रोम मेमरी म्हणजे काय? प्रकार आणि कार्य

संगणकातील डेटा (Data), सुचना (Instruction) आणि तर्क (Logic) स्वरुपातील माहिती डिजीटली स्वरुपात साठवण्याचे कार्य मेमरी साधने करत असतात. संग्रहीत केलेली माहिती संगणकाच्या वेगवेगळ्या प्रकियेसाठी (Process) उपलब्ध करुन देण्याचे कार्य प्रायमरी मेमरी करते.

संगणक सिस्टीम सतत कार्यरत (Running Status) रहावी यासाठी प्रायमरी मेमरीचे कार्य महत्वाचे असते. संगणकाची कार्यकारी यंत्रणा (Operating System) आणि ऍप्लीकेशन मधील कार्य पुर्णत्वास नेण्यासाठी प्रायमरी मेमरीचे असणे गरजेचे आहे त्याशिवाय संगणक कोणतेही कार्य किंवा क्रिया करु शकत नाही.

मेमरी या शब्दाचा अर्थ विचारात घेताना एक गोष्ट लक्षात असु द्या की स्मृती (Memory) आणि संग्रहन साधने (Storage Device) हे दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. चिप एक प्रकारचे संग्रहन साधने असतात तर प्रोग्राम हे स्मृती/सुचना असतात. संगणकाने कश्या पद्धतीने आणि कोणते कार्य करावे याचे सुचना देणारा संच याला प्रोग्राम म्हणतात जे स्मृतीच्या स्वरुपात संग्रहन साधनामध्ये साठवलेली असतात. अगदी तसेच जसे मानवी मेंदु आणि मेंदु मध्ये असणारे स्मृती किंवा सुचना.

rom memory marathi mahiti

प्रायमरी मेमरी म्हणजे काय? – Primary Memory in Marathi

प्रायमरी मेमरी संगणकाची प्राथमिक स्वरुपात वापरली जाणारी महत्वाची मेमरी आहे. संगणकातील माहिती म्हणजेच डेटा बायनरी भाषेमध्ये (Binary Digit) प्रक्रिया केला जातो. बायनरी भाषेमध्ये द्विमान पद्धतीचा वापर होतो जो 0 आणि 1 च्या स्वरुपात असतो. संगणकाचा डेटा, माहिती आणि सुचना डिजीटली प्रथम रॅम किंवा रोम प्रकारच्या मेमरीमध्ये साठवली जाते म्हणून RAM and ROM मेमरीला प्रायमरी मेमरी म्हणतात.

प्रायमरी मेमरी ही सिस्टिम युनिटच्या (System Unit) आत मदरबोर्डवर (Motherboard) वर बसवलेली असते. म्हणून याला इंन्टरनल मेमरी (Internal Memory) असेही म्हणतात.

प्रायमरी मेमरीचे प्रकार (Types of Primary Memory) – प्रायमरी मेमरी मध्ये मुख्यत: रॅम व रॉम (RAM & ROM) मेमरीचा समावेश होतो. ब्लॉगच्या या भागामध्ये आपण रोम – रिड ओन्ली मेमरी (ROM – Read Only Memory) विषयी माहती पाहणार आहोत.

Classification of Computer Primary Memory
Primary Memory Types

रोम मेमरीचा अर्थ – ROM Meaning in Marathi

 • R – Read – वाचणे (संणकातिल चिप मध्ये असलेला डेटा वाचणे)
 • O – Only – फक्त
 • M – Memory – स्मृती / मेमरी

रोम मेमरी म्हणजे काय? – ROM Memory Marathi Mahiti

रिड ओन्ली मेमरी (Read Only Memory) यालाचा संक्षिप्त स्वरुपामध्ये रोम (ROM) असे म्हणतात. डेटा वाचणे आणि लिहणे (Read & Write) मेमरीचे महत्वाचे कार्य असतात त्या पैकि ROM Memory फक्त वाचणे “Read” याच क्रियेला सहाय्यक असते म्हणुन याला Read Only Memory असे म्हणातात. ROM मेमरीमध्ये साठवलेली माहिती संगणक फक्त वाचू शकतो, त्यामध्ये कसल्याही प्रकारे बदल करु शकत नाही अथवा पुन: लिहू शकत नाही त्यामुळे याला Read Only Memory म्हणतात.

रोम मेमरी एका चिपच्या (Chip) स्वरूपात असते. सिस्टिम युनिटमध्ये मदरबोर्डवरती कायमची सोल्डरींग पद्धतीने घट्ट बसवलेली असते. सिस्टीम युनीटच्या आत याचा समावेश होतो म्हणून याला इंन्टरनल मेमरी (Internal Memory) देखील म्हणतात.

ROM Read Only Memory

रोम प्रकारची मेमरी तयार करताना यामध्ये प्रोग्रामचा समावेश (Install) केला जातो. संगणक बंद असो वा चालू यातील माहीती नष्ट होत नाही किंवा पुसली (Erase) जात नाही म्हणुन याला नॉन-व्हॉलेटाईल (Non-volatile Memory) म्हणजेच कायमस्वरुपी मेमरी म्हणतात. रोम मेमरीचे कार्य त्यामध्ये असणा-या प्रोग्रामनुसार ठरलेले असते याला संगणकाच्या भाषेमध्ये फर्मवेअर असेही म्हणतात. याचेच उदाहरण म्हणजे BIOS आणि CMOS सारखे प्रोग्राम होत जे संगणकाच्या अगदी सुरवातीला कार्यान्वित होतात.

रोम मेमरी कसे कार्य करते? – How ROM works in Marathi

संगणक चालु होण्याच्या सुरवातीच्या स्थिती (Booting) मध्ये प्रथम रोम मेमरी मधील संग्रहीत माहिती (Stored Information) वाचतो. या प्रकारच्या मेमरीमध्ये संगणक चालु होण्यासाठीची प्राथमिक माहितीचा समावेश असतो. रोम मेमरीमध्ये हार्डवेअर साधनांची माहिती आणि त्यासंबधीत सेटिंगस् संग्रहीत असतात.

संगणकाला जोडलेली हार्डवेअर, संगणक बुट होण्याची पद्धत, सिस्टीमचा दिनांक व वेळ, हार्डवेअरची माहिती आणि स्थिती, पावर सप्लायची स्थिती, सिस्टीम युनीटचे तापमान अश्या अनेक माहितीचा समावेश होतो. वरील सर्व माहीती संगणक वापरकर्ता पाहू शकतो परंतू त्यामध्ये नव्याने काही भर घालू शकत नाही किंवा त्यामध्ये बदल करु शकत नाही.

रोम मेमरी (ROM-Read Only Memory) फक्त वाचणे (Read) याच क्रियेला सहय्यक ठरते. रोम मधील माहिती किंवा प्रोग्राम संगणकाला फक्त वाचता येते यामध्ये बदल करता येत नाही अथवा पुसता (Erase) देखिल येत नाही.

रोम मेमरीचे प्रकार – ROM Memory Types in Marathi

रोम मेमरीचे उपयोग आणि कार्यानुसार रोम मेमरीचे तिन प्रकार वर्गीकरण केलेले आहे. याचे विस्तृत माहिती पुढीलप्रमाणे.

Classification ROM Memory Types
Types of ROM Memory

1. PROM – पीरोम | Programmable Read Only Memory

प्रोग्रामेबल रिड ओन्ली मेमरी (PROM) चिपच्या स्वरुपात असते, ज्यामध्ये सुचना म्हणजेच प्रोग्राम डिजीटल स्वरुपामध्ये भरण्यात येतात. मेमरी चिपचे उत्पादन करणारी कंपनी म्हणजे मेमरी बनवणारी निर्माती कंपनी ते तयार करताना त्यामध्ये प्रोग्राम भरतात. रोम मेमरी मध्ये भरण्यात येणारे प्रोग्राम कायमस्वरुपी असतात जे कोणत्याही प्रकारे त्यामध्ये बदल करता येत नाही किंवा ते पुसता (डिलीट) येत नाही.

पी.रोम मराठी अर्थ – PROM Meaning in Marathi

 • P – Programmable – सुचना किंवा प्रोग्राम
 • R – Read – वाचणे
 • O – Only – एकमेव क्रियेला / फक्त
 • M – Memory – सहाय्य करणारी मेमरी

2. EPROM – ईपीरोम | Erasable Programmable Read Only Memory

इरेजेबल प्रोग्रामेबल रिड ओन्ली मेमरीला संक्षिप्त शब्दामध्ये EPROM – ईपीरोम असे म्हणतात तसेच याला EROM सुद्धा म्हणतात. EPROM चे संरचना PROM सारखीच असते परंतू रिप्रोग्रामिंग (Reprogramming) हे याचे वैशिष्ठ्ये आहे. रिप्रोग्रामिंग म्हणजे चिप मध्ये पुर्वी असलेले प्रोग्राम पुसून (Erase) परत नवीन प्रोग्राम भरता येणारे तंत्रज्ञान होय.

EPROM मध्ये असलेले प्रोग्राम अल्ट्राव्हायलेट किरणांचा (Ultraviolet Ray) वापर करुन पुसता (Erase) येतात. EPROM चिप मधील पुर्ण माहिती या क्रियेमध्ये पुसली जाते यामध्ये कोणती माहिती पुसावी किंवा पुसू नये याची निवड करता येत नाही.

चिप मध्ये असलेला पुर्ण डेटा पुसण्याकरीता EPROM Chip विशिष्ठ कालावधीपर्यंत अल्ट्राव्हायलेट किंरणांच्या संपर्कामध्ये ठेवली जाते त्यानंतर त्यामध्ये नविन प्रोग्राम भरता येतात. परंतु एका विशीष्ठ मार्यदेपर्यंतच याचा वापर Reprogramming साठी करता येतो. संगणक किंवा त्यासारख्या डिजीटल साधनांमध्ये मायक्रोकंट्रोलर्स सारख्या इलेक्ट्रॉनिक्स साधनांमध्ये (Electronic Devices) याचा वापर केला जातो.

ई. पी. रोम मराठीमध्ये अर्थ – EPROM Meaning in Marathi

 • E – Erasable – पुसता किंवा इरेज करता येणा-या
 • P – Programmable – सुचना किंवा प्रोग्राम
 • ROM – Read Only Memory – फक्त वाचन क्रिया करणारी मेमरी

मालवेअर आणि व्हायरस सुरक्षेविषयी ब्लॉग… मालवेअर (Malware in Marathi) म्हणजे काय? आणि मालवेअरचे प्रकार

3. EEPROM – ईईपीरोम | Electrically Erasable Programmable Read Only Memory

EEPROM – ईईपीरोम चे विस्तारीत रुप म्हणजे इलेक्ट्रीकली इरेजेबल प्रोग्रामेबल रिड ओन्ली मेमरील. ई.ई.पी.रोम मध्ये विजप्रवाहाचा वापर करुन डेटा पुसता (Erase) येतो तसेच पुन: प्रस्थापीत (Reprogamm) करता येतो.

ई.ई.पी.रोम मराठीमध्ये अर्थ – EEPROM Memory Meaning in Marathi

 • E – Electrically – विद्युत प्रवाह द्वारे
 • E – Erasable – पुसता किंवा इरेज करता येणा-या
 • P – Programmable – सुचना किंवा प्रोग्राम
 • ROM – Read Only Memory – फक्त वाचन क्रिया करणारी मेमरी साधन

FAQ – सामान्य प्रश्न

रोम मेमरीचे एकुन किती प्रकार आहेत?

रोम मेमरीचे वर्गीकरण एकुन 3 प्रकारामध्ये केला जातो. 1. पी.रोम (PROM) 2. ई.पी.रोम (EPROM) 3. ई.ई.पी.रोम (EEPROM)

नॉन-व्हॉलेटाईल मेमरी – Non-volatile Memory म्हणजे काय?

संगणकामध्ये असलेली ROM मेमरीला चिपला नॉन-व्हॉलेटाईल मेमरी असे म्हणतात. कारण संगणक बंद झाल्यानंतर अथवा विजप्रवाह खंडित झाल्यानंतर देखिल ROM Memory मध्ये असलेले प्रोग्राम किंवा माहिती नष्ट होत नाही. या गुणधर्मामुळे रॅम मेमरीला कायमस्वरुपी मेमरी असे म्हणतात.

रिड ओन्ली मेमरी म्हणजे काय?

रोम मेमरी (ROM-Read Only Memory) फक्त वाचणे (Read) याच क्रियेला सहय्यक ठरते. रोम मधील माहिती किंवा प्रोग्राम संगणकाला फक्त वाचता येते यामध्ये बदल करता येत नाही अथवा पुसता (Erase) देखिल येत नाही म्हणुन याला Read Only Memory असे म्हणातात.

रोम मेमरीचा उपयोग संगणकामध्ये कश्यासाठी होतो?

संगणक चालु होण्यासाठीची सर्व प्राथमिक माहिती रोम मेमरीमध्ये संग्रहित असते. संगणकाला जोडलेली हार्डवेअर, संगणकाची स्थिती आणि बुटिंग सारखी माहिती रोम मेमरी संगणकाला उपलब्ध करुन देते जेणे करुन संगणक सुरु होण्याची प्रक्रिया पुर्ण होते.

प्रायमरी मेमरी कोणत कार्य करते?

संगणकातील डेटा (Data), सुचना (Instruction) आणि तर्क (Logic) स्वरुपातील माहिती डिजीटली साठवणे, संग्रहीत केलेली माहिती आणि वेगवेगळ्या प्रकियेसाठी (Process) उपलब्ध करुन देण्याचे कार्य प्रायमरी मेमरी करते. संगणक सिस्टीम सतत कार्यरत रहावी यासाठी प्रायमरी मेमरी कार्य महत्वाचे असते.

शेअर करा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *