गूगल डूडल काय आहे? | गूगल 4 डूडल

गूगलला आज कोण ओळखत नाही? मोबाईल आणि संगणकामध्ये तर गूगल शिवाय इंटरनेटचे जगच शुन्य आहे. गूगल व त्यांच्या सेवा आपल्या सर्वांना परीचीत आहेत. इंटरनेटच्या या मायाजालामध्ये काहीही माहीती शोधयची असेल तर साहजीकच आपण सर्वजण गूगल सर्च वापर करतो.

Google Doodle marathi information

डूडल (Google Doodle in Marathi) काय आहे? हे माहीत होण्यापुर्वीची एक घटना मला चांगली आठवते. जेव्हा मी गूगल वर माहीती शोधत असताना गूगलच्या मुखपृष्ठ म्हणजेच होमपेजवरती गूगलच्या लोगो मध्ये काही बदल झालेले लक्षात आले. मनात शंका आली कि मी गूगल च्या वेबसाईड वरत सर्च करत आहे का? कुतूहल म्हणून त्या गूगल लोगो वर क्लिक करुन अधिक माहीती शोधल्यानंतर लक्षात आले कि हे गूगलचेच मुखपृष्ठ आहे आणि ह्या लोगो मध्ये जे बदल दिसत होते ते त्याला “डूडल” Doodle असे म्हणतात.

गूगलच्या लोगो मधील बदल तपासून पाहील्या नंतर असे लक्षात आले कि डूडलच्या या सुंदर अश्या कलाकृती मध्ये गूगल हे नाव समाविष्ठ केलेले होतो. तसेच या डूडल द्वारे खास संदेश देण्याचा प्रयत्न केलेला दिसत होता.

तर हे सर्व सांगायचा उद्देश हाच कि तुमच्या सोबतही हा प्रकार कधीतरी घडला असेलच. आणि घडला नसेल तरीही डूडल हा आजचा या लेखाचा विषय आहे. डूडल काय आहे? हे कोण बनवतो? याचा हेतू काय असतो? अशी बरीच प्रश्नांची उत्तरे व माहीती आज विस्तृत पणे या ब्लॉग मध्ये पाहणार आणि वाचणार देखिल आहोत. तर चला गूगलच्या जगा मधील डूडलच्या सफरीला…

नविनतम ब्लॉग – गूगल ट्रान्सलेट म्हणजे काय?

गूगल डूडल काय आहे? What is Google Doodle?

जेव्हा आपण गूगलची वेबसाईट उघडतो तेव्हा गूगल वेबपेजचा इंटरफेस आपल्या समोर येतो ज्याला आपण गूगलचे मुखपृष्ठ म्हणतो. मुखपृष्ठावर अनेक घटक असतात या पैकी गूगलचा लोगो जो सर्च बारच्या वर असतो तो अनेक वेळा रचनात्मक पद्धतीने प्रतिमा किंवा ॲनिमेशनद्वारे दर्शवलेला असतो. गूगल लोगोच्या बदललेल्या या स्वरुपालाच “डूडल (Doodle)” असे संबोधले जाते. डूडल हा तात्पुरता गूगलच्या लोगो मध्ये केला गेलेला बदल असतो. डूडल एका नश्चीत कालावधी साठी बदलला जातो.

गूगल डूडल संकेतस्थळ: https://www.google.com/doodles या संकेतस्थळावर गूगलने आजतगायत प्रसिद्ध केलेले सर्व डूडलची यादी दिलेली आहे.

डूडल चा हेतू काय आहे? What is Purpose of Doodle?

प्रसिद्ध व्याक्तींचे वाढदिवस, जयंती, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, उत्सव, एखाद्या व्यक्तीचा सन्मान व सण असे कोणताही विशेष प्रसंग हा डूडल चा विषय असतो. डूडल त्या प्रसंगानुसार सजवला जातो. “डूडल” हे विशिष्ट घटना व प्रसंगाचे प्रतिनिधित्व करते. अनेक वेळा डूडल हे प्रतिमा किंवा चलचित्र ॲनिमेशनच्या स्वरुपा मध्ये असतो.
भारतामध्ये साजरा केल्या जाणा-या उत्सवांचे डूडल आपण अनेक वेळा गूगल च्या मुख्यपृष्ठावर पाहीले असेल. स्वातंत्र्य दिन, महात्मा गांधी जयंती, दिवाळी याप्रमाणेच अशा अनेक भारतीय घटना व प्रसंग डूडलद्वारे शु-शोभित केलेल्या आहेत.

गूगल डूडल प्रत्येक वेळी वापरकर्त्याला विशीष्ठ दिवसांचे ज्ञान, त्या दिवसाचे औचित्य आणि नवीन अनुभव देत असते. डूडलच्या रूपात अनेकांनी आकर्षक डूडल पाहिले आहेत जे नेहमी वापरकर्त्याला आकर्षित करतात. देश आणि जग, आपल्या आजू-बाजूच्या घडामोडी , भूत-वर्तमान-भविष्य, मानवता, ज्ञान, कलात्मकता, योगदान अश्या कित्येक विषय डूडलच्या रूपात आपल्याला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पहायला मिळते. गूगल या डूडलच्या स्वरूपात विविध विषय आपल्या सोबत समायीक करत राहतो.

गूगल डूडल ची सुरुवात Starting of Google Doodle

30 ऑगस्ट 1998 रोजी गूगलने सर्वात पहीले गूगल-डूडल प्रदर्शित केले. गूगल चे संस्थापक लैरी पेज आणि सेर्गई ब्रिन यांनी नेवाडा येथील “बर्निंग मॅन फेस्टिव्हल” ला सहभागी होण्यासाठी गेले होते जो संगीत आणि कला महोत्सव होता. “Out of Office” म्हणजेच ऑफिस मध्ये उपलब्ध नाहीत हा संदेश गूगलच्या वापरकर्त्यांना आणि कर्मचाऱ्यांना देण्यासाठी त्यांना एक युक्ती सुचली.

google doodle marathi

Image Source: https://www.google.com/doodles/burning-man-festival

लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी गूगलच्या लोगोमध्ये काही बदल केले जे “बर्निंग मॅन फेस्टिव्हल“ वर आधारित होते. सणाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी Google लोगो मधील “o” या शब्दाच्या मागे काठीच्या आकारात एका व्याक्तीसारखे दिसणारे चित्र डिझाईन करण्यात आले. गूगलच्या लोगोमध्ये हा बदल म्हणजे गूगलचा संबधी काही समस्या आल्यास ते यासाठी उपलब्ध नाही असे सूचित करणारा संदेश होता आणि येथूनच डूडलची संकल्पना जन्माला आली.

29 ऑक्टोबर 1998 रोजी गूगलच्या संकेतस्थळावर दुसरे डूडल “Google Beta” प्रदर्शित केले. 26 नोव्हेंबर 1998 रोजी “Thnaksgiving 1998” या नावाने तिसरे डूडल प्रदशीत केले गेल. या प्रकारे गूगलने डूडलची एक मालिका प्रस्तुत केली.

डूडल सुरवातीच्या काळात केवळ एका चित्र पुरते मर्यादित होते. परंतू आगामी काळात जानेवारी 2010 मध्ये गूगल ने सर आयझॅक न्यूटन यांच्या जन्म दिवसानिमित्त त्यांचे पहिले ऍनिमेटेड डूडल जारी केले. डूडलच्या ऍनिमेटेड मालिकेची ती सुरुवात होती. तसेच मे 2010 मध्ये प्रसिद्ध गेम पॅक मॅन हा खेळ डूडलच्या स्वरुपात प्रस्तुत करण्यात आला. याचे वैशिठ्ये म्हणजे तो साधारण गेम सारखा खेळता येत असे. विविध प्रकारचे प्रोग्रामिंग, अॅनिमेशन, व्हिडिओ आणि विविध डिझाइन संकल्पनांचा वापर करून डूडल विस्तार होत गेला आणि अजून होत आहे.

डूडलर कोण आहे?

डूडलच्या निर्मात्याला डूडलर म्हणून संबोधण्यात येते. सर्वप्रथम डूडलर म्हणुन डेनिस हयांग यांना ओळखले जाते. सन 2000 मध्ये लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी फ्रान्स मध्ये साजऱ्या होणाऱ्या “बॅस्टिल डे” च्या स्मरणार्थ वेब मास्टर डेनिस हयांग यांना डूडल बनवण्यास सांगण्यात आले. डूडल तयार करण्यासाठी डिझायनिंग कौशल्या असलेल्या व्याक्तींची एक टिम तयार करण्यात आली आणि डेनिस हयांग यांची मुख्य डूडलर म्हणून नियुक्ती करण्यात आली.

डूडल डिझाइन करण्यासाठी डूडलरच्या टीमकडे आता ग्राफिक्स आणि ऍनिमेशन डिझायनर, चित्रकार, इंजिनीअर्स आणि अनेक कुशल प्रशिक्षित कलाकार आहेत. डूडल तयार करणे, डूडलचा विषय निवडणे, डिझाईन करणे असे सर्व डूडल संबधीत कार्य डूडलर टीम करते.

गूगल 4 डूडल स्पर्धा Google 4 Doodle Contest

भारतामध्ये 2009 पासून, Google ने शालेय विद्यार्थ्यांसाठी गूगल फोर डूडल “Google 4 Doodle” या नावाने एक स्पर्धाचे आयोजन करते. 1 ली ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धे मध्ये भाग घेता येते. विजेत्यांचे डूडल गूगलच्या मुख्यपृष्ठावर प्रदर्शित केले जाते तसेच शिष्यवर्ती आणि भेटवस्तू सुद्धा दिली जातात.


Google 4 Doodle Contest या स्पर्धे विषयक अधिक माहिती https://doodles.google.com/intl/ALL_in/d4g/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

10 डूडल गेम्स Top 10 Google Doodle Game

  1. Google Pac-Man Doodle Game
  2. Cricket Doodle Game
  3. Campion Doodle Game
  4. Magic Cat Academy 2016 & 2020
  5. Pony Express Doodle Game
  6. Google Rubik’s Cube Doodle Game
  7. Pangolin Love
  8. Doodle Music Games
  9. Halloween 2016
  10. Garden Gnomes
Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *