संगणक व्हायरस काय आहे? हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मालवेअर म्हणजे काय? (What is Malware in Marathi?) असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा त्याबाबात आपल्याला हवी ति माहिती नसते. ॲन्टीव्हायरस काय आहे? याचा वापर कसा करतात? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे या ब्लॉगच्या माध्यमाने देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सामान्य ज्ञान किंवा माहिती म्हणुन हा संपुर्ण ब्लॉग एकदातरी आवश्य वाचा आणि आपल्या ब्लॉग विषयीच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये आवश्य द्या.
आजच्या माहीती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मालवेअर हे खूप मोठी समस्या आहे. साहजीकच यामुळे नेटिझनस यांना (इंटरनेट किंवा संगणकाचा वापर करणारे) संभाव्य धोक्यांची माहीती असणे अवश्यक आहे. संगणक, लॅपटॉप, मोबाईल सारखी साधने यांना मालवेअर सारख्या विकृत सॉफ्टवेअर्स किंवा प्रोग्रामचा नेहमी धोका राहीलेला आहे.

अनुक्रमनिका
मालवेअरचा प्रसार व चुकीच्या हेतुसाठी होत असलेला वापर त्यातुन निर्मान होणारे सायबर क्राईम जगामध्ये मोठी समस्या म्हणून पुढे येत आहे. मालवेअर या संकल्पनेकडे जाण्यापुर्वी संगणक संबधी काही प्राथमिक माहीती पासुन सुरवात करुया. जणेकरुन हा विषय समजून घेणे अधिक सोपे जाईल.
प्रोग्राम काय असतात?
संगणकाने कोणत्या वेळी, काय आणि कोणते कार्य करावे? यासाठीच्या दिलेल्या सुचना म्हणजेच प्रोग्राम होय. सॉफ्टवेअर, ॲप्लीकेशन, वेबपेजेस, वेबआधरीत ॲप्लीकेशन, नेटवर्क अश्या कितीतरी गोष्ठी प्रोग्राम वरती आधारीत असतात. संगणकाला हे ठरवता येत नाही कि कोणता प्रोग्राम चांगला आहे किंवा वाईट. प्रोग्रामद्वारे जे माहीती संगणकाला दिली जाते त्यानुसार तो कार्य करत असतो.
ॲप्लीकेशन किंवा सॉफ्टवेअर काय असतात?
अनेक सुचना जेव्हा एकत्र करुन त्यांचा एक संच (Instruction Set) तयार केला जातो त्याला ॲप्लीकेशन किंवा सॉफ्टवेअर असे म्हणतात.
साफ्टवेअर मध्ये सिस्टीम सॉफ्टवेअर आणि ॲप्लीकेशन साफ्टवेअर अशी दोन प्रकार पडतात. सिस्टीम सॉफ्टवेअर हे संगणकाचे संपुर्ण हार्डवेअर व कार्यकारी यंत्रणा (Operating System -OS) यांचे नियंत्रण व व्यावस्थापनाचे कार्य करतात. तर ॲप्लीकेशन साफ्टवेअर मध्ये नोटपॅड, वर्ड, एक्सेल, फोटोशॉप…. यांचा समावेश होतो ज्याचा वापर संगणक वापरकर्ता त्याच्या आवश्यकते नुसार करत असतो.
संगणकाचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे संचालन आणि नियंत्रित प्रोग्राम द्वारेच केली जातात. संगणकामध्ये नवीन फाईल बनवणे, इंटरनेट वापरणे, कॉपी-पेस्ट सारख्या कमांड, कार्यकारी यंत्रणा, हार्डवेअरचे संचलन… अश्या कितीतर गोष्ठी मागे अनेक प्रोग्राम काम करत असतात. संगणकाच्या पदडयामागे या सर्व गोष्ठी घडत असतात त्याचे फक्त परीणाम किंवा कार्य आपन आपल्या संगणकाच्या स्क्रिन वर पाहत असतो.
वाचनीय ब्लॉग ….
प्रोग्रामर कोणाला म्हणतात?
प्रोग्रामर असा व्याक्ती असतो जो प्रोग्राम लिहत आसतो. प्रोग्रामर संगणकाच्या भाषेमध्ये (Computer Language like “C”, “C++”) संगणकाने कोणत कार्य करावे? हे सांगत असतो.
प्रोग्रामर प्रोग्राम लिहतात परंतु त्यावरती त्यांचे नियंत्रण नसते. प्रोग्राम किंवा ॲप्लीकेशन पुर्णपणे वापरकत्याच्या नियंत्रणात असतात. संगणक वापरकर्ता जो पर्यंत ठराविक कमांड देत नाही तो पर्यंत संगणकातील तो प्रोग्राम किंवा आज्ञा आमलात आणली जात नाही. प्रोग्रामरचे काम हे फक्त ठराविक कमांड साठी सुचना लिहण्याचे असते.
हॅकर्स कोण असतात?
मालवेअर सारख्या संगणकासाठी धोकादायक असलेल्या प्रोग्रामची निर्मिती करणाऱ्या व्यक्तीला किंवा व्याक्तींच्या समुहाला “हॅकर्स” म्हणतात. हॅकर्स वाईट उद्देशाने मालवेअर सारख्या प्रोग्राम ची निर्मिती करत असतात. अनाधिकृत पणे संगणकातील माहीती मिळवणे, सगणकातील माहितीमध्ये बदल करणे किंवा नष्ट करणे, संगणकावर ताबा मिळवणे या सर्व प्रकाराला “हॅकिंग” असे म्हणतात.
मालवेअर म्हणजे काय? – Malware in Marathi?
वर्ड प्रोसेसिंग, एमेज एडीटींग, तसेच वर्डपॅड, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, सिस्टीम सॉफ्टवेअर्स…. अश्या अनेक प्रकारची सॉफ्टवेअर्स आपल्याला माहित आहेत. संगणकामध्ये आपण असे अनेक सॉफ्टवेअर्स वेगवेगळ्या हेतूसाठी वापरत असतो. अश्या प्रकारची सॉफ्टवेअर प्रतिष्ठीत व नामांकीत सॉफ्टवेअर कंपण्या मार्फत तयार केलेली असतात ज्याचा वापर आपण दैनंदिन कार्यामध्ये करत असतो.
प्रोग्रामस् जसे चांगल्या हेतुसाठी तयार केली जातात, तसेच काही प्रोग्रामर त्यांचे वाईट हेतु साध्य करण्यासाठी द्वेषपुर्ण प्रोग्राम तयार करतात. प्रोग्राम किंवा ॲप्लीकेशन ज्यांची निर्मीती वाईट हेतुसाठी केली जाते त्याला “मालवेअर – Malware” असे म्हणतात. मालवेअर सारखे द्वेषपुर्ण प्रोग्राम संगणक व संगणकातील माहीतीला प्रभावित करत असतात.
मालवेअरला संगणक भाषेत “मेलीशिअस सॉफ्टवेअर” असे म्हणतात. मालवेअर एक असा मानव निर्मीत संगणक प्रोग्राम असतो जो संगणक प्रणाली आणि संगणकातील माहीती नष्ट करतो, त्यामध्ये बदल करतो आणि संगणक वापरकर्त्याच्या परवानगी शिवाय त्यामधील माहीतीचा वापर करतो.
वायरस चे संबोधन आपण बहुतेक वेळेस मालवेअर या अर्थीच करतो. परंतु मालवेअरचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या पैकि व्हायरस हा एक प्रकार आहे. काय आहे ना आश्चर्याची बाब! आजपर्यंत आपण वायरस म्हणजे मालवेअर असे समजत होतो, परंतु वायरस हा मालवेअरचा एक प्रकार आहे.
मालवेअर आणि त्याचे प्रकार – Malware Types in Marathi
शोधकर्ता मालवेअरचे अनेक प्रकारात वर्गीकरण करतात. मालवेअर संगणकात कोणत्या माध्यमाने प्रवेश करतात आणि संगणकातील डेटा व माहीती कश्या प्रकारे प्रभावित करतात त्यानुसार त्यांचे वर्गीकरण कलेले आहे.
1. व्हायरस – Virus
संगणक व्हायरस मध्ये अनेक प्रकार आहेत याची संक्षिप्त माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. संगणक व्हायरस म्हणजेच अशी मिलिशियस सॉफ्टवेअर जे संगणकामध्ये प्रवेश केल्यानंतर संगणकातील प्रोग्राम व डेटावर नियंत्रण मिळवतात, त्यामध्ये बदल करु शकतात तसेच नष्ट देखील करू शकतो. अशा प्रकारची सॉफ्टवेअर जेव्हा कार्यान्वीत होतात तेव्हा ते संगणक मधील अनेक प्रकारच्या माहीतीला प्रभावित करतात.
संगणक व्हायरस जेव्हा कोणत्याही माध्यमाने संगणक मध्ये येतो तेव्हा संगणकामध्ये असलेल्या एक्झिक्युटेबल फाइल (.exe – संगणकाली प्रोग्राम फाईल), डॉक्युमेंट व अनेक प्रकारच्या सिस्टीम फाईल्स सह तो स्वता:शी जोडतो किंवा त्यामध्ये प्रवेश करतो. आणि याचाच परिणाम म्हणजे संगणकातील माहीतीवर वापरक-याचे नियंत्रण नष्ठ करतो.
व्हायरस संगणकाच्या गतीवरती परीणाम करतो, संगणकालीत फाईल्स मध्ये बदल करतो, संगणकाची गती कमी करणे यालाच आपन “हँग” होणे देखिल म्हणतो, अनेक अज्ञात फाईल्सची निर्मीती करणे, तसेच संगणकातील काही सेवा बंद करणे उदा. संगणकाची फायरवाल बंद करणे, जे किं संगणकामध्ये येणा-या व जाणा-या माहीतीवर नियंत्रीत करत असते. ॲन्टीव्हायरस प्रोग्राम बंद करणे अश्या अनेक प्रकारच्या बदल आणि नुकसान व्हायरसद्वारे केले जाते.
2. ट्रोजन होर्स – Trojan Horse
ट्रोजन होर्स किंवा ट्रोजन एक मेलीशिअस कोड किंवा प्रोग्रामिंग असते जी संगणकामध्ये स्थापिक होणार्या सॉफ्टवेअर मार्फत संक्रमित होते. ट्रोजनच्या मालवेअर संगणकातील माहीतीला प्रभावित करतो यामध्ये तुमच्या संगणकाचा पुर्ण ताबा मिळवतो. संगणकाली माहीती नष्ट करणे, वयक्तीक माहीत चोरणे. ग्रसित प्रोग्राम जेव्हा संगणकामध्ये स्थापित होतात तेव्हा ते पुर्ण संगणकामध्ये पसरतात आणि संगणकातील माहीती व संगणक निष्क्रिय करतात.
3. स्पायवेअर – Spyware
स्पाय म्हणजे गुप्तचर. याचे मुख्य कार्य संगणकामध्ये वापरल्या जाणा-या माहितीवर देखरेख ठेवणे होय. म्हणजेच एक असा प्रोग्राम जो संगणकामध्ये वापरली जाणार्या माहीतीवर देखरेख ठेवतो. म्हणजेच हेरगीरी करतो. इंटरनेटवरती केली जाणारी वेब ब्राउझिंगची माहीती व संगणकातील वेगवेगळ्या प्रकारची ऍक्टिव्हिटीज यांची माहिती मिळवतो.
अशा प्रकारची स्पायवेअर संगणक वापरकत्याची संवेदनशील माहिती जमा करुन तो इंटरनेटच्या माध्यमाने अश्या व्याक्ती पर्यंत पोहोचवतात जो अश्या प्रकारची माहीती मिळवण्यासाठी स्पायवेअर ची निर्मीती केलेली असते. संवेदनशील माहितीमध्ये ई-मेल ची पासवर्ड तुमचे बँक अकाउंट, क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड यांची माहिती आणि वापर समावेश असण्याची शक्यता असते. इंटरनेटवरील मालवेअरने ग्रसित असलेल्या वेबसाईड दवारे स्पायवेअर संगणकात प्रवेश करतो.
4. रॅन्समवेअर – Ransomware
अलीकडच्या काळामध्ये रॅन्समवेअर या नावाचा मालवेअर खूप प्रचलित होता. अनेक संगणक रॅन्समवेअर मालवेअरने ग्रसित झालेले होते. रॅन्समवेअर हा एक असा मालवेयर आहे जो संगणकामध्ये प्रवेश केल्यानंतर संगणकामधील सर्व डेटा ला एन्क्रिप्ट करतो. एन्क्रिप्ट म्हणजे प्रोग्राम किंवा पासवर्ड द्वारे ती फाईल वापरण्यास प्रतिबंधीत केली जाते व वापरकर्त्याचा पूर्ण ताबा एक्सेस म्हणजेच वापर काढून टाकतो जातो.
रॅन्समवेअर मालवेअरने ग्रसित असलेल्या संगणकाच्या स्क्रिन वरती माहीती प्रदर्शित केली जाते, यामध्ये दर्शवण्यात आलेले असते किे इन्स्क्रिप्ट केलेल्या फाईला डिक्रिप्ट करण्यासाठी व संगणक पुन: व्यावस्थीत करण्यासाठी पैशांची मागणी केली जाते.
डॉक्युमेंट फाईल्स, इमेज फाईल्स व अश्या अनेक प्रकारच्या फाईल्स त्यामध्ये वापरकर्त्याचा महत्वाचा डेटा साठवलेला असतो. अशा पद्धतीची मालवेअर संगणकाच्या संपूर्ण भेटा डेटा नष्ट करतात.
5. ऍडवेअर – Adware
ऍडवेअर हा एक मालवेअरचा एक प्रकार आहे. ऍडवेअर या शब्दावरुन लक्षात आले असेल किं एडवर्टाइजमेंट बॅनर म्हणजेच जाहिरात दवारे जो मालवेअर प्रोग्राम संगणकात प्रवेश करतो त्याला “ऍडवेअर” असे म्हणतात. इंटरनेटवर वापरलेली माहीती, डाऊनलोडिंग कलेली माहीतीच्या आधारावर ऍडवेअर जाहीरात प्रदर्शित करतात.
इंटरनेट वर जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारची वेबपेजेस पहात असतो किंवा ब्राउज करत असतो तेव्हा ऍडवेअर ग्रसित वेबपेजेस वरती एडवर्टाइजमेंट म्हणजेच जाहिरात दर्शवली जातात. या जाहिरात मध्ये तुमचा संगणकाची गती कमी आहे, तुमचा संगणक व्हायरसने बाधीत आहे… अश्या अनेक प्रकारच्या जाहीराती दर्शवली जातात. अशा जाहीराती मध्ये अशी काही प्रोग्राम असतात जे की आपल्या संगणकला हानी पोहोचू शकतात. अशा प्रकारची जाहिरातीवर जेव्हा आपण क्लिक करतो किंवा त्याला एक्झिक्युट करतो तेव्हा अशा प्रकारची प्रोग्राम आपल्या संगणकामध्ये प्रवेश करतात जे जेणेकरून आपला संगणक अनेक प्रकारच्या मालवेअरचा च्या संपर्कात येतो.
6. की-लॉगर – Keylogger
कीलॉगर हे एक प्रकारचे कीबोर्ड मॉनिटरिंग टूल आहे. संगणकामध्ये केंव्हाही आणि कोठेही टाईप होणारे प्रत्येक अक्षर, अंक व स्पेशल कॅरेक्टर यांचा कि-स्ट्रोक (कि-बोर्ड वर टाईप केलेली अक्षरे व अंक) यांची माहीती व त्यांचा क्रम कीलॉगर द्वारे संग्रहित केला जातो. संग्रहीत केलेली माहीती इंटरनेटच्या माध्यमाने हि “किलॉगर्स” टुल द्वारे मिळवतात.
वापरकर्त्याचे युजरनेम त्याचे पासवर्ड व इतर प्रकारची संवेदनशील माहिती जि कि-बोर्डचा वापर करुन संगणकाला दिलेली असते याचा समावेश असतो.
7. रूट किट – Rootkit
रूट किट हे एक मेलीसिश्स सॉफ्टवेअर टूल आहे. या टूलचा वापर करून संगणकाचा एक्सेस म्हणजे ताबा अनाधिकृतरित्या मिळवलेला असतो. म्हणजेच संगणक वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय कंप्यूटर मधील माहिती, कंप्यूटर सेटिंग्स म्हणजेच सिस्टम कंन्फीगरेशन व ऑपरेटिंग सिस्टमच्या फाईल्स मध्ये बदल करतो. हे रिमोटली एक्सेस केली जाते म्हणजेच वापरली जाते.
8. वर्म – Worm
वर्म यांची क्रिया साधारणत: व्हायरस सारखीच असते. परंतु ते एक स्वतंत्र प्रोग्राम म्हणून कार्य करतात. संगणकामध्ये प्रवेश केल्यानंतर वर्म त्यांचे अनेक प्रतिलीपी तयार करतात.
मालवेअर संगणकामध्ये कशी येतात?
संक्रमणीत संगणकातील डेटा जसे फाईल व फोल्डर कॉपी करणे, ॲप्लीकेशन प्रस्थापित करणे आणि इंटरनेट हे मुख्य माध्यमे असतात ज्याद्वारे मालवेअर संगणकामध्ये प्रवेश (How Entered Malware in Your Devices?) करतात.
1. सेकंडरी स्टोरज – Pen drive / Floppy Disk / CD or DVD
सेकंडरी स्टोरज मध्ये फ्लॉपी डिंस्क, सिडी किंवा डिव्हीडी डिस्क, मेमरी-कार्ड तसेच पेनड्राईव्ह सारख्या स्टोरेज साधनांचा समावेश होतो.
सेकंडरी स्टोरज संगणकातील माहीती म्हणजेच डेटा इतर संगणकामध्ये वापरण्यासाठीचे वापरले जाणारी लवचिक माध्यमें असतात. अश्या प्रकारच्या माध्यमाद्वारे मालवेअर चे संक्रमन होण्याचे प्रमाण अधिक आहे.
मालवेअर ने ग्रसित असलेल्या संगणकाशी जेव्हा अशी माध्यमे संपर्कात येतात तेव्हा त्यामध्ये मालवेअरचा शिरकाव हातो. मालवेअरने ग्रसित अशी माध्यमे जेव्हा इतर संगणक साधनांशी जोडली जातात तेव्हा त्यामध्ये असलेले मालवेअर एका संगणका मार्फत दुस-या अनेक संगणकांना संक्रमणीत करतात.
2. इंटरनेट – Internet
आजच्या काळामध्ये इंटरनेट मुलभूत व गरजेची वस्तू झालेली आहे. मोबाईल लॅपटॉप किंवा कम्प्युटर अशी कोणताही डिवाइस जो इंटरनेट द्वारे जोडलेला असतो त्याचा वापर आपण आवडीने करतो.
इंटरनेट कसे वापरावे? इंटरनेट वापरताना कोणत्या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे? याची माहीती असणे अवश्यक आहे. इंटरनेटचे व इंटरनेटद्वारे वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या सुविधांचा योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे.
इंटरनेट माहीती यंत्रणेमधील महत्वाचा घटक. अनेक प्रकारची माहीती, सपंर्काचे महत्वाचे माध्यम आहे. इंटरनेटद्वारे आपण जगभरातील संगणकाशी जोडले जातो. वेबसाईट, इमेल, ऍ़प्लीकेशन या माध्यमाद्वारे देखिल वेगवेगळ्या प्रकारे मालवेअर आपल्या संगणकात येऊ शकतात.
वेब ब्राऊजींग करत असताना काही अश्या जोडण्या (Hyperlink) किंवा जाहीराती वरती आपण अवधानाने क्लिक करतो जे इतर संकेतस्थळावरत वळलेली (Redirect) असतात. अश्या प्रकारच्या संकेतस्थळ मालवेअरने ग्रसित असण्याचा संभव असतो.
3. इमेल – E-mail
ऑनलाईन पत्रव्यावहारासाठी इमेल सारखी सुविधा वापरली जाते. आपल्या इमेलच्या इनबॉक्स मध्ये अशी काही इमेल असतात जे अज्ञात माध्यमाद्वारे आलेली असतात. अश्या इमेल मध्ये जोडणी म्हणजेच लिंक आणि संलग्न फाईल/ॲटॅचमेंट असतात. त्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता नकारता येत नाही. अशी ॲटॅचमेंट डाऊनलोड किंवा एक्सझयुट करणे किंवा लिंकवरती क्लिक करणे धोकादायक ठरु शकतात. कारण यामध्ये असलेले मालवेअर प्रोग्राम आपल्या संगणकात येतात.
संगणकाला झालेली मालवेअरची बाधा कशी ओळखावीत?
How to Identity Malware infection in computer ?
संगणकामध्ये होणारे चुकिच्या परिवर्तन हे सिस्टीम मालवेअर बाधित असल्याची लक्षणे आहेत.
- संगणक सतत हँग होणे.
- संगणकाची गति कमी होणे
- ॲप्लीकेशन उशिराने चालु होणे. किंवा ॲप्लीकेशनच चालु न होणे.
- एक अनियंत्रित पॉप-अप विंन्डो सतत उघडणे.
- अनोळखी सॉफ्टवेअर वापरकर्त्याच्या परवानगी शिवाय प्रस्थापित म्हणजेच इन्स्टॉल होणे.
- नविन फाईल्स किंवा फोल्डर आपोआप तयार होणे.
- संगणकातिल फाईल्स किंवा फोल्डर आपोआप डिलीट, निष्क्रीय होणे.
- संगणक सुरु न होण किंवा बुटिंगला वेळ घेणे.
- अनियंत्रित फाईल वे फोल्डर तयार होणे त्यांचे अनेक प्रतिलीपी आपोआप तयार होणे.
- लॅपटॉपवर कार्य करत असताना बॅटरीचे उर्जेचा अधिक वापर करणे त्यामुळे लॅपटॉप अनेक वेळा चार्ज करण्याची गरज पडते.
मालवेअरचा संगणकावर होणारा परीणाम
Malware effects on computer
- संगणकाची गती कमी होते त्यामुळे वापरकत्याच्या कामामध्ये अडथळा उत्पन होतो.
- संगणकाचे हार्डवेअर निक्रिय होण्याचा धोका अधिक असतो.
- इंटरनेटची गती कमी होते आणि अनियंत्रित जाहिरात पॉप-अप विंन्डो द्वारा प्रदर्शीत होतात.
- संगणकालीत फाईल्स् व फोल्डर मध्ये बदल होतात. त्यामुळे फाईल मधील महत्वाचा डेटा नष्ट होण्याचा धोका असतो.
- संगणक सुरु होत नाही किंवा सुरु होण्यास अधिक वेळ घेतो त्यामुळे कार्यकारी यंत्रणा (Operating System -OS) परत स्थापिक करण्याची गरज पडते.
- तुमच्या संगणकातील संक्रमणित झालेली डेटा/माहिती इतर संगणकामध्ये पसरण्याचा धोका वाढतो.
- संगणकाची फायरवॉल सुरक्षा बंद होते त्याचाच परीणाम इतर अनेक प्रकारचे मालवेअर संगणकामध्ये पसरण्याचा धोका वाढतो.
एन्टी-व्हायरस व एन्टी-मालवेअर ॲप्लीकेशन
Antivirus and Anti Malware tool or Application ॲन्टीव्हायरस सुरक्षा संगणकासाठी संजिवणी आहे.
1. मॅकअफी ॲन्टीव्हायरस (McAfee Antivirus)
https://www.mcafee.com मॅकअफी एक प्रसिद्ध ॲन्टीव्हायरस सॉफ्टवेअर आहे. 1987 मध्ये सुरवात झालेल्या संगणकाला मालवेअरने सुरक्षा देणारे पहिले ॲन्टीव्हायरस आहे.
फायरवॉल सुरक्षा, वेब सुरक्षा, इमेल सुरक्षा तसेच पॅरेनटीयल सुरक्षा सारख्या अनेक सुविधा मॅकअफी ॲन्टीव्हायरस मार्फत उपलब्ध करुन दिल्या जातात. परंतु या सेवेसाठी ठराविक फिस आकारली जाते. ॲन्टीव्हायरस कश्या पद्धीतीने कार्य करतात? तसेच सुरक्षेचे वैशिष्ठये पाहण्यासाठी 30 दिवसांचा ट्रायल पिरीयड उपलब्ध करुन दिला जातो.
2. अवास्ट ॲन्टीव्हायरस (Avast Antivirus)
अवास्त https://www.avast.com संगणक सुरक्षा देणारे मोफत आणि पेड अशी वर्जन आहेत. ॲन्टीव्हायरस आहे. वाय-फाय, मालवेअर सारख्या अनेक सुरक्षा सुविधा दिली जाते. मोफत आणि पेड अशी वर्जन आहेत.
3. आविरा ॲन्टीव्हायरस (Avira Antivirus)
आविरा ॲन्टीव्हायरस मार्फत https://www.avira.com बेसिक सुविधा मोफत दिल्या जातात. मोबाईल आणि संगणक सुरक्षा. “अविरा फ्रि सिक्युरीटी फोर विंन्डोज” या मोफत ॲन्टीव्हायरस द्वारे अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात.
4. क्विकहिल ॲन्टीव्हायरस (Quick Heal Antivirus)
क्विकहिल ॲन्टीव्हायरस https://www.quickheal.com एक प्रसिद्ध संगणक सुरक्षा प्रदान करणारे टुल आहे. मोबाईल आणि संगणक अश्या दोन्ही डिव्हाईसेसना सुरक्षा प्रदान करते. इंटरनेट, प्रोफेशनल आणि सर्वर प्रकारचे पॅकेज उपलब्ध आहेत. या मध्ये टोटल सिक्युरीटी सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाते. बॅकिंग सुरक्षा, वेबकॅम सुरक्षा, ब्राऊजिंग, फिशींग, इमेल अश्या अनेक सुरक्षा क्विकहिल ॲन्टीव्हायरस प्रदान करत.
5. मालवेअर बाईट ॲन्टी मालवेअर (Malware Bytes Anti Malware)
मालवेअर बाईट https://www.malwarebytes.com द्वारे वयक्तीक संगणकासाठी मोफत ॲन्टीव्हायरस उपलब्ध करुन दिलेल आहे. जलग गतिने संगणकातील मेलवेअर तपासले जाते तसेच ब्राऊजर गार्ड सारख्या सुविधेमुळे फसवेगिरी आणि धोकादायक बेवसाईडपासून सुरक्षा प्रादान केली जाते.
मोफत वर्जन पेक्षा पेड वर्जन मध्ये अधिक सुविधा दिलेल्या आहेत ज्यामुळे एक संपुर्ण सुरक्षा परविल्या जातात. विंन्डोज, मॅक ओ.एस., ॲन्ड्रॉईड व क्रोमबुक ऑपरेटिंग साठी उपलब्ध आहेत. ओळख, खाजगी माहिती, मेलवेअर, फसवेगिरी वेबसाईड पासुन रक्षण सारखे अनेक साधारण सुविधा याद्वारे दिल्या जातात.
6. लाव्हाऑफ्ट ॲडवेअर (Lavasoft Adware)
लाव्हाऑफ्ट ॲडवेअर एक प्रसिद्ध ॲन्टी-स्पायवेअर टुल आहे. संणकातील कोणत्याही प्रकारच्या संवेदनशिल माहिती संदर्भात सुरक्षा प्रदान करतो. इंटरनेट द्वारे प्रदर्शीत होणा-या जाहिरातवर नियंत्रण, पासवर्ड सुरक्षा, बँक डेबिट-क्रेडिट कार्ड सुरक्षा, वेब सुरक्षा, इंटरनेट सुरक्षा सारख्या अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
फायरवॉल काय असते?
इंटरनेटद्वारे संगणकामध्ये येणा-या आणि जाणा-या माहिती/डेटा वर नियंत्रण व सुरक्षा देण्याचे काम करते. जसे वेब सर्फींग करत असताना मालवेअर किंवा धोकादायक प्रोग्राम संगणकात प्रवेश करण्यास करण्यापासुन थांबवते किंवा नष्ठ करते.
ॲन्टीव्हायरस संपुर्ण सुरक्षा प्रादान करतात का?
काही ॲन्टीव्हायरस कंपन्या मार्फत ॲन्टीव्हायरस, ॲन्टीमालवेअर आणि स्पायवेअर अश्या अनेक सुविधा एकाच ॲप्लीकेशन मार्फत पुरवल्या जातात किंवा वेगवेगळ्या स्वंतंत्र ॲप्लीकेशन द्वारे उपलब्ध केल्या जातात.
हॅकिंग काय असते?
“मेलीशिअस सॉफ्टवेअर” द्वारे किंवा इतर कोणत्याही चुकिच्या पद्धतीने संगणकावरती नियंत्रण मिळवणे याला “हॅकिंग” असे म्हणतात. हॅकर्स त्यांचे उद्देश पुर्ण करण्यासाठी अश्या द्वेषपुर्ण प्रोग्रामची रचना करतात.