चॅटजिपीटी संभाषन तंत्रज्ञानावर आधारित भाषा प्रणाली (Chat based Language System) आहे. चॅटिंग म्हणजेच संभाषन पद्धतीचा उपयोग करुन वापरकर्त्याने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर किंवा समस्याचे समाधन देण्याचे कार्य करते. आर्टीफिशअल इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये संशोधन करणा-या OpenAI.com कंपनीने ChatGPT ची रचना पायथन संगणक प्रोग्रामींग (Python Programming Language) भाषेमध्ये विकसीत केलेली आहे.
OpenAI कंपनीने 30 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वासाठी ChatGPT सेवेची सुरवात केली. GPT-3.5 आवृत्ती मोफत आहे तर GPT-4 सर्वात ॲडव्हान्सड मॉड्युल आहे जो सशुल्क सेवासह वापरता येतो. चॅटजिपीटी क्लाऊट स्टोरेज कंम्प्युटिंग तंत्रज्ञानवर आधारीत संग्रहन पद्धतीचा वापर करुन सर्व माहितीवर साठवली जाते.
अनुक्रमणिका
चॅटजिपीटी काय आहे? – What is ChatGPT Marathi?
Chat Generative Pre-Trained Transformer या शब्दाचे संक्षिप्त रुप म्हणजे चॅटजिपीटी (ChatGPT) होय. चॅटजिपीटी एक प्रकारचे चॅटबोट आहे जो प्रश्नांची उत्तरे चॅटिंग संभाषण पद्धतीमध्ये देतो. चॅटजिपीटी आर्टीफिशल इंटेलिजन्स AI तंत्रज्ञानावर आधारीत कार्य करतो. ChatGTP एक प्रशिक्षीत मॉड्युल शृखंला आहे ज्यामध्ये GPT3.5 आणि GPT-4 आवृत्ती आधारीत माहिती देणारी चॅटबोट सेवा आहे.
चॅटजिपीटी NLP, AI तसेच Deep Learning पद्धतीचा वापर करुन मनुष्या सारखे संभाषन करण्यास सक्षम होत आहे. मनुष्य जसे अनेक भाषामध्ये संवाद करतो अगदी त्यासारखेच संभाषन कौशल्य आत्मसात करुन त्याचा उपयोग करून उत्तरे देण्याची प्रणाली विकसीत करत आहेत. चॅटजिपीटी सारखे तंत्रज्ञान नैसर्गीक भाषा प्रक्रिया (NLP-Natural Language Process) आणि आर्टीफिशीअल इंटेलिजन्स (AI-Artificial Intelligence) सारख्या पयाभुत घटकांसह सक्षम कार्य करत आहेत.
नैसर्गीक भाषा प्रक्रिया (NLP-Natural Language Process) म्हणजेच मनुष्य संभाषनसाठी वापरली जाणारी प्राकर्तीक भाषा पद्ध्तीचा वापर करते. AI सारखे तंत्रज्ञान मनुष्य जसा संभाषण करतो किंवा बोलतो त्याचे अनुकरण करून भाषा, व्याकरण, शब्दरचना आणि संभाषन पद्धती समजुन त्याचे अनुकरण आत्मसात करुन स्वता:ला मानवासारखे ऊत्तरे देणारे तंत्र विकसीत करत आहेत.
चॅटजिपीटी शक्तिशाली तंत्रज्ञान म्हणुन विकसीत होत आहे. चॅटजिपीटी सुरवातीच्या प्रशीक्षण स्थितीमध्ये आहे, त्यामुळे चॅटजिपीटी मार्फत देण्यात येणारी माहिती बरोबर किंवा तर्कसंगतच असेल असे नाही यामध्ये त्रुटि असण्याचा संभावना नाकारता येत नाहीत.
चॅटजिपीटी चा अर्थ – ChatGPT Meaning in Marathi
ChatGPT दोन शब्दांचा संग्रह आहे. यामध्ये पाहिला शब्द Chat आणि दुसरा GPT आहे.
- Chat – संभाषन पद्धती
- Generative – निर्मान करणारे
- Pre-Trained – पर्व-प्रशिक्षीत
- Transformer – माहितीला समजु शकणारे प्रदाता तंत्रज्ञान
थोडक्यात विचारलेली माहिती किंवा प्रश्न समजुन डेटाबेस (माहितीचे स्त्रोत) मधील माहितीद्वारे प्रशिक्षीत प्रश्नांचे विश्लेषन करुन उत्तर किंवा परीणाम देणारे तंत्रज्ञान.
चॅटजिपीचे संकेतस्थळ – ChatGPT Website : https://chat.openai.com
चॅटजिपीटी कसे कार्य करते? – How to Work ChatGPT?
ChatGPT भाषा लॅग्वेज मॉड्युल आर्कीटेक्चर (Language Module Architecture) वर आधारीत प्रोग्राम आहे, जो प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी प्रशिक्षित केलेला प्रोग्राम आहे. याला संगणक भाषेमध्ये जनरेटिव्ह प्रि-ट्रेन्ड ट्रान्सफॉमर (Generative Pre-Trained Transformer) असे म्हणतात.
वापरकर्त्यादवारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी “Chatbot” चॅटबोट संगणक प्रोग्राम कार्य करत असतात. GPT एक प्रकारचे AI तंत्रज्ञानावर आधारीत मॉड्युल आहे, जो विचारलेल्या प्रश्नांचे किंवा माहितीचे बॅकएंडला विश्लेषन करुन प्रशिक्षणाद्वारे शिकलेल्या माहितीच्या आधारे उत्तर देण्याचे कार्य करते. परीणाम देण्यापुर्वी वेब डेटाबेस मध्ये असलेल्या माहितीच्या आधारे शब्द परिच्छेदाच्या स्वरुपात माहिती निर्मीत करतो जे विचारलेल्या प्रश्नांच्या अनुरुप असते.
चॅटजिपीटीची कार्य पद्धती एका उदाहरणाने समजुन घेऊ. चॅटजिपीटीला “संगणक म्हणजे काय?” असे प्रश्न विचारल्यानंतर त्याच्या जवळ असलेल्या डेटाबेसमधील AI तंत्रज्ञानचा वापर करुन सर्वोत्तम माहितीचे खंड निर्मीत करतो, विश्लेषन करतो, परीच्छेद म्हणजेच टेक्स्टच्या (Text and Paragraph) स्वरुपात माहिती क्रमबद्ध करून प्रस्तुत करतो. चॅटजिपीटी द्वारे देण्यात येणारी माहिती पुर्व प्रशिक्षीत असल्याकारणाने देण्यात येणारे परीणाम किंवा उत्तर अगदी कमी वेळात निर्मान (Generating) करत असतो.
हे सुद्धा वाचा…
चॅटजिपीटीचा वापर कशासाठी केला जाऊ शकतो?
ChatGPT आटीफिशील इंटेलिजन्स (Artificial Intelligence) तंत्रज्ञानावर आधारीत चॅटबोट सेवा आहे. मुख्य:त लेख, प्रश्नांची उत्तरे, भाषांतर, प्रोग्रामिंग कोड, ब्लॉग-पोस्ट सारख्या सुविधासांठी चॅटजिपीटीचा वापर हाऊ शकतो. तसेच वापरकर्ता त्यांचे प्रश्नाची उत्तरे मिळवण्यासाठी याचा उपयोग करु शकतो.
वेब आणि डेटाबेस सारख्या अनेक स्त्रोतांचा उपयोग आणि विश्लेषन करुन टेक्स्टवर आधारीत “चॅटिंग” इंटरफेस द्वारे वापरकर्त्याला हवी ति माहिती प्रस्तुत करतो. याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे….
1. संभाषन कौशल्य /शोध
चॅटजिपीटी शोध इंजिन (Search Engine) नाही परंतू विचारलेल्या माहितीचे विश्लेषन करुन त्याचे उत्तर देण्यास समर्थ आहे. वापरकर्त्या आणि चॅटजिपीटी संभाषन वैशिठ्याचा वापर करते करुन गूगल सर्च इंजिनमध्ये जसे शोधलेल्या माहितीचे निष्कर्श संकेतस्थळ आणि अनेक वेबपानांचे पर्याय सुचवतो तसे परीणाम चॅटजिपीटी मध्ये पाहता येत नाही. परंतु विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अधिक सक्षमपणे देणे याचे वैशिष्ठ्ये आहे.
2. लेखनाचा दर्जा सुधारणे
ब्लॉग, आर्टीकल, ब्लॉगचे विषय, शिर्षक, किवर्ड रिसर्च, प्रश्नोत्तरे सारखी माहिती ब्लॉग संकेतस्थळासाठी निर्मान करण्यास ChatGPT सक्षम आहे. याचा वापर करून ब्लॉग किंवा आर्टीकलचा दर्जा सुधारता येतो यामध्ये होणा-या चुका दुरुस्त करता येतात.
एखाद्या विषयावर असलेल्या मोठ्या लेखांचे सारांश तयार करण्यासाठी देखिल याचा वापर होऊ शकतो. लेख किंवा निबंध सारख्या ब्लॉग/आर्टिकलचे सारांश निर्मीती करता येऊ शकते.
3. शिक्षण क्षेत्रामध्ये
चॅटजिपीटी द्वारे विषयानुसार प्रश्नाची उत्तरे, विवरण, किंवा मदतीचा वापर शैक्षणिक क्षमता वाढवण्यासाठी करु शकतात. गणित, इंग्रजी, विज्ञान… असे अनेक विषयांची जटिला सहज सोपया पद्धतीने शिकता येऊ शकते. व्याकरण, शब्दरचना आणि स्पेलिंग चुकांची माहिती समजण्यासा मदत करु शकतो. अवघड प्रश्नांची उत्तरे सोप्या पद्धतीने व्याक्त करु शकतो.
4. भाषांतर सुविधा
कोणत्याही भाषेत उपलब्ध असलेली माहिती आपल्याला हव्या असलेल्या भाषेमध्ये बदलण्यासाठी याचा उत्तम प्रकारे वापर करता येतो. लॅग्वेज ट्रान्सलेटर म्हणजेच भाषातर वैशिष्ठयामुळे कोणत्याही माहितीचे भाषातर करण्यासाठी ChatGPT सक्षम आहे.
5. लेख/निंबध लेखन
एखाद्या विषयावरती सखोल माहिती हवी असल्यास लेख किंवा निंबधाच्या स्वरुपात माहिती मिळवता येऊ शकतो. चॅटजिपीटी वापर करुन चॅटमध्ये निबंधाचा विषय लिहून त्याचे स्वरुप कसे हवे आहे याची माहिती प्रविष्ठ केल्यानंतर संपुर्ण लेख टेक्स्टच्या स्वरुपात प्रस्तुत करतो.
6. पत्र/इमेलचे प्रारुप तयार करणे
पत्र किंवा इमेल दैनंदिन जिवनाचा महत्वाचा भाग आहे. कार्यालयामध्ये इमेल पत्रव्यावहारचे महत्वाचे माध्यम आहे. एवाद्या विषयाला अनुसरुन पत्र कसे असायला हवे त्याचे स्वरुप किंवा पुर्ण इमेलचे प्रारुप तयार करुन देण्यास ChatGPT सक्षम आहे.
7. ऍप्लीकेशन मध्ये वापर
चॅटजिपीटी चा वापर ऍप्लीकेशन मध्ये देखिल करता येऊ शकतो. जसे वेबसाईट साठी एच.टी.एम.एल. सि.एस.एस. कोड निर्मान करणे, तसेच मोबाईल आणि संगणक ऍप्लीकेशन मध्ये याचा वापर करता येऊ शकतो.
चॅटजिपीटी – Create ChatGPT Account Step-by-step Guide in Marathi
चॅटजिपीटी सेवा वापरण्यासाठी वापरकर्ता खाती (User Account) असणे आवश्यक आहे. चॅटजिपीटी संकेतस्थळाचा वापर करुन युझर उकाऊंट कसे तयार करायचे या विषयीची माहिती स्टेप-बाय-स्टेप दिली गेली आहे याचा वापर करुन तुम्ही तुमचे खाती ChatGPT ची सेवा वापरण्यासाठी करु शकता.
1. चॅटजिपीटी संकेतस्थळ
- चॅटजिपीटी सेवा वापरण्यसाठी chat.openai.com हे संकेतस्थळ ब्राऊजर मध्ये उघडा..
- होमपेज वरती “Get started” शिर्षक आंतर्गत “Log In” आणि “Sing Up” असे दोन पर्याय उपलब्ध होतात.
- लॉग इन “Log In” पर्यायाने अकाऊंट मध्ये प्रवेश करता येते तर नवीन युझर अकाऊंट तयार करण्यासाठी साईन इन “Sing Up” पर्यायाचा वापर होते.
2. चॅटजिपीटी मध्ये लॉग इन करा.
- तुमचे पर्वीच वापरकर्ता खाते (User Account) असेल तर “Log in” पर्यायावर क्लिक करा.
- लॉग इन पर्यायावरती क्लिक केल्यानंतर “Email address” सह “Continue” पर्यायाचा वापर करुन पुढच्या पायरीवरती जाता येते.
- इमेल ॲड्रेस प्रविष्ठ केल्यानंतर “Password” पासवर्ड प्रविष्ठ करुन अकाऊंट मध्ये लॉग-ईन करा.
- पासवर्ड लक्षात नसेल तर “Forgot password?” पर्यायाचा वापर करा.
- “Forgot password?” पर्यायाची निवड केल्यानंतर “Reset your password” शिर्षक आंतर्गत येणा-या “Email address” मध्ये तमचे ईमेल प्रविष्ठ करा आणि ”Continue” पर्यायाचा वापर करा.
- तुमचे इमेल अकाऊंट तपासा. ChatGPT मार्फेत पासर्वड रिसेट करण्यासंबधी इमेल संदेश तुमच्या इनबॉक्स मध्ये आलेले असेल.
- इमेल मध्ये पासवर्ड रिसेट करण्यासाठी दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
- लिंक वरती क्लिक केल्यानंतर OpenAI संकेतस्थळाच्या वेबपेजवरीज पासवर्ड रिसेट करण्याच्या सुचनांचे पालन करा.
- पासवर्ड रिसेट करण्यासाठी वेबपेजवर दोन बॉक्स दिसतील त्यामध्ये तुमचे नवीन पासवर्ड विचारपुर्वक प्रविष्ठ करा. पहिल्या बॉक्स मध्ये प्रविष्ठ केलेल पासवर्ड दुस-या बॉक्स मध्ये देखिल प्रविष्ठ करा.
- तुम्ही तुमच्या आकाऊंट मध्ये प्रवेश केलेले आहे. चॅटजिपीटी वापर करु शकता.
3. चॅटजिपीटी मध्ये नविन अकाऊंट तयार करा.
- होमपेज वरती “Get started” शिर्षक आंतर्गत “Sing Up” पर्यायचा वापर करुन नविन युझर अकाउंट तयार करा.
- साईन उप पर्यायाची निवड केल्यानंतर “Create your account” शिर्षक आंतर्गत अनेक पर्याय उपलब्ध होतो. पर्यायामध्ये इमेल ॲड्रेस, मायक्रोसॉफ्ट इमेल, गूगल इमेल आणि ॲप्पल इमेलसह नवीन युझर अकाऊंट तयार करता येते.
- इमेल ॲड्रेस च्या बॉक्स मध्ये इमेल प्रविष्ठ करुन “Continue” बटनाची निवड करा.
- पुढील पर्याय नवीन पासवर्ड प्रविष्ठ करण्याच्या सुचनेच्या अनुसार पासवर्ड प्रविष्ठ करा. आणि “Continue” बटनाची निवड करा.
- “Tell us about you” शिर्षक आंतर्गत वयक्तीक माहिती प्रविष्ठ करा. यामध्ये प्रथम आणि शेवटचे नाव विचारेल. तुमचे नाव प्रविष्ठ केल्यानंतर पुढच्या पर्यायावर जाण्यासाठी “Continue” बटनवरती क्लिक करा.
- तुमचा देश आणि तुमचा मोबाईल क्रमांक “Verify your phone number” शिर्षक आंतर्गत येणा-या बॉक्समध्ये प्रविष्ठ करा.
- वरील क्रियेमध्ये प्रविष्ठ केलेल मोबाईल क्रमांक बरोबर आहे किंवा नाही याची पडताळणी साठी तुम्ही प्रविष्ठ केलेल्या मोबाईल क्रमांकावरती “OTP or Code” पाठवेल ते तुम्हाला या बॉक्समध्से प्रविष्ठ करावे लागेल.
- तुमचे युझर अकाऊंट यशस्वीरित्या पडताळणी केल्यानंतर तुम्ही ChatGPT च्या तुमच्या अकाऊंटमध्ये लॉग इन असाल.
- तुमच्या युझर अकाऊंटसह ChatGPT च्या सर्व सेवा वापरता येतात.