हार्ड डिस्क

शब्दHard Disk
अर्थ / Meaningहार्ड डिस्क संग्रह साधन
वर्गीकरण संगणक संग्रह साधन
उपयोगसंगणक डेटा साठवणे (फाईल्स्, फोल्डर आणि ऍप्लीकेशन साठवण्यासाठी उपयोग)
वैशिट्येदुय्यम स्टोरेज डिव्हाईस, जलद गतीने डेटा साठवणे, कायमस्वरुपी संग्रहन माध्यम, सगणकाचे मुख्य संग्रहन साधन,

सेकंडरी स्टोरेज साधणांमधील महत्त्वाचे स्टोरेज साधण म्हणजे हार्डडिस्क (Hard Disk). हार्डडिस्क सिस्टिम युनिटच्या (System Unit) आत मध्ये घट्ट बसवलेली असते. म्हणुन याला फिक्स्ड डिस्क (Fixed) देखिल म्हणतात.

harddisk drive

हार्डडिस्क या सेकंडरी स्टोरेज साधणांमध्ये वेगवेगळी सिस्टिम व ऍ़प्लिकेशन सॉफ्टवेअर साठवलेली (Store) असतात. ज्यांचा वापर कॉम्प्यूटर चालु होण्यासाठी, ऑपरेटिंग सिस्टीम कार्यान्वीत करून कॉम्प्यूटर सिस्टीम वापरता येईल असे वातावरण तयार करण्यासाठी महत्त्वाचे असते. वापरकर्ता त्याच्या अनेक प्रकारच्या फाईल्स् व फोल्डर म्हणजेच डेटा हार्डडिस्क वर साठवत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *