सॉफ्टवेअर म्हणजे काय? सॉफ्टवेअरचे प्रकार

वापरकर्त्यांनी दिलेल्या डेटा वर अंतिम प्रक्रियेसाठी काही सुचनेचे संच आणि त्यांचा वापर आवश्यक असतात आणि या सुचनांच्या संचाला सॉफ्टवेअर किंवा प्रोग्राम असे म्हणु शकतो. वापरकर्त्यांनी कॉम्प्यूटरला दिलेल्या डेटा व सुचनावर (Instruction) प्रक्रियेसाठी (Process) सॉफ्टवेअर आवश्यक असतात. वापरकर्ताने (User) दिलेल्या सुचना कॉम्प्यूटरने कश्या स्वरुपात हताळायाच्या हे सॉफ्टवेअर (Software in Marathi) ठरवित असतात.

सॉफ्टवेअर कसे कार्य करते?

वेगवगळ्या सुचनांचा संच म्हणजे सॉफ्टवेअर किंवा प्रोग्राम होत. जे कमांड व मेनुद्वारे सादर केलेली किंवा दर्शवलेली असतात. युझर कडुन मिळणाऱ्या डेटा व सुचनानुसार कॉम्प्यूटर कार्य करत असतो. डेटा (Data) व सुचना (Instruction) हार्डवअरच्या (Hardware) माध्यमाने कॉम्प्यूटरच्या सॉफ्टवेअरला पुरविले जातात. सॉफ्टवेअर ते डेटा व सुचना समजून त्याप्रमाणे कार्य किंवा प्रक्रिया करत असतात. कोणते डेटा व सुचना कोणत्या प्रक्रियेसाठी वापरायाचे हे सॉफ्टवेअर (Software) ठरवत असतात. ज्या प्रमाणे डेटा व सुचना मिळतील त्या प्रमाणे सॉफ्टवेअर्स आपले कार्य करत असतात.

कॉम्प्यूटर हार्डवेअर कोणत्या व कश्या पद्धतीने वापरायचे व त्यांचे नियंत्रण हे कॉम्प्यूटर मधील सॉफ्टवेअर किंवा प्रोग्रामवर अबलंबुन असते. सॉफ्टवेअर हे कॉम्प्यूटरच्या प्रत्येक पायरीवर (Step) काय व कोणते कार्य करायचे हे ठरवत असतात.

what is software in marathi mahiti

सॉफ्टवेअरचे प्रकार – Software Types in Marathi

सिस्टिम सॉफ्टवेअर – System Software in Marathi

वेगवेगळ्या हार्डवेअरचा समुह म्हणजेच कॉम्प्यूटर सिस्टीम होय. आणि या कॉम्प्यूटर सिस्टिमने कोणत्या पद्धतीने कार्य करावे हे सांगणाऱ्या सुचनांच्या संचाला सिस्टीम सॉफ्टवेअर असे म्हणतात. कॉम्प्यूटर सिस्टिम चालू करण्यासाठी सिस्टिम सॉफ्टवेअरची (System Software) आवश्यकता असते. कॉम्प्यूटर मधिल विविध हार्डवेअर व इतर ऍ़प्लिकेशन सॉफ्टवेअर (Application Software) हताळण्यासाठी सिस्टिम सॉफ्टवेअर वापरली जातात.

सिस्टिम सॉफ्टवेअर मध्ये विविध प्रोग्राम हे बॅकग्राऊंड प्रोग्रेस (Background Process) मध्ये चालू असतात जे  वापरकर्त्याला दिसत नाहीत. परंतु कॉम्प्यूटर सुरक्षीत पणे चालु ठेवण्यासाठीचे वातावरण या सिस्टिम सॉफ्टवेअर मार्फत निर्मान केले जाते. कॉम्प्यूटरचे सिस्टिम सॉफ्टवेअर हे युझर, डेटा, सॉफ्टवेअर प्रोग्राम व हार्डवेअर चे समन्वय व व्यावस्थापणाचे महत्त्वाचे कार्य करत असतात.

सिस्टिम सॉफ्टवेअरचा महत्त्वाचा प्रकार म्हणजे ऑपरेटिंग सिस्टिम होय. कारण डेटा व सुचना, तसेच हार्डवअर हे सिस्टिम सॉफ्टवेअर व त्यातील प्रोग्राम द्वारे चालवले (Operate) किंवा नियंत्रित केले जाते. सिस्टिम प्रोग्रामचे चार प्रकार पुढील प्रमाणे.

1. ऑपरेटिंग सिस्टिम – Operating System

सिस्टिम सॉफ्टवेअरचा ऑपरेटिंग सिस्टिम हा महत्त्वाचा भाग/प्रकार आहे. कॉम्प्यूटरच्या ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे डेटा, सुचना व हार्डवेअर यांचे कार्य/वापर नियंत्रित केले जातात. ऑपरेटिंग सिस्टिम मधील सॉफ्टवेअर हे युझर, प्रोग्राम व हार्डवेअर चे नियंत्रण व व्यावस्थापणाचे महत्त्वाचे कार्य करत असतात. विविध सिस्टीम प्रोग्राम व ऍ़प्लिकेशन चालू (Run) करून कॉम्प्यूटर व त्यासंबधीचे विशिष्ट वापर करण्यासंबधीचे वातावरण तयार करण्याचे कार्य ऑपरेटिंग सिस्टिम मार्फत करण्यात येते.

2. युटिलीटी प्रोग्राम – Utility Program

ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये अनेक युटिलीटी प्रोग्रामस् (Utility Program) उपलब्ध असतात. युटिलीटी प्रोग्रामस् चा वापर करून कॉम्प्यूटरला हानी पोहचवणाऱ्या घटकापासुन कॉम्प्यूटरचे रक्षण (Protection) केले जाते व सुरक्षा पुरवली जाते. युटिलीटीज् प्रोग्रामस्ना सर्व्हिस प्रोग्राम (Service Program) देखिल म्हणतात. यामध्ये अनेक प्रोग्राम ऑपरेटिंग सिस्टिम मध्येच उपलब्ध असतात. तसेच अनेक प्रकारचे युटिलीटी प्रोग्राम आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये ऍ़न्टी व्हायरस व त्यासोबत अनेक युटिलीटी प्रोग्राम उपलब्ध आहेत. याचा वापर करून वापरकर्ता कॉम्प्यूटर अधिक चांगल्या रीतीने व सुरक्षितपणे वापरू शकतो.

3. डिव्हाईस ड्रायव्हर्स – Device Drivers

कॉम्प्यूटर सिस्टिमला जोडलेली अनेक प्रकारची डिव्हाईस व हार्डवेअरच्या वापर, नियोजन व नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या सॉफ्टवेअर किंवा प्रोग्रामस्नां “डिव्हाईस ड्रायव्हर” असे म्हणतात. यामध्ये इनपुट, प्रोसेस व आऊटपुट डिव्हाईस किंवा हार्डवेअर कोणत्या व कश्या प्रकारे वापरायचे व नियंत्रण करायचे हे डिव्हाईस ड्रायव्हर्स (Device Drivers) मार्फत ठरवले जाते.

4. लँग्वेज ट्रान्सलेटरर्स – Language Translator

लँग्वेज ट्रान्सलेटरर्स (Language Translator) हे मानवी भाषेतील प्रोग्राम कॉम्प्यूटर प्रोग्राम मध्ये रुपांतर करण्याचे कार्य करतात. मानवी भाषेतील प्रोग्राम कॉम्प्यूटरच्या प्रोग्रामींग लँग्वेज मध्ये बदलण्याचे कार्य लँग्वेज ट्रान्सलेटरर्स (Language Translator) हे प्रोग्राम किवा सॉफ्टवेअर करत असतात. कॉम्प्यूटरला ते समजतील व तो त्या डेटावर प्रक्रिया करू शकतील अश्या स्वरूपात बदलत असतात.

सगंणकाचे एकक – बिट बाईट म्हणजे काय?

ऍ़प्लिकेशन सॉफ्टवेअर – Application Software in Marathi

ऑपरेटिंग सिस्टिम (Operating System) मध्ये नव्याने किवा आपल्या आवश्यतेनुसार ऍ़प्लिकेशन सॉफ्टवेअर ची भर टाकता येते. कॉम्प्यूटर सिस्टिम मध्ये नव्याने या ऍ़प्लिकेशन सॉफ्टवेअर ची भर टाकण्याच्या पद्धतीला “इन्स्टॉलेशन” करणे असे म्हणतात. ऍ़प्लिकेशन सॉफ्टवेअर (Application Software) हे अनेक सुचना व प्रोग्राम चा संच असतो. यामध्ये विविध ऍ़प्लिकेशन हे त्याचा कार्यावरून व वापरानुसार ओळखली जातात. या मध्ये बेसिक प्रोग्राम व स्पेशलाईल्ज प्रोग्राम या दोन प्रकारच्या सॉफ्टवेअर प्रोग्रामचा समावेश होते.

1. बेसिक प्रोग्राम – Basic Program

बेसिक प्रोग्रामस् यांना “जनरल परपज” (General Purpose) किंवा “प्रोडक्टिव्हिटी ॲप्लीकेशन” (Productivity Application) देखिल म्हणु शकतो. बेसिक प्रोग्राम मध्ये वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीटस्, प्रेझेंटेशन, डेटाबेस मॅनेजमेंट, वेब ब्राऊजर्स व इंटरनेट एक्सप्लोरर या सारख्या प्रोग्राम चा समावेश यामध्ये केला जातो.

या प्रकारमध्ये येणारे प्रोग्रामस् बेसिक किंवा टेक्स्ट प्रोससिंग प्रोग्रामस् म्हणुन ओळखले जातात. जे फक्त शब्दांवर प्रक्रिया करण्यासाठी वापरले जातात.

2. स्पेशलाईज्ड प्रोग्राम – Specialized Program

स्पेशलाईज्ड प्रोग्रामला “स्पेशल परपज ॲप्लीकेशन” (Special Purpose) असे म्हणतात. ग्राफिक्स् व इमेज एडीटींग, ऑडिओ व व्हिडीओ एडीटींग किंवा प्रासेसिंग साठी काही खास व उच्च तंत्रज्ञानाचा (Technology) वापर करून तयार केलेली प्रोग्रामस् या प्रकारमध्ये समाविष्ट केली जातात. स्पेशलाईज्ड प्रोग्राम चा वापर करून वेगवेगळे ग्राफिक्स् व इमेजची एडीटींग करता येते. लँग्वेज प्रोग्राम चा समावेश देखिल ऍ़प्लिकेशन सॉफ्टवेअर मध्ये होतो.

What is Software? FAQs – सामान्य प्रश्न

सॉफ्टवेअर किती प्रकारची असतात?

सॉफ्टवेअर मुख्यत: दोन प्रकारामध्ये वर्गीकरण करता येते यामध्ये सिस्टिम सॉफ्टवेअर आणि ऍ़प्लिकेशन सॉफ्टवेअर असे दोन प्रकार पडतात.

ऑपरेटिंग सिस्टिम Operating System काय असते?

संगणकाची कार्यकारी यंत्रणा (Operating System) जे संगणक सतत चालु ठेवण्यास मदत करते तसेच सॉफ्टवेअर व हार्डवेअर यांचे व्यावस्थापन व नियंत्रण सारखे महत्वाचे कार्य करते.

सॉफ्टवेअर काय असतात?

अनेक सुचना किंवा सुचनांचा संच म्हणजे सॉफ्टवेअर किंवा प्रोग्राम होत. थोडक्यात संगणकाने कश्या पद्धतीने व कोणते कार्य करावे यासाठीच्या सुचनांचा माध्यम म्हणजेचे सॉफ्टवेअर होय.

शेअर करा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *