संगणकाच्या पिढ्या | Generation of Computers

19 व्या शतकामध्ये चार्ल्स बॅबेज यांनी स्वयंचलीत गणकयंत्राच शोध लावला आणि येथूनच खऱ्या अर्थाने संगणक युगाची सुरवात झाली. ऍ़नालिटीकल इंजिन या गणकयंत्राद्वारे गणिती प्रक्रिया वेगाने करण्यात येत असे. या गणकयंत्रामध्ये चार्लस बॅबेज यांनी काही दुरूस्त्या सुचविल्या परंतु काही तांत्रीक करणास्तव त्या सुचविलेल्या दुरुस्त्या पुर्णत्वास येऊ शकल्या नाही. त्या काळी चार्लस बॅबेज यांनी सुचविलेल्या सर्व कल्पनांचा समावेश आजच्या संगणक मध्ये करण्यात येतो. त्यामुळे चार्लस बॅबेज यांना संगणकचा जनक किंवा संगणकाचे पितामह (Father of Computer) असे म्हणतात.

Generation of Computers

एनियॅक म्हणजेच इलेक्ट्रॉनिक न्युमेरीकल इंटिग्रेटर अँन्ड कॅल्क्युलेटर ENIAC (Electrical Numerical Integrator and Calculator) या प्रकारच्या संगणकचा शोध लागला. प्राध्यापक जॉन पी. एकर्ट (John P. Eckert), व John W. Mauchly जॉन डब्लु. माऊचली यांनी एनियॅक ची रचना केली. त्या काळची ही पहीली इलेक्ट्रॉनिक कंम्प्युटिंग मशीन (Electronic Computing Machine) होती.

संगणकाच्या पिढ्या | Generation of Computers Marathi

प्रचलित ब्लॉग : मालवेअर (Malware in Marathi) म्हणजे काय? आणि मालवेअरचे प्रकार

संगणकची पहिली पिढी – 1st Generation of Computer (1940-1956)

संगणकच्या या पहिल्या पिढी मध्ये व्हॅक्युम ट्युबचा (Vacuum Tube) म्हणजेच निर्वात नळीचा वापर करण्यात आला होता. व्हॅकुम ट्युब हे आकाराने खुप मोठे व जास्त उष्णता निर्माण करीत असे. त्यामुळे याला जास्त जागा व वातानुकूलनाची (Air-condition) गरज भासायची. ही मशिन आकाराने खुप मोठी असल्याकारणाने त्याला वापरणे अवघड असायचे.

संगणकची दुसरी पिढी – 2st Generation of Computer (1956-1963)

संगणकच्या दुसऱ्या पिढीमध्ये इलेक्ट्रॉनिक्सची नवी शाखा उदयास आली त्यामुळे या क्षेत्रात बरेच संशोधन (Research) झाले व त्यातुनच व्हॅक्युम ट्युबचा पर्याय म्हणून ट्रान्झिस्टर (Transistor) चा शोध लागला. आणि त्याचा वापर दुस-या पिढीमधील संगणकमध्ये करण्यात आला. ट्रान्झिस्टर हे व्हॅक्युम ट्युब (Vacuum Tube) पेक्षा आकाराने 200 पट लहान होते. त्यामुळे संगणकचा आकाराने पुर्वीपेक्षा लहान झाला. सुरवातीस असॅम्बली लँग्वेज सारखी प्रोग्राम यात यशस्वीरीत्या वापरले जात असे.

संगणकची तिसरी पिढी – 3rd Generation of Computer (1964-1971)

संगणकच्या तिसऱ्या पिढीमध्ये ट्रान्झिस्टर (Transistor) ऐवजी आय.सी. (I.C.) चा म्हणजेच इंटिग्रेटेड सर्किट्सचा (Integrated Circuits) वापर करण्यात आलेला होता. ही इलेक्ट्रॉनिक्स् टेक्नॉलॉजी (Electronics Technology) मधील सर्वात ऍ़डव्हांस टेक्नॉलॉजी (Advanced Technology) होती. आणि येथुनच मायक्रो-इलेक्ट्रॉनिक्स (Microelectronics) ची नवी शाखा उदयास आली. आय.सी. म्हणजेच इंटिग्रेटेड सर्किट्स (Integrated Circuits) हे ट्रान्झिस्टर पेक्षा खुप लहान होते. म्हणजेच याची जागा फक्त 5 एम एम (5 M.M.) पेक्षाही लहान होती.

संगणकच्या या पिढी मध्ये साठवणीचे साधन म्हणून मॅग्नेटिक डिस्क (Magnetic Disk) व मॅग्नाटीक टेप (Magnetic Tape) चा वापर करण्यात आलेला होता. या मध्ये FORTRAN and COBOL सारखे प्रोग्राम यशस्वीरित्या वापरण्यात येऊ लागले.

कॉम्प्युटर मध्ये होत असलेले संशोधन व क्राती मुळे हार्डवेअर व सॉफ्टवेअर (Hardware and Software) सारख्या संकल्पनाचा विस्तार होत होता. काम्प्युटरची मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हार्डवेअर जसे कि-बोर्ड, मॉनिटर सारख्या साधनांचा (Devices) वापर सुरु झाला. ऑपरेटिंग सिस्टीम (Operating System) व त्याआधारीत वेगवेगळ्या प्रकारच्या सॉफ्टवेअरचा निर्मीती आणि उपयोग या पिढी मधील संगणक मध्ये केला जाऊ लागला.

संगणकची चौथी पिढी – 4th Generation of Computer (1971-Current)

संगणकच्या चौथ्या पिढीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून 10 ते 20 कंपोनेटंचा (Component) वापर एका लहान चिप वर करण्यात आला होता. तंत्रज्ञानाच्या होणाऱ्या विकासामुळे पुन्हा ऍ़डव्हांस टेक्नॉलॉजीचा (Advanced Technology) वापर करण्यात आला.

एका लहान चिपवर 100 पेक्षा जास्त कंपोनेटंची मांडणी करण्यात आली. यालाच एम.एस.आय. – मिडीयम स्केल इंटिग्रेशन (MSI–Medium Scale Integration) त्यानंतर सुधारीत तंत्रज्ञानानुसार एल.एस.आय.- लार्ज स्केल इंटिग्रेशन (LSI- Large Scale Integration) आणि व्ही.एल.एस.आय.- व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन (VLSI- Very Large Scale Integration) हे तंत्रज्ञान वापरण्यात आले. यामध्ये हजारोपेक्षा जास्त कंपोनेटची मांडणी एका चिपवर यशस्वीरीत्या बसवण्यात यश आले.

कॉम्प्यूटराच्या या चौथ्या पिढी मध्ये आंत्यांधुनिक तंत्रज्ञाने कमीत कमी जागेवर व्यापणारा मायक्रो संगणक तयार करण्यात आला. या संगणकमध्ये पॉवरफुल अश्या माक्रोप्रोसेसरचा वापर करण्यात आला. त्यामुळे विविध आकाराने लहान प्रकारचे संगणक अस्तीत्वात आले. उदा. डेस्कटॉप, लॅपटॉप ….

संगणकची पाचवी पिढी – 5th Generation of Computer (Current-Next)

संगणकची पाचवी पिढी मध्ये संगणकला स्वता:ची बुध्दी देण्याचे प्रसत्न सुरू आहेत. यामध्ये भाषा ओळखणाऱ्या यंत्रणा आणि यंत्रमानव म्हणजे रोबोट (Robot) होय.

संगणकचे प्रकार | Types of Computers

आज विविध प्रकारचे संगणक अस्तित्वात आहेत. वापरकर्ता संगणकच्या आश्यकतेनुसार आणि क्षमते नुसार वेगवेगळ्या प्रकारचे संगणक वापरत असतो. म्हणजेच संगणकची क्षमता, आकार, गति, साठवण क्षमता आणि किंमत यानुसार वापराचे परिमाण बदलत असतात. या ठिकाणी संगणकची विभागणी ही संगणकच्या कार्यानुसार, आकार व क्षमतेनूसार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते खालील प्रमाणे पाहू.

संगणकची कार्यानुसार विभागणी – Based on Working Capacity

संगणकचे त्याच्या कार्यानुसार व त्याची क्षमता व आकार (Capacity & Size) नुसार त्यांचे वर्गीकरण अनॉलॉग (Analog Computer), हायब्रिड (Hybrid Computer) व डिजीटल (Digital Computer) या प्रकारात करण्यात आले आहेत. याचा वापर विशिष्ट हेतूसाठी व विविध कार्यासाठी होत असतो.

1. अनॉलॉग संगणक

अनॉलॉग संगणक (Analog Computer) ची रचना खासकरून तापमान, हवामान खाते, दाब तसेच विविध आकडेमोड करणाऱ्या संस्थामध्ये करण्यात येऊ शकेल अशी असते. थोडक्यात याचा वापर वैज्ञानिक व इंजिनीअरींग हेतूसाठी केला जातो.

2. डिजीटल संगणक

जास्तीत जास्त संगणक हे डिजीटल संगणक (Digital Computer) असतात. यामध्ये शब्द, अंक, व चिन्ह याचा वापर विविध हेतू साठी करण्यात येत असतो. यामध्ये विविध ऍ़प्लिकेशन, इंट्रक्शनस् व माहिती लिहली, वाचली व साठवली जाते. या मध्ये सुपर, मेनफ्रेम, मिनी आणि मायक्रो संगणक असे प्रकार पडतात. याचा वापर अनेक क्षेत्रामध्ये केला जातो.

3. हायब्रिड संगणक

ऍ़नालॉग (Analog) व डिजीटल संगणकचे (Digital Computer) मिश्रण म्हणजे हायब्रिड (Hybrid Computer) संगणक होय. या प्रकारचे कॉम्प्युटर वैज्ञानिक व इंजिनीअरींग च्या हेतूसाठी वापरले जाते.

संगणकचा आकार व क्षमतेनूसार विभागणी – Based on Size and Capacity

खालील सर्व प्रकाराच्या संगणकचा समावेश डिजीटल या संगणक प्रकारात होतो.

1. सुपर संगणक

सुपर संगणक (Super Computer) हे शक्तिशाली (Powerful) स्वरुपाचे संगणक आहे. सुपर संगणकचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे मल्टीयुझर (Multiuser). या तंत्रज्ञानाचा वापर करून एका सुपर संगणकवर अनेक वापरकर्ते एकाच वेळी अनेक कार्य करू शकतात. मल्टीटास्कींग (Multitasking) म्हणजेच एकाचवेळी अनेक ऍ़प्लिकेशन / प्रोगाम वापरता येणारे तंत्रज्ञान होय. यात अनेक ए.एल.यू. (A.L.U. – Arithmetic and Logic Unit) व मायक्रोप्रोसेर्सरचा (Microprocessor) वापर करण्यात येतो. या संगणकची रचना विशिष्ट प्रकारची असते.
सुपर संगणकचा वापर औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, कंपन्या तसेच हवामान खात्यात होतो.

2. मेनफ्रेम संगणक

सुपर संगणकच्या खालोखाल मेनफ्रेम संगणकचा (Mainframe Computer) क्रम लागतो. मल्टीटास्कींग (Multitasking), मल्टीयुझर (Multiuser) व स्टोरेज (Storage) हे या संगणकचे वैशिष्टे आहेत. या संगणकची कार्य करण्याची गती व अधिक प्रमाणात डेटा हताळण्याची क्षमता असते. आकाराने या प्रकारच्या संगणकचे स्वरुप मोठे असते. या संगणकचा वापर बँक, विमा कंपनी, एअरलाईन्स व वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्रीज् व कंपनीत केला जातो.

3. मिनी संगणक/मिडरेंज संगणक

मिनी संगणकला मिडरेंज संगणक (Mini Computer or Midrange Computer) देखिल म्हणतात. याचा आकार, गती व संग्रहन क्षमता (Storage Capacity) मेनफ्रेम संगणक पेक्षा कमी जरी असली तरी मायक्रोसंगणक पेक्षा अधिक असते. या प्रकारच्या संगणकचा उपयोग व्यावसायिक संस्था, डिपार्टमेंटल स्टोअर्स व मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्रीज् केला जातो.

4. मायक्रो संगणक

मायक्रो संगणक हे आकराने टेबलावर मावतील इतके लहान असतात. हे संगणक लहान असले तरी याची साठवण क्षमता (Storage Capacity) व गती (Speed) साधारण असते. कमी किंमत त्यामुळे जास्तीत जास्त व्याक्ती/वापरकर्ते (User) मायक्रो संगणक वापरतात. तसेच या संगणक चा वापर वैयक्तिक कामासाठी होतो म्हणून याला पर्सनल संगणक (Personal Computer) पि.सी. देखिल म्हणतात.

वयक्तिक, कार्यालयीन व व्यावसायीक हेतूसाठी मायक्रो संगणक (Micro Computer or P.C.) वापरले जातात. यामध्ये वर्ड प्रासेसिंग, डेटाबेस मॅनेजमेंट, डेस्कटॉप पब्लीकेशन (Desktop Publication) सारख्या कार्यासाठी तसेच हिशोबासाठी (Calculating) जास्तीसजास्त मायक्रोसंगणकचा वापर केला जातो. तसेच मनोरंजनासाठी (Entertainment) गेम्स्, व्हीडीओ, म्युझीक या मल्टीमीडीया साधनांचा वापर व इंटरनेट जोडणी (Internet Connectivity) साठी मायक्रोसंगणकचा वापर होतो. डेस्कटॉप, लॅपटॉप नोटबुक, टेब्लेट पी.सी., आणि हॅन्डहेल्ड इ. प्रकार पडतात.

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *