संगणकाची संपुर्ण कार्य करण्याची प्रक्रिया इनपुट, प्रोसेस आणि आऊटपुट या तिन स्तरानुसार पुर्ण केली जाते. आऊटपुट म्हणजे काय? हा विषय समजुन घेण्यापुर्वी “इनपुट म्हणजे काय?” आणि “प्रोसेस म्हणजे काय?” या विषयाची माहिती असणे आवश्यक आहे.
आऊटपुट विभाग आणि आऊटपुट साधणे महत्वाचे माध्यम आहे, ज्याद्वारे संगणकाने प्रक्रिया केलेल्या माहितीचे अंतिम स्वरुप प्रदर्शीत करण्याचे कार्य करते. आऊटपुट साधणांचे प्रकार आणि त्यांचा कोणत्या कार्ययसाठी उपयोग होते? ” ” या ब्लॉगच्या माध्यमाने अभ्यासणार आहोत.

अनुक्रमनिका
आऊटपुट म्हणजे काय ? What is Output?
संगणकाने प्रक्रिया केलेली माहिती प्रदान करण्याच्या पद्धतीला आऊटपुट असे म्हणतात. डेटावर प्रक्रिया झाल्यानंतर तो डेटा मॉनिटर किंवा प्रिंन्टर सारख्या आऊटपूट डिव्हाईसचा वापर करून डेटाचे किंवा माहीतीचे अंतिम स्वरुप प्रदान करण्यात येते.
संगणक कोणत्या स्वरुपामध्ये आऊटपुट देतो त्या अनुषंगाने त्याचे दोन प्रकारामध्ये वर्गीकरण करण्यात येते.
- सॉफ्ट आऊटपूट – मॉनिटर द्वारे प्राप्त हाणारे आऊटपुट या श्रेणीमध्ये येते.
- हार्ड आऊटपूट – प्रिंन्टर द्वारे प्राप्त हाणारे आऊटपुट या श्रेणीमध्ये येते.
आऊटपुट विभाग काय आहे?
आऊटपुट युनिट किंवा विभाग संगणकाचे असे क्षेत्र असते ज्याद्वारे माहिती प्रदान करण्याचे कार्य पुर्ण केले जाते. आऊटपुट विभाग प्रदान करण्यात येणा-यासर्व माहितीचे व्यावस्थापन आणि नियंत्रण करण्याचे कार्य करतो.
आऊटपुट डिव्हाईस म्हणजे काय?
संगणकाने प्रक्रिया केलेली माहिती ज्या हार्डवेअर द्वारे प्रदान केली जाते त्यास आऊटपुट डिव्हाईस असे म्हणतात. संगणकला डेटा देणे, डेटा वर प्रक्रिया करणे व माहिती मिळवण्यासाठी विविध प्रकारच्या साधनांचा (Device) म्हणजेच हार्डवेअरचा (Hardware) वापर होतो किंवा केला जातो. या साधनांच्या समुहाला हार्डवेअर जरी संबोधले असले तरी यांच्या कार्यानुसार हार्डवेअर साधनांचे वर्गीकरण त्यांच्या कार्यानुसार विभागण्यात आलेले आहे.

आऊटपुट डिव्हाईसचे कार्य
आऊटपुट डिव्हाईसचे मुख्य कार्य संगणकाने प्रक्रिया केलेल्या माहितीचे अंतिम स्वरुप प्रस्तुत करणे असते. उदा. संगणक वापरकर्ता जेव्हा किबोर्ड द्वारे अक्षरे टाईप करत असतो तेव्हा टाईप झालेली अक्षरे अंतिम माहिती किंवा प्रक्रिया केलेली माहिती असते, जे मॉनिटर आपणास थेट प्रदर्शीत करत असतो.
अ.क्र. | आऊटपुट डिव्हाईस | डिव्हाईसचे प्रकार | डिव्हाईसचे कार्य |
---|---|---|---|
1 | मॉनिटर | डिस्प्ले युनिट | संगणक यंत्रणेवरील होणारे कार्य थेट प्रदर्शीक करणे |
2. | प्रिंन्टर | प्रिंन्टींग डिव्हाईस | डिजीटल डेटा भौतिक स्वरुपात कागदावरती प्रिंन्ट करणारे डिव्हाईस |
3. | स्पिकर | ऑडिओ आऊटपुट डिव्हाईस | डिजीटल ऑडिओ / ध्वनी तरंगे आावाजात रुपांतरीत करणारे आऊटपुट डिव्हाईस |
4. | प्रोजेक्टर | डिस्प्ले डिव्हाईस | चलचित्रे आणि व्हिज्ज्युअल आकाराने मोठ्या पदड्यावर प्रदर्शीत करणारे डिव्हाईस |
5. | प्लॉटर | प्रिंन्टींग डिव्हाईस | आकाराने मोठ्या प्रिंन्ट, सुक्ष्म आणि दर्जेदार प्रिंन्टींग साठी प्लॉटर वापरली जातात. |
आऊटपुट डिव्हाईसचे प्रकार

1. मॉनिटर
मॉनिटरला डिस्प्ले स्क्रिन किंवा V.D.U. म्हणजेच व्हिज्युअल डिस्प्ले युनिट देखिल म्हणतात. मॉनिटरच्या स्क्रिन वरती म्हणजेच दृश्यपटल वरती व्ह्जिुअल अगदी सुक्ष्म आणि असंख्य बिंदु रंगाच्या समुहाने निर्मीत होत असतात, याला पिक्सेल असे म्हणतात.
टेक्स्ट, इमेज, ग्राफिक्स तसेच व्हिडीओ पिक्सेल आणि रिझॉल्यूशन स्वरुपामध्ये दृश्य घटक प्रदर्शीत करतात. संगणकाद्वारे प्रक्रिया केलेली माहीती मॉनिटर वरती दृश्य स्वरुपात थेट प्रदर्शीत केली जाते, त्यानुसार संगणक वापरकर्ता सर्व माहिती पाहत असतो व समजुन घेतो आणि त्यानुसार कार्य करत असतो.
संगणक यंत्रणा आणि वापरकर्ता या दोन्ही मध्ये सचित्र इंटरफेस निर्मान करण्यासाठी मॉनिटर आवश्यक डिव्हाईस आहे. मॉनिटरच्या आकार आणि वैशिठ्यासह CRT, LCD, LED, OLED असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. संगणक वापरकर्ता आवश्यकता आणि अद्यावत तंत्रज्ञाच्या आधारे मॉनिटरची निवड करत असतात.

2. प्रिंन्टर
प्रिंन्टर संगणक यंत्रणेमधील हार्ड आऊटपुट डिव्हाईस आहे जो संगणक द्वारे उपलब्ध होणारी डिजीटल माहिती कागदावरती प्रिंन्ट करण्यासाठी वापरला जातो. डॉक्युमेंट, इमेज, चार्ट आणि ग्राफिक्स स्वरुपातील माहिती प्रिंन्टरच्या सहाय्याने कागद किंवा इतर सपाट माध्यमावरती छापाई करण्यासाठी वापरली जाते.
वयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही स्तरावर प्रिंन्टरचा वापर केला जातो. डॉट मॅट्रिक्स, इंकजेट, लेजर, थर्मल … असे अनेक प्रकार असलेले प्रिंन्टर वेगवेगळ्या हेतु आणि गरजेनुसार वापरली जातात.

3. स्पिकर
संगणक डिटीटल ऑडिओ सिग्नलस् ध्वनी मध्ये परीवर्तीत करणारे स्पिकर इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे. डिजीटल स्वरुपातील ध्वनी सिग्नलस् ऐकण्याससाठी याचा वापर होतो. मनोरंजन, शिक्षण, आणि अनेकदा ऑनलाईन संवादासाठी याचा वापर होतो.
संगणक, टिव्ही, मोबाईल, तसेच संगीत प्रणाली मध्ये याचा वापर केला जातो. वायर्ड, वायरलेस, होम थिएटर, साऊंडबार आणि स्मार्ट स्पीकर असे अनेक प्रकाचे स्पिकर गरजेनुसार निवडली जातात.

4. प्रोजेक्टर
प्रोजेक्टर आऊटपुट डिव्हाईस आहे ज्याद्वारे संगणक, मोबाईल, डिव्हीडी प्लेअर्स द्वारे प्राप्त होणा-या ऑडिओ-व्हिज्युअल माहिती मोठ्या आकाराच्या स्क्रिन किंवा पडद्यावर प्रदर्शित करण्याचे कार्य करतो. वेगवेगळ्या माध्यमाने प्राप्त होणा-या चित्रांच्या स्वरुपातील माहिती प्रोजेक्टर लेन्स आणि प्रकाश परीवर्तनाद्वारे मोठ्या भिंती किंवा पडद्यावरती प्रदर्शीत करतो.

5. प्लॉटर
प्लॉटर प्रिंन्टींग साठी वापरले जाणारे आऊटपुट डिव्हाईस आहे. उच्च रिझॉल्यूशन, आकाराने मोठ्या आणि दर्जेदार छपाईसाठी प्लॉटर प्रिंटींग डिव्हाईस वापरली जातात. प्लॉटर आकाराने मोठ्या असलेल्या ग्राफिक्स किंवा ड्राईगची अचुक आणि बारकाईने प्रिंन्ट करण्यास सक्षम असतात.
कागद, व्हिनाईल, प्लास्टीक अश्या अनेक प्रकारच्या पृष्ठावर प्लॉटरद्वारे प्रिंन्ट करता येते. संगणक, लॅपटॉप तसेच इतर प्रिंन्टीगसक्षम उपकरणां जोडुन त्याद्वारे प्रिंन्ट करता येते. व्यावासायीक संस्था, इंजीनियरिंग, आर्किटेक्चर आणि ग्राफिक्स डिजाइन प्रिंन्टींग कार्यासाठी केला जातो.
आपण काय शिकलात?
संगणक द्वारे कार्य केलेली माहिती प्रदान करण्याच्या पद्धीतीला आऊटपुट म्हणतात. आऊटपुट देणा-या संसाधनांना आऊटपुट डिव्हाईस असे म्हणतात. संगणकला आऊटपुट देण्यासाठी मॉनिटर, प्रिंटर सारख्या साधनांचा उपयोग करतो त्या साधनांना आऊटपुट डिव्हाईस म्हणजेच प्रदान साधने (Output Device) असे म्हणतात.