वयक्तिक संगणकाचा विचार करता जास्तीत जास्त संगणक वर वापरली जाणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर निर्माता कंपनीची “विंडोज” ऑपरेटिंग सिस्टीम प्रथम क्रमांकासह सर्वात जास्त वापरली जाते.
मायक्रोसॉफ्टच्या “विंडोज” ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये वेगवेगळ्या घटकांची पद्धशीर संरचना, प्रतिके, आयकॉन स्वरुपात व ग्राफिकली रचनावार माहीती मुळे विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम इतर अनेक ऑपरेटिंग सिस्टिम च्या प्रमाणात वापरकर्तात्याला वापरणे सर्वाधिक सोयिचे जाते.
विंन्डोज ओएस आपण का वापरतो? काळानुसार त्यामध्ये झालेले बदल आणि वैशिष्ट्ये यांची माहिती संगणक वापरकर्ता या अर्थाने माहित असणे गरजेचे आहे.

विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमचा इतिहास आणि विकास
“विंडोज” या लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टीमची निर्मीती मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीने केली आहे. वयक्तिक संगणकामध्ये याचा सर्वाधिक वापर केला जातो. वापरकर्ताच्यी गरज आणि सोयीनुसार यामध्ये केलेले बदल विंडोजच्या आवृत्तीनुसार प्रस्तुत करण्यात आले. विंडोज OS ने प्रस्तुत केलेल्या आवृत्तीनुसार त्यामध्ये कोणते सुविधा आणि वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे? याची माहिती संक्षिप्त पणे देत आहोत.
1. विंडोज 1.0
- 20 नोव्हेंबर 1985 रोजी DOS OS आधारीत GUI वैशिठ्यासह मायक्रोसॉफ्टची पहिली “विंडोज 1.0” ऑपरेटिंग सिस्टिमवर प्रस्तुत करण्यात आली.
- विंडोज 1.0 चे कोडनेम “इंटरफेस मॅनेजर” असे होते.
- पेंन्ट, नोटपॅड, कॅल्युलेटर… सारखी मूलभूत अॅप्लिकेशन्सचा समाविष्ट यामध्ये करण्यात आलेला होता.
2. विंडोज 2.0
- 1987 मध्ये विंडोज 2.0 आवृत्ती प्रस्तुत करण्यात आली. या आवृत्तीमध्ये विंन्डोच्या व्यावस्थापन कार्यक्षमतेसह मध्ये बदल केले गेले.
- विंडोज 1.0 सह सुधारीत इंटरफेस आणि कार्यक्षमते मध्ये अनेक सुधारणा करण्यात आले.
- एकाचवेळी अनेक कार्य करण्याची क्षमता म्हणजेच मल्टीटास्कींग सुविधे सह मनोरंजनासाठी गेमस् समाविष्ट करण्यात आले.
3. विंडोज 3.0
- 1990 मध्ये विंडोज 3.0 प्रकाशित करण्यात आली ज्यामध्ये मल्टीटास्कींग आणि रंगित इंटरफेस सह अनेक नविन वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आलेला होता.
- डेस्कटॉप, आयकॉन, युझर इंटरफेस सह फाईल आणि फोल्डर व्यावस्थापनाच्या शैलीमध्ये प्रगत सुधारणांचा समावेश होता.
- विंन्डो व्यावस्थापन सह अद्यावत युझर इंटरफेस समावेश केला गेला होता.
4. विंडोज 95
- 1995 मध्ये अनेक नविन वैशिट्यासह 32 बिटला सपोर्ट करणारी “विंडोज 95” प्रस्तुत करण्यात आली. त्यामुळे सर्वाधिक वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टीम म्हणुन उद्यास आली.
- स्टार्ट मेनू, टास्क बार, आयकॉन आणि सुंदर अशी ग्राफिकल इंटरफेस मांडणीमुळे अल्पावधीत विंडोज 95 लोकप्रिय ठरली.
- इंटरनेट वापरण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर आणि सहज जोडता-काढता येणारे हार्डवेअर डिव्हाईस (Plug and Play – PnP) यामुळे डिव्हाईस वापरणे सहज साध्य झाले.
5. विंडोज 98
- विंडोज 95 सह अधुनिक सुधारणेसह वर्ष 1998 मध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज 98 ऑपरेटिंग सिस्टीम प्रस्तुत कली.
- वेगवान कार्य करण्याची क्षमता आणि स्थिरता, तसेच USB पोर्ट द्वारे सहज जोडता आणि काढता येणारे लवचिक सुविधे मुळे डिव्हाईस वापरणे सोयिचे झाले.
- इंटरनेट वापरण्यासाठी “इंटरनेट एक्सप्लोरर 4.0” आणि संगित एकणे व चलचित्र पाहण्यासाठी “विंन्डाजे मिडीया प्लेअर” ऍप्लीकेशन समाविष्ट करण्यात आले होतो.
6. विंन्डोज 2000
- वर्ष 2000 मध्ये मायक्रोसॉफ्टने व्यावसायिक केंद्रित NT (New Technology) तंत्रज्ञानावर आधारीत ऑपरेटिंग सिस्टीम प्रस्तुत केली.
- व्यावसायीक वापरकर्ते आणि सर्व्हर्स संगणकांना केद्रस्थानी ठेऊन विन्डोज 2000 ची कार्य आणि प्रकार नुसार वेगवेगळ्या आवृत्ती मध्ये उपलब्ध करुन दिलेली होती.
- सक्षम हार्डवेअर सपोर्ट, एनक्रिप्शन, वापरण्यास सुरक्षित आणि स्थिर, सोपे इंटरफेस असे अनेक वैशिष्ट्यांचा यामध्ये समावेश होता.
7. विंडोज एक्सपी
- वर्ष 2001 मध्ये प्रस्तुत करण्यात आलेली विंडोज एक्सपी त्याकाळाची शक्तिशाली आणि सर्वश्रेष्ठ ऑपरेटिंग सिस्टीम म्हणुन ओळखली जाते.
- विंडोज एक्सपी मध्ये “लुना” या नावासह नवीन आणि अद्यावत GUI प्रस्तुत करण्यात आले. सुंदर, सुटसुटित आणि वापरण्यास सोपे असलेले इंटरफेस म्हणुन सर्वाधिक वयक्तिक संगणकावर वापरले गेले.
- आंतरराष्ट्रीय भाषांचा समावेश, नेटवर्कींग आणि कंट्रोल पॅनलद्वारे अनेक नविन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेले होते.
8. विंडोज व्हिस्टा
- विंडोज व्हिस्टा 2007 मध्ये “ऍरो ग्लास” GUI सह प्रदर्शीत करण्यात आली. ऍरो ग्लास संकल्पनेवर आधारीत सुंदर आणि दिसायला पारदर्शक विंन्डो इंटरफेसचा वापर केलेला होतो.
- विंडोज व्हिस्टा दिसायला आर्कषक असली तरी रॅम आणि सिपीयुचा अधिक क्षमतेने वापर करते अशी टिका आणि मत काही वापरकत्यांचे होते.
- वापरकर्ता खाती नियंत्रण (UAC), कंट्रोल पॅनल आणि आयकॉन सह डायरेक्ट-एक्स 10 सुविधांचा समावेश केलेला होता.
9. विंडोज 8
- 2012 मध्ये स्टार्ट मनुचे स्वरुप लाईव्ह टाईल्स या GUI वर आधारीत OS प्रदर्शीत करण्याल आलेली होती.
- वयक्तिक संगणकासह टॅबलेटस् आणि टच स्क्रिन उपकरणावरती वापर करण्यास सक्षम असणारी OS होती.
- विंडोजची पारंपारीक OS पेक्षा याचा इंटरफेस पुर्णपणे वेगळा असल्या कारणाने वापरकर्त्यांना विंडोज 8 वापरणे अडचणीचे ठरले.
10. विंडोज 8.1
- 2013 मध्ये वापरकत्यांच्या वापर अनुभव याचा विचार करुन पारंपरीक OS मध्ये असलेले घटक जसे स्टार्ट बटन, मेनू आणि युजर इंटरफेसला परत पारंपारीक स्वरुप देण्याचा प्रयत्न केला गेला.
11. विंडोज 10
- 2015 मध्ये पारंपारीक स्टार्ट मेनुच्या सुविधेसह आधिक दर्जेदार डेस्कटॉप सह विंडोज 10 प्रस्तुत करण्यात आली.
- “कॉर्टाना” व्हाईस असिस्टंट, एज इंटरनेट ब्राऊजर आणि र्व्हच्युअर डेस्कटॉप सारख्या अनेक प्रगत वैशिष्ट्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला होता.
- विंडोज डिफेंडर ॲन्टीव्हायरस, फायरवॉल, डायरेक्ट एक्स 12 आणि नवीन फिचर अपडेट अपडेट सह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आले.
12. विंडोज 11
- 2021 मध्ये प्रदर्शीत करण्यात आलेली विंडोज 11 OS वापरकर्ता आकर्षक इंटरफेस सह आधुनिक सुविधासह प्रस्तुत करण्यात आली.
- स्टार्ट मेनू, टास्क बार, सर्च सुविधा, गेमिंग, थिम आणि वॉलपेपर तसेच दर्जेदार आणि वापरण्यास सोपी कार्यपद्धती विंडोज 11 चे मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
- एज इंटरनेट ब्राऊजर मध्ये शक्तिशाली कोपायलट AI असिस्टंटचा समावेश केला आहे. तसेच विजेटस् पॅनल, मायक्रोसॉफ्ट स्टोर, टच आणि व्हाईस इनपुट सारख्या नविन वैशिष्टांचा समावेश केलेला आहे.
📜 वाचनीय ब्लॉग ….
विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमची वैशिष्ट्ये | Windows OS in Marathi
विंडोज OS लोकप्रिय होण्यामागे अनेक महत्त्वाची आणि उपयोगी वैशिष्ट्ये कारणीभुत आहेत. वापरण्यास सोपी, कार्यक्षम, दृष्यघटके, सुरक्षा …. तसेच इतर अनेक प्रमुख वैशिष्ट्ये यांची अधिक माहिती विस्तृत पणे पाहणार आहोत.
1. जि.यु.आय.
जि.यु.आय. (G.U.I.-Graphical User Interface) वैशिष्ट्यामुळे मायक्रोसॉफ्टची विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम वयक्तीक संगणकावरती सर्वाधिक वापरली जाते. विंन्डो, बटन, मेनुंची माहीती किंवा सुविधा दर्शवण्यासाठी साठी चित्रमय घटकांचा वापर केलेला असतो. प्रत्येक ऑब्जेक्ट विशिष्ट प्रतिक म्हणजेच आयकॉन स्वरुपात ग्राफिकली रचनावार माहीती मुळे विंडोज वापरण्यास सोपी जाते.
2. डेस्कटॉप
विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम चे जि.यु.आय. इंटरफेस (G.U.I. Interface) पाहण्यासाठी किंवा वापरण्यासाठी डेस्कटॉप या केंद्रिय वैशिष्ट्याचा वापर करण्यात आलेला आहे. संगणक मध्ये असणारे वेगवेगळे पर्याय व संगणकातील महत्त्वाचे बदल (Changes) व ऍ़प्लिकेशनचा वापर करण्यासाठी जास्तीत जास्त विंडोज डेस्कटॉप वापरला जातो. डेस्कटॉपची सुटसुटीत ग्राफिकली रचनेमुळे संगणक अधिक कार्यकुशलतेने वापरता येते.
विंडोजच्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये स्टार्ट मेनू सर्व कार्यांचा केंद्र तसेच महत्वाचा घटक आहे. वापरकर्ता संगणकामध्ये असलेले ऍप्लीकेशन, फाईल, फोल्डर, सेटिंगस् आणि शोध सुविधांचा वापर करण्यासाठी स्टार्ट मेनुचा वापर करतो. विंडोजच्या आवृत्तीनुसार स्टार्ट मेनू अनेक सुधारणा होत गेले तसेच अनेक नविन वैशिष्ट्याचा यामध्ये समावेश होत गेला.
4. आयकॉन
आयकॉनस् हे विशिष्ट प्रकारचे ग्राफिक्स् म्हणजेच चित्र/प्रतिक असतात. आयकॉन द्वारे विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट व त्याचे कार्य ओळखले आणि वापरले जाते. आणि त्यामुळे साहजीकच विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये आयकॉन महत्त्वाच्या वैशिष्ठ्यामध्ये गणले जाते.
5. टास्कबार
विंडोज डेस्कटॉपच्या खाली असलेल्या लांब पट्टीला “टास्क बार” म्हणतात. टास्क बारवरती स्टार्ट मेनु, ऍप्लीकेशन आयकॉन, चालू असलेले ऍप्लीकेशन, नोटिफिकेशन, सिस्टीम ट्रे, दिनांक आणि वेळ…. अश्या अनेक पर्याय उपलब्ध असतात. संगणकावरती चालू असलेले प्रत्येक टास्क म्हणजेच कार्य टास्क बार वरती प्रदर्शीत केले जाते.
6. मल्टीटास्कींग
एका वेळेस अनेक प्रोग्राम वापरता येण्याच्या या वैशिष्ट्याला मल्टीटास्कींग असे म्हणतात. विंडोज ऑपरेटिंग सिस्टिममध्ये वापकर्ता आवश्यकते नुसार एका पेक्षा अधिक ऍप्लीकेशन एका वेळेस वापरु शकतो.
7. प्लग अँन्ड प्ले डिव्हाईस
प्लग अँन्ड प्ले हे विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम चे महत्त्वाचे वैशिष्ठ्ये मानले जाते. वेगवेगळ्या प्रकारचे प्लग अँन्ड प्ले डिव्हाईस (Plug and Play Device) संगणकाला सहज लावता व काढता येतात. उदा. पेन ड्राईव्ह व वेगवेगळे स्टोरेज डिव्हाईस संगणकच्या यु.एस.बी. पोर्टला (U.S.B. Port) सहजपणे लावता व काढता येतात. याद्वारे डेटाची देवाण-घेवाण सोप्या पद्धतीणे पुर्ण केली जाते.
8. सिस्टीम टुल्स् अँड प्रोग्रामस्
संगणक सुरक्षा, संगणक मध्ये निर्मान होणाऱ्या समस्या (Problems) यांच्या निवरणासाठी युटीलीज् किंवा सिस्टिम टुलस् वापरली जातात. विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये काही युटीलीज् उपलब्ध करुन देण्यात येतात ज्याचा वापरकर्ता गरजेनुसार वापर करतो. यामध्ये डिस्क क्लिनअप, डिस्क डिफ्रॅगमेंन्टल, ॲन्टी व्हायरस इं.
9. मायक्रोसॉफ्ट स्टोअर
विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम साठी ऍप्लीकेशन आणि गेम, डाऊनलोड आणि इन्स्टॉल करुन वापरण्यासाठी “मायक्रोसॉफ्ट स्टोर” वापरता येतो. तसेच मूव्हीज आणि म्युझिक देखिल मायक्रोसॉफ्ट स्टोर वरती उपलब्ध असतात.
10. विंडोज अपडेट
विंडोज अपडेट या सुविधेमुळे ऑपरेटिंग सिस्टीमसाठी गरजेचे सुरक्षा अपडेट, बग फिक्सेस आणि नविन वैशिष्ट्यांचा समावेश केला जातो त्यामुळे संगणकाची सुरक्षा आणि कार्यक्षमतेमध्ये सुधारणा केली जाते.
आपण काय शिकलात?
मायक्रोसॉफ्ट ने विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम चे वेगवेगळे प्रकार व आवृत्ती वापरकत्यांर्ना उपलब्ध करून दिलेली आहेत. विंडोजच्या प्रत्येक आवृत्ती नुसार ऑपरेटिंग सिस्टिमचा दर्जा व सुविधा अधिकाधिक दर्जेदार स्वरूपामध्ये उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये विंडोज 95, विंडोज 98, विंडोज एम.ई. व विंडोज 2000, विंडोज एक्स.पी. व्हिस्टा, विंडोज सेव्हन, विंडोज 11 ई. उपलब्ध आहेत.