यु.आर.एल. काय असतो? संपुर्ण माहिती

इंटरनेट आणि वेब सर्वांनांच परीचयाचा विषय आहे. कॉम्प्युटर आणि मोबाईल सारख्या साधनांचा वापर करुन वेब वरील माहिती प्राप्त करण्यासाठी इंटरनेट एक महत्वाचे माध्यम आहे. इंटरनेटद्वारे आपण माहितीचे अनेक स्त्रोत वापरत असतो. इमेल, वेबसाईड, फाईल शेअरींग, क्लाऊड, सारख्या अनेक सोयींचा त्यामध्ये समावेश होतो.

यु.आर.एल एक मार्ग आणि प्रोटोकॉल एक नियमावली आहे. इंटरनेटवरील बेवपेजेसचा पत्ता U.R.L. द्वारे दर्शवला किंवा ओळखला जातो आणि URL ने कश्या पद्धतीने माहितीचे वहन करावयाचे आहे ते “प्रोटोकॉल” द्वारे ठरवले जाते.

वेबसाईट पाहणे, इमेल पाठवणे आणि स्विकारणे, फाईल पाठवणे किंवा डाऊनलोड करणे या सारख्या सोयिंचा वापर करण्यासाठी त्याविषयीच्या नियमावली म्हणजेच प्रोटोकॉलची निर्मीती केलेली आहे. प्रोटोकॉलद्वारे माहितीचा सुरक्षितपणे वापर करता येतो.

कॉम्प्युटर वापरकर्ता इंटरनेट ब्राऊजर द्वारे अनेक प्रकारे वेबसाईट किंवा बेव वरील माहितीचा वापर करत असतो. इंटरनेटद्वारे वेब वरील माहिती वापरताना युआरएल, प्रोटोकॉल, डोमेन, आणि यु.आर.एल. मध्ये वापरली जाणारी सिम्बॉल / चिन्हे या सर्व घटकांची माहिती आणि त्यांची कार्यपद्धती माहिती असणे आवश्यक आहे.

what is URL marathi mahiti

यु.आर.एल. काय असतो? (What is URL Marathi) या ब्लॉगच्या माध्यमाने फक्त यु.आर.एल. विषयाची माहिती न घेता त्यासंबधील अनेक संकल्पना विस्तृत विवेचन करणार आहोत. जेणेकरुन U.R.L. च्या माध्यमाने इंटरनेट यंत्रणा कशी कार्य करते? याची माहिती होईल. या ब्लॉगचा विषय समजण्यास क्लिष्ट वाटत असला तरी रंजक आहे. तर चला या विषयामध्ये अधिक जाणून घेऊ…

वेबसाईट आणि वेबपेजेस मध्ये काय फरक आहे?

विशीष्ट विषय किंवा व्यावसाय विषयी माहिती देणारे वेब वरील माहिती/वेबपेजेसचे संग्रह म्हणजे वेबसाईट होय. वेबसाईटला आपण एका पुस्तकासारखे समजू शकतो ज्यामध्ये अनेक माहितीची पाने असतात. एका पुस्तकामध्ये जसे अनेक पानांचा समावेश असतो अगदी तसाच एका वेबसाईटवरती अनेक वेबपानांचा समावेश असतो. वेबपेजस हे कोणत्याही वेबसाईटचा माहिती देणारा महत्वाचा भाग असतो, वेबसाईट आणि वेबपेजेस दोन्ही गोष्टी मध्ये फरक असला तरी ते एकमेंकाना पुरक आहे.

थोडक्यात वेबसाईट एक प्रकारचे अनेक वेबपेजसचा संग्रह असतो. वेबपेजेस मध्ये टेक्स्ट, इमेज आणि ऑडिओ-व्हिडीओ स्वरुपाच्या माहितीचा समावेश असतो. वेबसाईटवरील पाने हायपरलिंक द्वारे एकमेंकाना जोडलेली असतात.

वेब ब्राऊजर काय असतो?

वेब ब्राऊजर एक प्रकारचे ऍप्लीकेशन आहे. इंटरनेट द्वारे वेबसाईट वरील पाने ब्राऊजर सॉफ्टवेअर मुळे पाहणे शक्य होते. कॉम्प्युटर आणि मोबाईल मध्ये वेब ब्राऊजर द्वारे अनेक वेबसाईट पाहणे, इमेल सेवा वापरणे, संगित एकणे, व्हिडीओ पाहणे, वेबसाइड वरील माहिती शोधणे असे अनेक कार्य शक्य होते.

ब्राऊजर वेबसाईटचे सचित्र किंवा आयकॉन सदृश्य माहिती प्रस्तुत करत असतो ज्याला कॉम्प्युटर भाषेमध्ये ग्राफिकल युझर इंटरफेस असे म्हणतात. वेब ब्राऊजर एक प्रकारचे वेबसाईट आणि कॉम्प्युटर मधील दुवा असतो, जो वेबसाईटवरील माहिती वापरकर्त्याला त्याच्या सुचनेनुसार दाखवत असतो.

सर्व्हर कॉम्प्युटर काय असतात?

वेबसाईट आणि त्यावरली वेब पाने शक्तीशाली कॉम्प्युटरवरती साठवलेली असतात त्याला “सर्व्हर कॉम्प्युटर” असे म्हणतात. वेबसाईड वरील सर्व डेटा (टेक्स्ट, इमेजेस, ऑडिओ-व्हिडीओ) कॉम्प्युटर मध्ये साठवलेली असतात. सर्व्हर प्रकारचे कॉम्प्युटर अखंडित इंटरनेट सेवेने जोडलेली असतात. त्यामुळे जगाच्या कोणत्याही ठिकाणावरुन या सर्व्हर वरील वेबसाईड व त्यावरील माहिती सहजपणे पाहता येतात.

एका सर्व्हर कॉम्प्युटर वरती अनेक वेबसाईड असु शकतात. प्रत्यके वेबसाईड त्याच्या युनिक नावाने ओळखली जाते. वेबसाईड वरील सर्व पाने U.R.L. द्वारे दर्शवलेली असताता. प्रत्येक पानांकरीता एक विशिष्ठ / युनिक U.R.L. निश्चीत केलेला असतो.

आपण जेव्हा एखादी वेबसाईड पाहतो तेव्हा त्या वेबसाईडवरील सर्व पाने सर्व्हर कॉम्प्युटर आपणास दाखवतो. सर्व्हर कॉम्प्युटर वरील सर्व डेटा म्हणजे वेबपेजस, इमेजेस, व्हिडीओ आणि ऑडिओ सारखी सर्व घटकांच स्थान URL द्वारे निश्चीत केलेले असतो.

यु.आर.एल. काय असतो? – URL Marathi Mahiti

युनिफॉर्म रिर्सोस लोकेटर याचे संक्षिप्त रुप म्हणजे यु.आर.एल. (URL – Uniform Resource Locator) होय. U.R.L. ला सोप्या भाषेमध्ये वेब वरील संकेतस्थळाचा पत्ता किंवा वेब-पानांचा पत्ता म्हणु शकतो. एका संकेतस्थळावर अनेक प्रकारच्या पानांची सुची असते, तसेच या पानांचा क्रम एका युनिक पत्त्याद्वारे निर्देशित केलेली असते. प्रत्यके वेबपानाचे स्वतंत्र आणि विशीष्ठ URL द्वारे त्याचे स्थान निश्चीत केलेले आसते.

URL Structure and Types

युआरएल मध्ये अनेक प्रकारच्या घटकांचा आणि चिन्हांचा समावेश असातो. एक संपुर्ण URL अनेक घटक व चिन्हांचा मिळून बनलेला असतो तसेच त्यामध्ये कोणतेही स्पेस म्हणजे रिकामी जागा सोडलेली नसते. वेबसाईडच्या U.R.L. ला बहुतेकवेळा लिंक किंवा हायपरलिंक देखिल म्हणतो.
उदा. https://www.theitworld.in/what-is-url-marathi-mahiti

What is URL Marathi Meaning?

  • U – Uniform
  • R – Resource
  • L – Locator

युआरएल चे घटक – Part of URL in Marathi

यु.आर.एल. URL मध्ये अक्षर, अंक आणि चिन्हांचा समावेश असातो, या घटकांचे अर्थ, कार्य आणि उपयोग महत्वपुर्ण आहेत तसेच URL मध्ये वापरलेल्या प्रत्येक घटक आणि चिन्हाचा वापर विशीष्ठ हेतु साठी ठरलेला असतो. URL मधील या घटकांना काय म्हणतात? यांचा उपयोग कशासाठी आणि कश्या पद्धतीने करतात? सर्व माहिती पुढील सुचिनुसार अधिक संखोलपणे जाणुन घेणार आहोत.

1. इंटरनेट प्रोटोकॉल कशाला म्हणतात? – Internet Protocol

U.R.L. आणि प्रोटोकॉल शब्द जरी लहान वाटत असला तरी त्याच्या अर्थ (URL Meaning) आणि कार्य (How URL Work?) समजण्यास किचकट स्वरुपाचे आहे. वेब वरील माहितीचे जाळे व त्यांची जटिलता सुटसुटीत आणि सुरक्षित पद्धतीने वापरता यावी यासाठी इंटरनेट नियमावलीचा वापर केला जातो ज्याला संगणक भाषेत “प्रोटोकॉल” असे म्हणतात.

थोडक्यात इंटरनेटवरील महितीचे प्रसारण करण्यासाठी ज्या नियमावलीचा वापर केला जातो त्याला “इंटरनेट प्रोटोकॉल” असे म्हणतात. इंटरनेट प्रोटोकॉल मध्ये माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी काही ठराविक नियम आणि सुरक्षेचा समावेश असतो. प्रोटोकॉल एक प्रकारचा मार्ग असतो जो एका संगणकाला दुस-या संगणकाला सुरक्षेतपणे जोडतो.

इंटरनेट प्रोटोकॉलचे प्रकार – Internet Protocol Types

1.1 FTP – फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल

वेबवरती असलेली म्हणजेच वेब सर्व्हर वर असलेली फाईल ॲक्सेस करणे म्हणजेच त्याचा वापर करणे, डाऊनलोड करणे किंवा ते पाहणे अश्या पद्धतीची कामे करण्यासाठी FTP ( File Transfer Protocol) फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलचा वापर केला जातो.
थोडक्यात वेबसर्व्हर वरली फाईल इंटरनेटद्वारे इतर संगणक वर ॲक्सेस करण्यासाठी या प्रकारच्या प्रोटोकॉलचा वापर केला जातो.

1.2 HTTP – हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल

वेब पेजेस, मल्टीमिडीया, ईमेल संदेश सारखी माहितीचे पाने इंटरनेटच्या माध्यामाने प्रस्तुत करण्याचे कार्य एच.टि.टि.पी. (HTTP – Hypertext Transfer Protocol) प्रोटोकॉल द्वारे केला जातो. या प्रोटोकॉलद्वारे फक्त वेबपेजेसच्या स्वरुपातील माहिती पाहण्यासाठी केला जातो.

कॉम्प्युटर मधील वेब ब्राऊझर्स द्वारे वेब सर्वर्स वरील वेब पेजेस दर्शवली जातात. ब्राऊजरद्वारे बेव सर्व्हर वरली माहिती प्रसारीत करण्याच्या पद्धतील किंवा नियमावलीला HTTP प्रोटोकॉल म्हणतात.

1.3 HTTPS – हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्योर

https आणि https मध्ये मुख्य फरक म्हणजे सुरक्षा होय. (HTTPS – Hypertext Transfer Protocol Secure) या शब्दाकडे लक्षर्पुवक पाहिले असता “S” हे कॅरेक्टर Security संदर्भात वापरले जाते यालाच सिक्योर कनेक्शन म्हणतात. वेब ब्राऊजर मध्ये जेव्हा URL टाईप केले असता वेबसाईटचे कनेक्शन सुरक्षित आहे किंवा नाही “https” या घटकामुळे लक्षात येते.

HTTP प्रोटोकॉल ज्या पद‌धतीचे कार्य करतो त्याच पद्धतीने HTTPS कार्य करतो. परंतू HTTPS एक सुरक्षित प्रोटोकॉल आहे, ज्यामध्ये इंटरनेटच्या माध्यमाने प्रसारित होणारी माहिती सुरक्षीत पद्धीने प्रसारीत केली जाते. HTTPS प्रोटोकॉलद्वारे प्रसारित होणारा डेटा इनक्रिप्ट स्वरुपात असतो म्हणजेच एक प्रकारे सुरक्षा लेअरद्वारे सुरक्षित केलेला असतो ज्यामुळे वेबसाईट आणि वापरकर्ता व्यातिरीक्त इतर कोणीही त्याचा वापर करणे शक्य नसते.

वापरकर्त्यांची खाते, बँकिंग, इमेल सेवा Https द्वारे सुरक्षित असताता ज्यामुळे वापरकर्त्यांची माहिती गोपनिय आणि सुरक्षित असते.

1.4 SMTP – सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल

ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल होय. इंटरनेट द्वारे ईमेल एका व्याक्तीमार्फत किंवा कॉम्प्युटर मार्फेत इतर व्याक्ती किंवा कॉम्प्युटर वर पाठवता येतात. इटरनेटचा वापर करुन पत्र किंवा संदेश पाठवणे आणि स्विकारण्याच्या नियमावलीला SMTP प्रोटोकॉल म्हणतात. SMTP – Simple Mail Transfer Protocol एक मुख्य इमेल प्रोटोकॉल आहे त्याचा उपयोग करुन जगभरातील इमेल संवाद शक्य होतो.

SMTP इमेल पाठवण्यासाठी आणि स्किारण्यासाठी उच्चस्तरीय संरचनांचा वापर करतात त्यापैकी SMTP एक सुरक्षीत इमेल प्रोटोकॉल आहे. SMTP चा वापर करुन अनेक कॉम्प्युटर इमेल संवादाचे सुरक्षित माध्यमांचा वापर करतात.

2. डोमेन नेम – Domain Name

संकेतस्थळ ज्या नावाने ओळखला जातो ते नाव म्हणजे डोमेन नेम (Domain Name) होय. डोमेन नेम एक प्रकारे संकेतस्थळाची ओळख असते. डोमेन आणि डोमेन एक्सटेन्शन सह एक पुर्ण डोमेन नेम तयार होतो. उदा. theitworld.in

2.1 डोमेन नेम सिस्टीम – Domain Name System

इंटरनेट वरील संकेतस्थळ ज्या नावाने ओळखला जातो त्याला डोमेन नेम म्हणतात. प्रत्येक डोमेन नेमचा पत्ता नंबरच्या स्वरुपात असतो ज्याला आय.पी. अॅड्रेस (उदा. 192.1.1.1) असे म्हणतात. आयपी ॲड्रेस (IP Address) हे एक प्रकारचे डोमेन नेम सिस्टीम (DNS – Domain Name System) आहे.

नंबरच्या स्वरुपामधली आय.पी. ॲड्रेस लक्षात ठेवणे सहसा अवघड असते त्यामुळे आय.पी. अॅड्रेस ला एका विशीष्ठ आणि खास नावाने दिले जाते त्याला डोमेन नेम सिस्टीम असे म्हणतात.

कॉम्प्युटर सर्व्हर डोमेन नेम चे संचालन डोमेन नेम सिस्टीमसह (IP Adress) जोडते. डोमेन नेम कॉम्प्युटर सर्व्हर मध्ये डोमेन नेम सिस्टीमसह जोडतो. कॉम्प्युटर वापरकर्ता जेंव्हा एखादी वेबसाईटला भेट देतो तेंव्हा DNS यंत्रणा कॉम्प्युटर सर्व्हर मधील डोमेन नेमचे परीवर्तन DNS मध्ये करतो. थोडक्यात IP Address चे अक्षरातील रुपाला डोमेन नेम सिस्टीम असे म्हणतात.
Domain Name > DNS > Website
www.theitworld.in > 192.1.1.1 > Website Load In Browser

2.2 डोमेन एक्सटेन्शन काय आहे? – What is Domain Extensions?

डोमेन नंतर जे .com, .in, .edu, .org, अशी संज्ञा वापरली जाते त्याला डोमेन एक्सटेन्शन म्हणतात. डोमेन एक्सटेन्शन मुळे संकेतस्थळचा विषय कश्यासंदर्भात किंवा कार्यक्षेत्र आहे हे लक्षात येते.

.com, .org, .gov .edu अशी अनेक डोमेन एक्सटेन्शची उपलब्ध आहेत. उदा. .com एक्सटेन्शन असलेली वेबसाईड व्यावसायीक (commercial) कार्यासाठी वापरली जाते. .edu एक्सटेन्शन असलेली वेबसाईड शैक्षणिक हेतुसाठी वापरली जाते.

प्रसिद्ध डोमेन नेम एक्सटेन्शन

अनु. क्र.डोमेन एक्सटेन्शनउपयोग
1..comकमरशियल म्हणजेच व्यावसायीक उपयोगसाठी वापरले जाते.
2..inफक्त भारतापुरते मर्यादित संकेतस्थळासाठी आरक्षीत (India – .in)
3..orgमंडळ किंवा संस्था
4..netइंटरेनेट सेवा व माहिती देणारी संकेतस्थळ
5..govसरकारी संकेतस्थळ उदा. – .gov.in (भारत सरकार)
6..eduशैक्षणिक शिक्षण आणि प्रशिक्षण देणा-या संस्था आणि संकेतस्थळ
7..meवयक्तीक, ब्लॉग तसेच रिझ्युमे संकेतस्थळ
8..co.inभारतीय कंपनी
9..xyzब्लॉग, व्यावसाय,‍ शैक्षणिक आणि इतर माहिती देणारे संकेतस्थळ
10..blogब्लॉग व माहिती देणारी संकेतस्थळ

3‍. सब डोमेन – ‍Sub Domain

सबडोमेन हे डोमेनचाच एक उपभाग असतो. एक डोमेन जेव्हा अनेक प्रकारची माहिती प्रदान करते तेव्हा‍ विषयानुसार त्याचे विषयानुसार विभागामध्ये विभाजन केले जाते त्याला सब डोमेन (Sub domain) किंवा डोमेन डिरेक्टरी (Domain Directory) असे म्हणतात.

व्यावसायीक, शैक्षणिक किंवा ब्लॉग संकतेस्थळ असे अनेक विषय सबंधी माहिती देत असातो तेंव्हा एकाच डोमेन आंतर्गत या सर्व गोष्ठी वापरणे अवघड जाते तेंव्हा सबडोमेनचा पर्याय वापरला जाते. सबडोमेन मुळे एका डोमेन आंतर्गत येणारी अनेक विषय वर्गीकृत करुन व्यविस्थितरीत्या मांडता येतात.

एका डोमेनच्या आंतर्गत अनेक विषय स्वतंत्र पद्धतीने मांडायची असतात तेव्हा सबडोमेन चा वापर करणे सोयीचे जाते. डोमेन नेमच्या सुरवातीस सबडोमेन कोणत्या विषयीशी संबधीत आहे ते URL मुळे सहज लक्षात येते. उदा. blog.theitworld.in किंवा quiz.theitworld.in सबडोमेनच्या दोन्ही उदाहरणामध्ये blog आणि quiz हे सबडोमेन आहे.

वर्ल्ड वाईल्ड वेब – www (World Wide Web) – वेब किंवा इंटरनेट वर जास्तीत-जास्त युआरएल मध्ये www या चिन्हांचा वापर होतो. www हे एक प्रकारचे सबडोमेनच आहे. बहुतांश वेबसाईड मध्ये www सब डोमेन डोमेन नेमच्या पुर्वी वापरण्याचे प्रचलन आहे.

4. सब डिरेक्टरी – Subdirectory

सब-डिरेक्टरीला फोल्डर देखिल म्हणतात. सबडिरीक्टरी किंवा फोल्डर हे डोमेन किंवा वेबसाईडचे विषय वर्गीकरण करण्यासाठी वापरली जाते. डोमेन नेम किंवा वेबसाईड द्वारे अनेक विषय विभागून वापरण्यासाठी या सोईचा वापर करतात. मुळ डोमेनच्या नंतर / या चिन्हांनतर सबडिरेक्टरीला किंवा फोल्डरचे स्थान URL मध्ये समाविष्ठ असते.

वेबसाईडवरील विषय वर्गीकरण करण्यासाठी सबडिरेक्टरीचा वापर करणे सोयिस्कर जाते जेणेकरुन वेबसाईड वरली विषय क्रमनुसार वर्गीकरण केले जातात.

युआरएल मध्ये वापरले जाणारे चिन्हे – Using Symbol in URL

इंटरनेट वापरताना आपण बहुतांश वेळी कि-बोर्ड वारील काही सिम्बॉल्स चा वापर करतो. कि-बोर्ड वरती अनेक सिम्बॉल्स असतात या सिम्बॉल्स पैकि काही सिम्बॉल्स अशी आहेत ज्याचा वापर नकळत इंटरनेट वापरताना आपन करतो. परंतू इंटरनेटवर वापरल्या जाणा-या या सिम्बॉल्स ला काय म्हणतात? त्याचा वापर कशासाठी केला जातो? या विषयी माहिती घेणे आवश्यक आहे.

1. डबल स्लॅश – Double Slash (//)

डबल स्लॅश हा URL-Uniform Resource Locator मधला एक महत्त्वाचा महत्त्वाचा घटक आहे. म्हणजेच वेबसाईट एक असा पूर्ण मार्ग किंवा पत्ता आहे जो कि आपण इंटरनेटच्या माध्यमाने इंटरनेट-ब्राऊझरमध्ये उघडत असतो किंवा त्याचा वापर करत असतो. या सिम्बॉल च्या शिवाय कोणतीही वेबसाईट वापरता येत नाही किंवा ती वेबसाईट होत नाही. डबल स्लॅश याचा वापर वेबसाईट मध्ये डोमेन नेमच्या पूर्वी आणि प्रोटोकॉल च्या नंतर केला जातो.

युआरएल मध्ये अनेक सिम्बॉल्स वापरलेली असतात त्यापैकीच डबल फ्लॅश हा एक महत्त्वाचा सिम्बॉल आहे जो वेबसाईड मधील पाने किंवा फाईल्स आपणास प्रदर्शीत करण्यास उपयोग करतो.
उदा. https://www.theitworld.in

URL symbol meaning in marathi

2. कोलन – Colon (:)

इंटरनेटच्या जगामध्ये वापरल्या जाणाऱ्या सिम्बॉल्स पैकी कोलन हा एक महत्त्वाचा चिन्ह/सिम्बॉल आहे. वेब वर वापरल्या जाणा-या वेबसाईटमध्ये याचा वापर कला जातो. वेबसाइटच्या डोमेन नेमच्या पूर्वी व प्रोटोकॉलच्या नंतर कोलन Colon (:) या प्रकारच्या सिम्बॉल्स वापरतात.
उदा. https://www.theitworld.in

3. डॉट – DOT (.)

सर्वसाधारणपणे कोणत्याही भाषेमध्ये किंवा ग्रामर मध्ये याला आपण पुर्णविराम असे म्हणतो. परंतू इंटरनेटच्या दष्टिने याला डॉट DOT (.) असे संबोधले जाते किंवा ओळखले जाते. कोणताही संपूर्ण युआरएल किंवा वेबसाईट हे डॉट टेंशन शिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

एखादी वेबसाईड कोणत्या कार्याशी संबधीत आहे किंवा त्याचा वापर कोणत्या हेतूसाठी केला जातो यासाठी युआरएल मध्ये एक खास रचना केलेली असते. याला डोमेन एक्सटेन्श असे म्हणतात. डोमेन नेम मध्ये . सह वेबसाईडचे एक्स्टेन्शन समाविष्ठ असते. डोमेन एक्स्टेन्शन द्वारे आपण सहज ओळखु शकतो ते संकेस्थळ कोणत्या कार्याशि संबधीत वापरले जाते. उदा. .com, .in, .edu

4. सिंगल स्लॅश – Single Slash in URL? (/)

वेबसाईटचा युआरएल जेव्हा ब्राऊझरमध्ये उघडला जातो तेव्हा त्या वेबसाईडचा होम पेज आपल्यासमोर असतो. होम पेजवर त्या वेबसाईटचा विवरण व त्या वबसाईटचा विषय असतो. होम पेज शिवाय इतर अनेक पेज त्या वेबसाईटवरती असतात. आणि हि सर्व पाने डोमेन नंतर / स्वरूपात दर्शवला जातो. म्हणजेच याचा अर्थ असा की वेबपेजच्या युआरएल यानंतर त्यामधील असलेले सर्व पाने आणि डिरेक्टरी सिंगल स्लॅश नंतर दर्शवली जातात.
उदा. https://www.theitworld.in/blog

या विषयात आज काय शिकलात?

इंटरनेटचा वापर आज सर्वच जण करतात. परंतु इंटरनेट संबधी अश्या अनेक संकपल्पना आहेत ज्याविषयीची प्रत्येकाला महिती नसेत. त्या विषयापैकिच एक विषय म्हणजे URL किंवा सोप्या भाषेत संकतेस्थळांचा पत्ता होय.

युआरएल काय असतो? प्रोटोकॉल कशाला म्हणतात? एचटीटीपी कशाला म्हणतात? व याचा वापर वेबसाईट व ई-मेल संदर्भात कसा केला जातो? या सर्वच विषयाची माहिती अगदी विस्तृत आणि सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला आहे. दिलल्या माहिती विषयी आपले मत, अभिप्राय आणि सुचनां कंमेन्ट बॉक्स मध्ये आवश्य द्या. धन्यवाद!

FAQ’s : सामान्य प्रश्न

प्रोटोकॉल काय असतो?

वेब वरील माहितीचे जाळे व त्यांची जटिलता सुटसुटीत आणि सुरक्षित पद्धतीने वापरता यावी यासाठी इंटरनेट नियमावलीचा वापर केला जातो ज्याला संगणक भाषेत “प्रोटोकॉल” असे म्हणतात.

शेअर करा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *