आमच्या बद्दल

संगणक अध्ययन, संगणक शब्दकोश, संगणक व माहिती तंत्रज्ञान विषयीचे ब्लॉग… अश्या अनेक प्रश्नाचे उत्तर म्हणजे हे संकेतस्थळ! आपणास सोयीच्या व मातृभाषेमध्ये वापरता येणारे ज्ञानाचे व्यासपीठ… 

संगणक व माहीत तंत्रज्ञान विश्वातील ज्ञान क्षेत्रामध्ये होणा-या महत्वाच्या घडामोडी, व त्यासंबधीचे ज्ञान यामध्यमाने देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आमचा हा नेहमीचाच प्रयत्न राहीलेला आहे किं, संगणक आणि माहिती तंत्रज्ञाना विषयाशी संबंधित अद्यावत ज्ञान प्रदान करणे जे आपल्या साठी उपयोगी राहील. या ज्ञानमंच द्वारे संगणक आणि माहिती तंत्रज्ञाना विषयाशी संबंधित ज्ञान व अद्यावत माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे.

ज्ञानाच्या या व्यासपीठाचा वापर करून आम्ही तुम्हाला मोफत संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि भविष्यातही हे ज्ञान तुमच्याशी अशाच प्रकारे सामायिक करण्याची आशा बाळगून आहोत, अर्थात,आमच्या प्रयत्नांचा नेहमीच फायदा होईल आणि माहिती तंत्रज्ञान संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल.

केवळ संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात ज्ञान देणे हा आमचा उद्देश नाही, पुढे जाऊन या ज्ञानाचा वापर आपल्या जीवनात व्हावा अशी आशा आहे, आपण “संगणक साक्षर” म्हणून जगाशी परिचित आहात हे आम्ही पाहू आणि आपण या ज्ञानाचा “संगणक साक्षर” म्हणून वापर केला पाहिजे.

ई-मेल : [email protected]