गूगल ड्राईव्ह काय आहे?

गूगलने सन 24 एप्रिल 2012 रोजी “गूगल ड्राईव्ह” सेवेचा प्रारंभ केला. गूगल क्लाऊड अर्थात क्लाऊड कॉम्प्युटिंग तंत्रज्ञावर आधारीत इंटरनेट सक्षम संगणक आणि मोबाईल डिव्हाईस वरती गूगल ड्राईव्हचा उपयोग करता येतो. विंन्डोज वेब ब्राऊजर, ॲन्ड्रॉईड ऍप तसेच मॅक ओ.एस. प्लेटफॉर्म वरती सहतेने वापरता येते.

वेब ऍप्लीकेशन क्लाऊड कॉम्प्युटिंगचा एक भाग आहे. या तंत्रज्ञानाद्वारे ऑनलाईन ऍप्लीकेशन वापरता येते, यामध्ये नविन फाईल तयार करणे, सुधारणा, संपादन, संग्रहन आणि इतरांसोबत सामायीक करता येते शक्य होते.

Basic of Google Marathi Tutorial
गूगल ड्राईव्ह काय आहे?

गूगल ड्राईव्ह काय आहे? | Google Drive Marathi Mahiti

गूगल ड्राईव्ह क्लाऊड कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानवार आधारीत सेवा आहे तसेच अनेक प्रकारच्या फाईल साठवण्याची आणि वापर करण्याची सुविधा प्रदान करते. गूगल ड्राईव्ह वरती फाईल साठवण्यासह फाईल एडिटींग, शेअरींग आणि डाऊनलोडिंग सारख्या सुविधा देखील उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.

जिमेल अकाऊंट असलेल्या वापरकर्त्याला 15 जि.बी. पर्यंत विनामुल्य साठवण क्षमता प्रदान केली जाते, तसेच 15 GB पेक्षा आधिक स्टोरेजसाठी शुल्क आकारला जातो. फोटोज, म्युजीक आणि व्हिडीओ संग्रह करण्यासाठी गूगल ड्राईव्ह एक प्रगत आणि अनेक सुविधा असलेली सेवा आहे.

संगणकाच्या हार्ड ड्राईव्ह वरती ज्या प्रमाणे फाईल आणि फोल्डर पद्धतीने डेटा साठवला जातो त्याप्रमाणे इंटेरनेट द्वारे गूगल ड्राईव्ह वरती डेटा साठवता जातो.

गूगल ड्राईव्हचा वापर कश्यासाठी केला जातो?

फाईल स्वरुपामध्ये डेटा संग्रहन आणि सिंक्रोनाइजेशन करण्याच्या उद्देशाने गूगल ड्राईव्हचा सर्वाधिक वापर केला जातो. गूगल वर्कस्पेस सह ऑफिस कार्यासाठी नि:शुल्क उपलब्ध असलेले डॉक, शिटस्, स्लाईड, ड्रॉईंग आणि फॉर्म अश्या वेब ऍप्लीकेशन द्वारे फाईल तयार करणे, त्या मध्ये सुधारणा करणे आणि इतर व्याक्तींसह सामायीक करण्यासाठी गूगल ड्राईव्ह उपयोगी आहे.

मोबाईल आणि संगणक डिव्हाईस मध्ये गूगल अकांऊट सह फोटोज, फाईल आणि इतर प्रकारच्या फाईल सहज अपलोड करुन उपयोगात आणली जाऊ शकतात. गूगलच्या इतर सेवा गूगल ड्राईव्ह सह संलग्न केलेल्या आहेत त्यामुळे गूगल ड्राईव्हचा उपयोग करणे सोयीस्कर आहे. वयक्तीक, व्यावसायीक आणि मोठ्या औद्योगिक संस्थामध्ये गूगल ड्राईव्ह सह गूगलच्या अनेक सेवांचा उपयोग केला जातो.

गूगल ड्राईव्ह आणि वेब ऍप्लीकेशन

गूगलच्या अनेक वेब ऍप्लीकेशन आणि सेवांचे एकत्रीत केलेली ठिकाण म्हणजे “गूगल वर्कस्पेस” होय. गूगलच्या एका अकाउंट द्वारे या सर्व सेवा एकत्रित आणि संलग्नतेने वापरता येतात. ऑफिस आणि दैनंदिन कार्यासाठी वापरली जाणारी काही सेवाची माहिती पुढील प्रमाणे …

गूगल वेब ऍप्लीकेशनप्रकारउपयोग
गूगल डॉक्सडॉक्युमेंटरिच टेक्स्ट डॉक्युमेंट तयार करणे, संग्रहन आणि संपादन करता येते.
गूगल शिटस्स्प्रेडशिटटेक्स्ट आणि गणितीय माहिती तयार करणे आणि त्या माहितीचे व्यावस्थापन करता येते.
गूगल स्लाईडप्रेझेन्टेशनवेगवगळ्या ऑब्जेक्टसह स्लाईड शो म्हणजेच प्रेझेन्टेशन तयार करता येतात.
गूगल फॉर्मफॉर्मफॉर्मस् सह अनेक प्रकारची माहिती संकलित करता येते.
गूगल ड्रॉईंगड्रॉईंगड्रॉईंग, ग्राफिक्स, चार्ट आणि डायग्रामची निर्मीती करण्यासाठी उपयुक्त वेब ऍप्लीकेशन.
गूगल साइटवेब पेजगूगल साईट द्वारे कोणत्याही कोडिंग शिवाय नि:शुल्क वेब साईट तयार करता येणारे प्लेटफॉर्म आहे.

गूगल ड्राईव्हची वैशिट्ये

  1. क्लाऊड स्टोरेज – गूगल ड्राईव्ह पुर्णपणे क्लाऊड स्टोरेज वर आधारीत आहे या वैशिट्यामुळे इंटरनेट सक्षम डिव्हाईस जसे संगणक किंवा मोबाईल वरती कोठेही आणि केंव्हाही डेटा व त्यासंबधीच्या सुविधा वापरता येतो.
  2. 15 G.B. निशुल्क स्टोरज – एका गूगल अकाऊंटसाठी एकुन 15 जि.बी. संग्रहण क्षमता नि:शुल्क उपलब्ध करुन दिलेली आहे. इमेल, फोटोज, व्हिडीओ सह इतर गूगलच्या फाईलचा यामध्ये समावेश होतो.
  3. ऑफिस सुट – गूगल डॉक, शिट, , फॉर्म सह संपुर्ण ऑफिस कार्यासाठी आवश्यक असलेले वेब ऍप्लीकेशन वापरता येते. तसेच नवीन फाईल तयार करणे, सुधारणा आणि समायीक करण्यासारख्या सुविधा सहतेने वापरता येतात.
  4. फाईल शेअरींग – गूगल ड्राईव्ह वरती असलेल्या फाईल इतर वापरकत्यांना सामायीक करण्यासह नियंत्रण, संपादन परवानगी आणि वापरण्याच्या मर्यादा नियंत्रीत करता येतात.
  5. सुरक्षा – गूगल ड्राईव्ह वर संग्रहीत डेटा सुरक्षित आणि नियंत्रीत पद्धतीने वापरता येतो. SSL (सिक्योर सॉकेट लेयर) सुरक्षेमुळे डेटा एन्क्रिप्ट स्वरुपात असतो ज्यामुळे डेटाचे वहन सुरक्षित पद्धतीने होते.
  6. डेटा बॅकअप आणि सिंक – संगणक आणि मोबाईल मध्ये असलेला डेटा वापरकत्याने दिलेल्या परवानगीनुसार आपोआप बॅकउप म्हणुन संग्रहित केला जातो. गूगलच्या “बॅकअप आणि सिंक” डेटाचा वॅकअप पुर्ण होतो त्यामुळे डेटा सुरक्षित ठेवण्यास मदत होते.
  7. मल्टी प्लेटफॉर्म – गूगल ड्राईव्ह डेस्कटॉप, मोबाईल आणि वेब सारख्या प्लेटफॉर्म वरती उपलब्ध आहेत.

गूगल ड्राईव्ह कसे वापरता येते?

गूगल ड्राईव्ह वापरण्यासाठी फक्त गूगलचे खाते असणे आवश्यक आहे. गूगलचे अकाऊंट कसे तयार करावयाचे? यासाठी तुम्ही “जिमेल अकाऊंट तयार करा 5 स्टेप मध्ये” या ट्युटोरीअलची मदत घेऊ शकता.

Google Drive

गूगल ड्राईव्ह ” https://drive.google.com/drive/my-drive ” या लिंक द्वारे उघडता येते परंतू त्यासाठी गूगल अकाऊंटमध्ये लॉग इन असणे गरजेचे आहे.

गूगल अकाऊंटमध्ये प्रवेश केल्यानंतर वरील चित्रामध्ये दर्शवल्या प्रमाणे “गूगल ड्राईव्ह” मध्ये प्रवेश करु शकता. गूगल अकाऊंटमध्ये प्रवेश करा. गूगल अकाऊंट मध्ये लॉगिन केल्यानंतर वरील चित्रामध्ये दर्शवल्या प्रमाणे “गूगल ड्राईव्ह” आयकॉनची निवडा करा. तुमच्या समोर “गूगल ड्राईव्ह” चा इंटरफेस दिसेल.

गूगल ड्राईव्ह आणि दृश्यघटके

संगणक वेब ब्राउजर मध्ये गूगल ड्राईव्ह जेव्हा उघडला जातो तेव्हा त्याचे इंटरफेस खाली दर्शवलेल्या इमेज सारखे दिसते. गूगल ड्राईव्ह मध्ये अनेक दृश्यघटक आहेत आणि यामध्ये आयकॉन, मेनु आणि कमांड त्यांच्या नावानुसार दर्शवलेली असतात. गूगल ड्राईव्ह मधील पर्याय आणि मेंनुचा वापर कसा करावा याचा संक्षिप्त माहिती दिली आहे.

Google Drive workspace
  1. न्यु बटन – नवीन फोल्डर आणि नवीन फाईल तयार करण्यासाठी “न्यु” बटन चा उपयोग होतो. तसेच संगणक आणि मोबाईल मधील फोल्डर आणि फाईल अपडोल करण्यासाठी या पर्यायाचा वापर होतो.
  2. मेन्यु – गूगल ड्राईव्ह मधील डेटा मेन्यु आंतर्गत येणा-या पर्यायाद्वारे वापरता येतो.
  3. वर्गीकरण – गूगल ड्राईव्ह मध्ये असलेले फाईल आणि फोल्डर प्रकार, व्याक्ती, संपादन दिनांक आणि लोकेशनुसार क्रमवार पद्धतीने पाहण्यासाठी “शॉर्” पद्धतीने पाहता येतो.
  4. लेआऊट – फाईल आणि फोल्डर यांचे आयकॉनची मांडणी “लिस्ट लेआऊट” आणि “ग्राईड लेआऊट” पद्धतीने मांडता येते.
  5. सर्च – गूगल ड्राईव्ह मधील फाईल आणि फोल्डर शोधण्यासाठी सर्च बारचा वापर होतो.

आपण काय शिकलात?


गूगल ड्राईव्ह क्लाऊड कॉम्प्युटिंग वर आधारीत गूगल क्लाऊड सह वेब ऍप्लीकेशचा वापर करणे, नविन फोल्डर, फाईल तयार करणे, अपलोड करण्याची सुविधा देते. गूगल ड्राईव्ह सह अनेक सेवा संलग्न केलेल्या आहेत यामध्ये गुगल डॉक, शिट, स्लाईड … अश्या अनेक वेब ऍप्लीकेशचा समावेश होतो. जिमेल, गूगल फोटोज सह एकुन 15 जि.बी. स्टोरेज निशुल्क वापरता येतो.

ब्लॉग विषयी तुमच्या प्रतिक्रिया किंवा सुचनांसाठी कृपया कमेन्ट बॉक्स द्वारे आवश्य कळवा. तुमच्या सुचनांचे सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *