रॅम मेमरी म्हणजे काय? प्रकार आणि कार्य

रॅम मेमरी डेटा संग्रहन करणारे महत्वाचे संगणक हार्डवेअर आहे. कॉम्प्युटर मध्ये डेटा सर्वप्रथम रॅम मेमरीमध्ये संग्रहन केला जातो म्हणून डेटा संग्रहन करणा-या साधना पैकि प्राथमिक संग्रहन साधन (Primary Storage Device) म्हणुन याचा उपयोग होतो. रॅम मेमरी (RAM Memory in Marathi) संगणकाच्या आंतर्गत असणा-या मदरबोर्डवरील खाच्यात घट्ट (Slote) बसवलेली असते म्हणुन रॅम मेमरीला इंटरनल मेमरी (Internal Memory) असे म्हणतात.

मदरबोर्डवरती रॅम बसवण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा आधिक अतिरीक्त रॅम स्लॉट उपलब्ध करुन दिलेल्या असतात. मदरबोर्ड वरती उपलब्ध असलेल्या प्रत्येक स्टॉलस् मध्ये रॅम मेमरी बसवला येते जणेकरुन संगणकामध्ये रॅमची कमतरता पुर्ण करता येते. मदरबोर्डवरील स्लॉटनुसार एकापेक्षा आधिक रॅमची संख्या सहज वाढवता येते त्यामुळे रॅम मेमरीला एक्सपांडेड मेमरी सुद्धा म्हणतात. तसेच रॅम खराब किंवा निकामी झाल्यास ते बदलता देखिल येते.

संगणकाची गती वाढवण्यासाठी अधिक कार्यक्षमता असलेल्या रॅम मेमरीचा उपयोग केला जातो. ग्राफिक डिझाईन, व्हीजुअल इफेक्टस (VFX), इमेज एडिटींग, कॅड (CAD), गेमिंग सारख्या संगणक ॲप्लीकेशन मध्ये डेटा अधिक प्रमाणात आणि वेगाने प्रक्रिया केला जातो. मोठ्या प्रमाणात डेटावर प्रक्रियेसाठी अधिक क्षमतेच्या रॅमची गरज असते म्हणुन वापरकर्ता उपयोग क्षमतेनुसार रॅमची निवड करतात.

रॅम मेमरीची कमतरता संगणकाच्या एकुन कार्यक्षमेवर परीणाम करत असते. डेटाच्या प्रक्रियेसाठी रॅमची संग्रहन क्षमता कमी पडत असेल तेव्हा संगणक कार्य करणे थांबवतो किंवा कार्य करण्यामध्ये व्यत्यय/अडथळा निर्मान होतो येतो ज्याला संगणक भाषेमध्ये हँग (Hang) होणे असे म्हणतात.

ram memory in marathi

रॅम मेमरी चिप अनेक इंटिग्रेटेड सर्किटचा (IC) समुह असतो. ट्रान्झिस्टर, कॅपेसिटर आणि रेसिस्टर सारख्या कंपोनंटचा वापर चिप वरती केला जातो. चिप एक प्रकारची सिलीकॉन ची पट्टी यालाअसते या पट्टीवर बोर्डवरती लहान जाडणी तार (Bus Connectors) कनेक्टर द्वारे अनेक घटकांची जोडणी केली जाते ज्याल बस असे म्हणतात. बसद्वारेच डेटाचे वहन होते.

रॅम मेमरी म्हणजे काय? – What is RAM Memory in Marathi?

रॅन्डम ॲक्सेस मेमरीचे (Random Access Memory) संक्षिप्त रुप रॅम (RAM) असे आहे. रॅम मेमरी डेटा आणि प्रोग्राम संग्रह (Store) करणारे कॉम्प्युटर हार्डवेअर आहे. रॅम मेमरी (RAM) डेटा वाचणे व लिहणे (Read and write) या दोन्ही क्रियांना सहाय्य करते. रॅम मेमरी मध्ये डेटा तात्पुरत्या (Temporary Storage) स्वरूपात साठवला जातो. म्हणजेच जो पर्यंत संगणक चालू आहे तोपर्यंतच रॅम मेमरी मध्ये डेटा सुरक्षित असतो. संगणक बंद केल्यावर अथवा विजप्रवाह खंडित झाल्यावर यातील डेटा नष्ट होतो अथवा पुसला (Erese) जातो.

माऊस, किबोर्ड… सारख्या हार्डवेअरद्वारे दिली गेलेली सुचना आणि टेक्स्टच्या स्वरुपातील माहिती प्रथम रॅम मेमरीमध्ये संग्रहीत केली जाते. सि.पी.यु. आवश्यकते नुसार रॅम मेमरी मधील माहिती प्रक्रियेसाठी स्विकारत असतो. रॅम मेमरीमधील माहिती वापरणे त्यामध्ये बदल करणे सि.पी.यु. ला सहज शक्य होते या गुणधर्मामुळे रॅमला लवचीक स्वरुपाची मेमरी देखिल म्हणतात.

Random Access Memory
RAM – Random Access Memory

संगणक चालू केल्यानंतर रॅम मध्ये सिस्टिम व ऍ़प्लिकेशन सॉफ्टवेअर (System and Application Software) कार्यान्वीत (Execute) आणि संग्रहीत केली जातात. संगणक जेव्हा बंद (Shut Down) केला जातो तेंव्हा रॅम मधील डेटा किंवा माहिती आपोआप पुसली जाते. म्हणून रॅम मेमरीला व्हॉलेटाईल मेमरी (Volatile Memory) म्हणजेच तात्पुरत्या किंवा अस्थिर (Temporary) स्वरूपाची मेमरी देखिल म्हणतात.

रॅम मेमरी वेगवेगळ्या आकार, प्रकार आणि क्षमते नुसार उपलब्ध आहेत. मदरबोर्ड वर रॅम स्लॉटची जशी रचना आहे त्यानुसार रॅम चा प्रकार निश्चीत केला जातो.

रॅम मेमरी कसे कार्य करते? – How to work RAM Memory?

संगणक सिस्टीम चालु होण्यापासुन ते बंद करे पर्यंत ऑपरेटिंग सिस्टीम आणि ऍप्लीकेशनच्या सुचना, प्रोग्राम आणि माहिती रॅम मध्ये साठवली जाते. संगणक सिस्टीम सतत चालू रहावी यासाठी रॅम मेमरी मार्फेत वातावरण निर्मान केले जाते, जेणेकरुन संपुर्ण संगणक प्रणाली सतत (Live) चालू असते ज्यामुळे वापरकर्त्याला ऍप्लकेशन मध्ये सहजतेने कार्य करता येऊ शकते.

सि.पी.यु. प्रक्रियेसाठी लागणारा डेटा रॅम मेमरीमधुन घेत असतो. रॅम मध्ये सुचना किंवा डेटा बिटच्या स्वरुपात संग्रहीत होत असतात. बायनरी बिटच्या स्वरुपात असलेला माहितीला डिजीटल डेटा असे म्हणतात. रॅम मेमरी मधील संग्रहीत डेटा कधीही स्थिर नसतो तो सतत बदलत असतो किंवा उपयोगानंतर नष्ट होत असतो या वैशिठ्यामुळे रॅम मेमरीला रॅन्डम ॲक्सेस मेमरी असे म्हणतात.

संगणक बंद केल्यानंतर रॅम मेमरीमधील सर्व डेटा पुसला जातो. संगणक परत चालु झाल्यानंतर रॅम मेमरी मध्ये पुन्हा नव्याने सिस्टिम व ऍ़प्लिकेशन (System and Application Software) लोड (Load or Save) अथवा संग्रहीत केली जाते. अश्या प्रकारे रॅम मेमरीचा वापर संगणक मध्ये केला होत असतो.

ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसर, इमेज इटेटिंग… सारखे अनेक ऍप्लीकेशनचा डेटा रॅम मेमरी मध्ये साठवला जातो. वापरकर्ता ज्या प्रकारे ऍप्लीशनचा वापर करतो त्यानुसार सिपीयु मध्ये संग्रहीत डेटावर प्रक्रिया करणे प्रारंभ करतो. संगणक वापरकर्ता एका वेळी अनेक प्रोग्राम वापरत असतो ज्याला संगणक भाषेमेध्ये “मल्टीटास्कींग” असे म्हणतात. मल्टीटास्कींग वापरण्याची सुविधा रॅम मेमरीमुळे शक्य होते.

संगणक वापरकर्ता त्याचे कार्य ऍ़प्लिकेशन द्वारे जेव्हा संगणकाच्या हार्ड डिस्कवर किंवा सेंकडरी मेमरी मध्ये साठवतो (Save) तेव्हा रॅम मधील कार्यरत माहिती किंवा डेटा सेंकडरी मेमरी मध्ये हलवले (Move) जाते. सेंकडरी मेमरी मध्ये साठवलेला डेटा कायमस्वरुपी (Non Voiletile) असतो ज्याचा आवश्यकतेनुसार वापरकर्ता केंव्हाही उपयोग शकतो.

Computer Secondary Memory in Marathi

संगणक मेमरी विषयीचे ब्लॉग…

रोम मेमरी म्हणजे काय? प्रकार आणि कार्य

सेकंडरी मेमरी म्हणजे काय?

रॅम मेमरीचे प्रकार – RAM Memory Types in Marathi

रॅम मेमरीचा आकार, क्षमता, उपयोग, अनुसार दोन मुख्य प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. रॅम मेमरीचे किती प्रकार आहेत? आणि त्यांची कार्यपद्धती तसेच कोणती मेमरी कश्यासाठी वापरली जाते याचे सविस्तर माहिती पुढील प्रमाणे दिलेली आहे.

RAM Memory Types
RAM Memory Types in Marathi Mathiti

1. एस. रॅम – (SRAM – Static Random Access Memory)

रॅमचा एक प्रकार म्हणुन स्टॅटिक रँन्डम एक्सेस मेमरी – एस. रॅम प्रचलित आहे. SRAM मध्ये डेटा सुरक्षीत राहण्यासाठी सतत विजप्रवाह चालू राहणे आवश्यक असते. काही कारणाने विजप्रवाह खंडित झाल्यानंतर यामधील डेटा पुसला जातो म्हणुन याला व्हॉलेटाईल किंवा तात्पुरती मेमरी असे म्हणातात. माहिती वाचणे आणि लिहणे (Read and Write) या दोन्ही क्रियांना SRAM सहाय्य करते.

स्थिर स्वरुपात असलेला संग्रहित डेटा रँन्डमली वापरणारी मेमरी अशी एस. रॅम व्याख्या करु शकतो. सिपीयु द्वारे सतत वापरला जाणारा डेटा SRAM मध्ये संग्रहित केला जातो. SRAM मध्ये डेटा फ्लिप फ्लॉप (Flip-Flops) तंत्राज्ञानाचा वापर करुन बायनरी बिटच्या (0 आणि 1) स्वरुपात संग्रहित होत असतो. स्टॅटीक रॅम मधील डेटाला सतत रिफ्रेश् होण्याची किंवा बदलण्याची अवाश्यकता नसते. SRAM मध्ये असलेला डेटा जोपर्यंत वापरला जात नाही तो पर्यंत डेटा तसाच राहतो.

आजच्या वयक्तिक संगणकामध्ये सि.पी.यु. चा घटक म्हणुन L1, L2, L3 अशी कॅशे मेमरीचे वर्गीकरण करु शकतो. L1 आणि L2 कॅशे मेमरी सि.पी.यु. एक भाग म्हणुन कार्य करत असतात तर L3 प्रकारच्या मेमरीचा समावेश मदरबोर्डवरती असतो. SRAM ही DRAM पेक्षा महाग असते तसेच वेगाने प्रक्रिया करण्यास सक्षम असतात.

2. डि. रॅम – (DRAM – Dynamic Random Access Memory)

डायनामीक रँन्डम एक्सेस मेमरीचे संक्षिप्त रुप डि. रॅम असे आहे. संगणकाची मुख्य (Main) आणि प्राथमिक मेमरी म्हणुन DRAM चा वापर होतो. सर्वसाधारण पणे वयक्तिक संगणकामध्ये DRAM रॅमचा वापर केला जातो. गतिमान परंतू अनियमीत स्वरुपात संग्रहित डेटा प्रदान करणारी किंवा वापरणारी मेमरी म्हणुन डि. रॅम मेमरीची व्याख्या करु शकतो.

सि.पी.यु. द्वारे रॅम मेमरी मधील माहितीचा वापर केल्यानंतर ति माहिती नष्ट होते किंवा त्यामध्ये बदल केला जातो. म्हणून याला Dynamic Random Access Memory असे म्हणतात. विजप्रवाह जो पर्यंत चालू असतो तो पर्यंतच यामध्ये डेटा ची प्रोसेसिंग होते विजप्रवाह खंडित झाल्यानंतर मात्र यामधील सर्व डेटा नष्ट होतो किंवा पुसला जातो.

डेटा साठवण्यसाठी रॅम चिप वरील ट्रान्झिस्टर आणि कॅपेसिटर सारख्या कंपोनंटचा उपयोग केला जातो. कंपोनंट मध्ये डेटा साठवण्यासाठी मेमरी सेल संकल्पनेचा उपयोग होते. मेमरी सेल एक प्रकारे रो आणि कॉलमची संरचना असते. रॅम मेमरी सेल मध्ये संग्रहीत प्रत्यके बाईटसाठी विशीष्ठ स्थान (Unique Address) ॲड्रेस निश्चीत केलेला असतो. ॲड्रेस मधील प्रत्येक बाईटस् विशीष्ठ क्रमनुसार संग्रहीत होत असतात. सि.पी.यु. आवश्यकते नुसार रॅन्डमली या ॲड्रेस मधील बाईटचा उपयोग प्रक्रिया करण्यासाठी करत असतो.

डि. रॅम मध्ये डेटा अल्पकाळासाठी संग्रहित होत असतो तसेच सतत बदलत असतो. रॅम मेमरीमध्ये डेटा ज्या जलद गतीने बदलतो (Refresh) त्याला संगणक भाषेमध्ये रिफ्रेश रेट (Refresh Rate) असे म्हणतात. रॅम मेमरीची गति रिफ्रेश रेट वरती अवलंबुन असते. रॅम मेमरीमध्ये डेटा काही मिली सेकंदाच्या फरकाने सतत बदलत असतो.

रॅम कॅपेसिटी आणि रिफ्रेश रेट दोन्ही गोष्टी भिन्न् आहेत. RAM मध्ये डेटा किती प्रमाणात साठवला जाऊ शकते ते रॅम कॅपेसिटी द्वारे दर्शवले जाते तर डेटा किती गतिने प्रक्रिया केला जाऊ शकतो ते रिफ्रेश रेट वरती अवलंबुन असतो. डि. रॅम अनेक प्रकारच्या रिफ्रेश/ट्रान्सफर रेट आणि संग्रहन क्षमतेनुसार उपलब्ध असतात. उदा. 1GB रॅम कॅपेसिटी असेलेल्या रॅमचा रिफ्रेश रेट 800-1600 MHz किंवा त्यापेक्षाही जास्त असु शकतो.

2.1 SDRAM – एस.डी. रॅम (Synchronous Dynamic Random Access Memory)

Synchronous Dynamic (SD) Random Access Memory (RAM) याला मराठीमध्ये सिंक्रोनस डायनामीक (एस.डी.) रँन्डम एक्सेस मेमरी (रॅम) असा उच्चार करतात. SDRAM हे DRAM चा एक प्रकार आहे तसेच SDRAM ची कार्यपद्धती DRAM सारखी आहे. परंतू SDRAM मध्ये Synchronous तंत्रज्ञान वापरलेले आहे जे रॅमला सि.पी.यु. च्या गतीसह आवश्यक असलेला डेटा प्रक्रियेसाठी उपलब्ध करुन देण्याचे कार्य करते.

SDRAM मध्ये वापरलेले Synchronous तंत्रज्ञान कमी वेळेमध्ये CPU ला गतीने अधिक प्रमाणात डेटा प्रिक्रियेसाठी उपलब्ध करुन देण्याचे कार्य करते. तसेच SDRAM सि.पी.यु. च्या क्लॉक स्पिड सह समन्वय पद्धतीने कार्य करतो. सि.पी.यु. (Central Processing Unit) एका सेंकदामध्ये डेटाचे किती सायकल पुर्ण करतो ते मोजण्याच्या पद्धतीला क्लॉक स्पिड (Clock Speed) असे म्हणतात. क्लॉक स्पिड MHz किंवा GHz मध्ये मोजली जाते.

2.2 RDRAM – आर.डि. रॅम (Rambus Dynamic RAM)

Rambus Inc. इ.स. 2000 च्या सुमारारस एक प्रसिद्ध रॅम निर्माता कंपनी होती. व्हीडीओ आणि ग्राफिक्स कार्ड मध्ये उपयोग होणा-या रॅमचा निर्मान करणारी याचा उपयोग होतो.

2.3 DDR SDRAM – डि.डि.आर. रॅम (Double Data Rate SDRAM)

Double Data Rate (DDR) Synchronous Dynamic (SD) Random Access Memory (RAM) मराठी मध्ये डबल डेटा रेट (डि.डि.आर.) सिंक्रोनस डायनामीक (एस.डी.) रँन्डम एक्सेस मेमरी (रॅम) असा उच्चार केला जातो. डेटा वाचणे, लिहणे (Read and write) आणि रिफ्रेश करणे सारख्या प्रक्रिया DDR SDRAM द्वारे पुर्ण केल्या जातात. DDR RAM व्हॉलेटाईल किंवा तात्पुरती संग्रहन मेमरी साधन आहेत कारण डेटा संग्रह (Store) आणि प्रक्रिया (Process) करण्यासाठी सतत विजप्रवाहाची (Electricity) आवश्यकता असते.

2.4 डि.डि.आर. एस. रॅमचे प्रकार – DDR SD RAM Memory Types in Marathi

  • DDR RAM or DDR1 – डि.डि.आर. रॅमची सुरवातीची आवृत्ती किंवा पहिली पिढी म्हणुन DDR रॅम ओळखली जातात. DDR RAM चा डेटा ट्रान्सफर रेट 200 ते 400 Mts होता. 1998 सुमारास रॅमची अद्यावत आवृत्ती म्हणुन वापरण्याची सुरवात झाली. या कालखंडामध्ये याचा वापर केला गेला.
  • DDR2 RAM – डि.डि.आर. रॅमची दुसरी पिढी असा याचा उल्लेख करता येईल. 2003-2006 या कालखंडामध्ये वयक्तिक संगणकामध्ये याचा वापर केला गेला. 1.8 V विजप्रवाह वर कार्य करण्यास सक्षम आहेत. तसेच DDR2 रॅमचा डेटा ट्रान्सफर रेट 400-1066 पर्यंत होता.
  • DDR3 RAM – रॅमची तिसरी पिढी म्हणुन DDR3 प्रचलीत होते. 2007-2013 या कालखंडामध्ये याचा सर्वाधिक वापर केला गेला. DDR3 रॅमचा डेटा ट्रान्सफर रेट 800-2133MHz असा होता. 1.5 V कार्य करण्यास सक्षम आहेत. 8 GB पर्यंत डेटा स्टोर कॅपेसिटी मध्ये उपलब्ध आहे.
  • DDR4 RAM – रॅमची चौथि पिढी DDR4. 2014-2019. डेटा ट्रान्सफर रेट 1600-3200. 1.2 V कार्य करण्यास सक्षम आहेत. 64 GB पर्यंत डेटा स्टोर कॅपेसिटी आहे.
  • DDR5 RAM – रॅमची पाचवी पिढी DDR4. 2020 – Current. डेटा ट्रान्सफर रेट 4000-8000. 1.1 V कार्य करण्यास सक्षम आहेत. 512 GB पर्यंत डेटा स्टोर कॅपेसिटी आहे.

सारांश – आपण काय शिकलात?

रॅम संगणकाची प्राथमिक स्वरुपाची तसेच इंटरनल मेमरी आहे. रॅम डेटा संग्रहन करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करते. रॅम मेमरी अनेक प्रकार, आकार आणि क्षमतेमध्ये उपलब्ध आहेत. संगणक वापरकर्ता गरजेनुसार संगणकाची गती वाढवण्यासाठी एकापेक्षा अनेक रॅमचा वापर करु शकतो. रॅमची कार्यपद्धती, प्रकार आणि त्यांची उपयोगिता याची विस्तृत माहिती या ब्लॉग मध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

आशा आहे रॅम संबधी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, तसेच तुमचे मत, प्रतिक्रिया कंमेट ब्लॉक्स मध्ये आवश्य द्या. तुमचे अभिप्राय आणि सुचनांचे स्वागत आहे.

RAM Memory FAQs – सामान्य प्रश्न

रॅम मेमरी किती संग्रहन क्षमतेमध्ये उपलब्ध असते?

रॅन्डम एक्सेस मेमरीची संग्रहन क्षमता 1 GB ते 32 GB पर्यंत उपलब्ध आहेत. तसेच 32 GB पेक्षाही जास्त क्षमतेच्या रॅम मेमरी देखिल उपलब्ध होत आहेत.

रॅम मेमरी संगणकाच्या कोणत्या भागावरती असते?

संगणकाचे सिस्टीम बोर्ड ज्याला आपण मदरबोर्ड असे म्हणतो त्यावरती रॅम बसवण्यासाठी खाचे असतात ज्याला स्लॉट असे म्हणतात. मदरबोर्डवर वरती रॅम साठी दोन किंवा त्यापेक्षा अधिक स्टॉलस् असतात. प्रत्येक स्टॉलस् मध्ये रॅम मेमरी बसवला येते जणेकरुन संगणकामध्ये रॅमची कमतरता पुर्ण करता येते.

शेअर करा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *