला पॉइंन्टिग डिव्हाईस (Pointing Device) असे म्हणतात. तसेच याचा लहान आकार व अधिक गतिने कार्य करतो म्हणून याला “माऊस” (Mouse) देखिल म्हणतात. कि-बोर्ड प्रमाणेच महत्त्वाचे इनपूट डिव्हाईस म्हणुन “¨माऊस” खुप प्रचलीत/प्रसिद्ध झाले. तसेच विंडोज 3.1 मध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस (G.U.I.- Graphical User Interface) म्हणुन ह्या इनपूट डिव्हाईसला प्रसिद्धी मिळाली.

computer mouse in marathi information

कॉम्प्यूटरमध्ये सिस्टिम व ऍ़पलीकेशन सॉफ्टवेअर (System & Application Software) मध्ये कार्य करत असताना विविध पर्याय (Options), मेनु व कमांडचा वापर करण्यासाठी माऊस चा इनपूट पॉइन्टिग डिव्हाईस म्हणून वापर केला जातो.

माऊसचे प्रकार | Types of Computer Mouse

पॉइन्टिंग डिव्हाईसचे प्रकार

मेकॅनिकल माऊस | Mechanical Mouse

पहिल्यादां कॉम्प्यूटरमध्ये मेकॅनिकल माऊस (Mechanical Mouse) चा वापर करण्यात आला. या प्रकाराचा माऊस हा वायरने सिस्टिम युनिट (System Unit/ C.P.U.) ला जोडलेला असतो. त्याच्या तळभागावरती बॉल (Boll) असतो जो गोलाकार फिरत असतो. याला हताळण्यासाठी सपाट किंवा सरळ पृष्ठभागाचा वापर करतात किंवा माऊस पॅडचा (Mouse Pad) वापर करतात. माऊस मधील बॉल द्वारे मॉनिटरवर (Monitor) दिसणाऱ्या पॉइंटरची (Pointer) दिशा ठरवण्यात येते.

बॉलच्या हलचालीप्रमाणे माऊस मधील मेकॅनिकल सेंन्सर्स म्हणजेच माऊसचे इलेक्ट्रॉनिक (Electronic) भाग त्या प्रकारचे सुचना किंवा सिग्नलस् (Signals) निर्माण करतो व सि.पी.यु. ला पाठवतो. त्यानूसार माऊस पॉइंटरची हलचाल होते. माऊस वर दोन किंवा तिन बटनस् असतात. या बटनांचा वापर वेगवेगळे ऑब्जेक्ट, पर्याय व कमांड निवडीसाठी केला जातो.

कीबोर्ड म्हणजे काय? प्रकार आणि कि कॅटेगरी

ऑप्टीकल माऊस | Optical Mouse

ऑप्टीकल माऊस (Optical Mouse) मध्ये बॉल ऐवजी लेझर (Laser) म्हणजेच प्रकाश किरणांचा वापर करण्यात येतो. यातील लेझर द्वारे माऊसची दिशा ठरविण्यात येते. माऊस जशी हलचाल करतो तशी लेझर प्रकाश किरणे त्याच्या हालचाली टिपतात व ते सी.पी.यु. ला पाठवतात. माऊसच्या होणाऱ्या हलचाली प्रमाणे माऊस पॉइंटची हालचाल होताना आपण मॉनिटर/स्क्रिन (Monitor/Screen) वर पाहतो. ऑप्टीकल माऊस हा एक नविन प्रकारचा माऊस आहे. ऑप्टीकल माऊसला सरळ पृष्ठभाग व माऊस पॅड ची आवश्यकता भासत नाही.

वायरलेस माऊस | Wireless Mouse

हा एक आधुनिक प्रकारचा माऊस आहे. वायरलेस या शब्दावरुन कळले असेल की याला जोडणीसाठी वायर/केबल ची आवश्यकता नसते. तर हा माऊस यातील बसवविलेल्या बॅटरीवर चालत असतो. सि.पी.यु. ला इंन्ट्रक्शनस् देण्यासाठी तो रेडिओ लहरींचा (Radio wave) उपयोग करतो. समजा एखादी कमांड तुम्ही कॉम्प्यूटरला दिली तर तो माऊस रेडिओ लहरींचा उपयोग करुन हवेतुन ती कमांड व इंन्ट्रक्शनस् कॉम्प्यूटरला देत असतो व त्यानुसार माऊस पाइंटर हलचाल करीत असतो. ट्रॅकबॉल, टच सरफेस आणि पॉइंटिंग स्टिक ही तीनही उपकरणे माऊससारखीच कार्य करतात.

माऊस बटन (Mouse Button)

माऊस व त्याच्या प्रकारानुसार त्यावर बटन ची रचना केलेली असते. माऊस वरती सर्वसाधारणपणे दोन किंवा तिन बटन असतात. यामध्ये लेफ्ट बटन (Left Button), राईट बटन (Right Button) आणि स्क्रॉलिंग बटन म्हणजेच व्हील बटन (Scrolling Button / Wheel Button) चा समावेश असतो.

माऊसचे बटन दाबणे याला क्लिकिंग असे म्हणतात. क्लिकिंग (Clicking) वडबल क्लिकिंग (Double Clicking) चा वापर करुन त्या संबधीच्या सुविधांचा वापर करता येतो.

mouse click behavior

1. लेफ्ट बटन (Left Button)

माऊसच्या डाव्या बाजुच्या म्हणजेच लेफ्ट बटन चा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्ट निवडता (Object Select)ªÉäiÉÉiÉ. यामध्ये टेक्स्ट, इमेज, ऑडिओ व अनेक प्रकारच्या ऑब्जेक्टचां समावेश केला जातो.

2. राईट बटन (Right Button)

एखादे ऑब्जेक्ट व त्यासंबधीचे पर्याय (Options) वापरण्यासाठी माऊसचे राईट बटन वापरले जातात. ऑपरेटिंग सिस्टिम व वेगवेगळ्या अप्लीकेशन मध्ये वेगवगेळ्या पर्यायासाठी माऊसचे उजव्या बाजुचे म्हणजेच राईट बटन आरक्षीत (Reserve) असते. यामध्ये वेगवगेळ्या पर्यायासाठी किंवा मेनुसाठी माऊसचे उजव्या बाजुचे बटन एकदा दाबणे व सोडणे (Ones Press & Release) याला राईट क्लिकिंग (Right Clicking) असे म्हणतात.

3. स्क्रॉलिंग बटन / व्हील बटन (Scrolling Button / Wheel Button)

डॉक्युमेंट मध्ये असलेले पेज खाली किंवा वर या स्वरूपात पाहण्यासाठी स्क्रॉलिंग बटन म्हणजेच व्हील बटन चा वापर केला जातो. व्हील बटन ज्या प्रमाणे फिरवला (Scroll) जातो त्या प्रमाणात पेज खाली किंवा वर या स्वरुपात स्क्रॉल होतो. तसेच काहि ऍ़प्लिकेशन मध्ये पेज झुम (Zoom) म्हणजेच मोठ्या स्वरुपात पाहण्यासाठी देखिल या बटनचा वापर केला जातो.

ऑब्जेक्ट सलेक्टींग ऍ़ण्ड ऑब्जेक्ट ऑप्शनस् (Object Selecting & Options)

1. क्लिकिंग (Clicking)

माऊसचे डाव्या किंवा उजव्या बाजुचे बटन (Left & Rigth Button)BEònùÉ दाबणे व सोडणे (Press & Release)ªÉɱÉÉ क्लिकिंग असे म्हणतात. यामध्ये डबल क्लिकिंग व राईट क्लिकिंग असे आवश्यकतेनुसार क्लिकिंग साठीचे पर्याय (Option) उपलब्ध असतात. याद्वारे त्या विशिष्ट कार्यासाठी त्या ऑब्जेक्टची निवड (Object Selecting) निश्चीत करता येते.

2. डबल क्लिकिंग (Double Clicking)

माऊसचे डाव्या बाजुचे म्हणजेच लेफ्ट बटन (Left Button) दोनदा जलद गतिन दाबणे व सोडणे (Dual Press & Release) याला डबल क्लिकिंग (Double Clicking) असे म्हणतात. डबल क्लिकिंग द्वारे त्या ऑब्जेक्टमध्ये म्हणजेच फोल्डर, फाईल्स् व प्रोग्राम मध्ये सरळ प्रवेश करता येऊ शकतो किंवा त्यासंबधीच्या सुविधा वापरता येतात.

3. राईट क्लिकिंग (Right Clicking)

माऊसचे उजव्या बाजुचे म्हणजेच राईट बटन (Right Button) एकदा दाबणे व सोडणे (Ones Press & Release) याला राईट क्लिकिंग (Right Clicking) असे म्हणतात. याद्वारे त्या ऑब्जेक्ट संबधीचे उपलब्ध विविध पर्याय/मेनु वापरता येऊ शकतात.

4. ड्रॅग आणि ड्रॉप (Drag & Drop)

माऊस पॉईंन्टर (Mouse Pointer)

मायक्रोसॉफ्ट विन्डोज ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये सर्वसाधारपणे खाली दिलेल्या माऊस पॉईंन्टरचा (Mouse Pointer)´ÉÉ{É®ú वेगवेगळ्या सुचना व संदेशासाठी (Instruction) केला जातो या साठी विशिष्ठ अश्या माऊस पॉईंन्टर प्रतिकांचा वापर केला जातो. माऊस पॉईंन्टरच्या दर्शका/चित्रानुसार यांचे कार्य चालु असतात किंवा यांच्या होणाऱ्या वापरानुसार यांचे वेगवेळ्या रुपामध्ये परिवर्तन होते. काही विशिष्ट ऍ़प्लिकेशनच्या कार्यानुसार माऊस पॉईंन्टर किंवा कर्सर यांच्या आकार व स्वरुपमध्ये बदल होत असतात.

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *