वेब ब्राऊजर म्हणजे काय?

वेब एक प्रकारे अनेक संकेतस्थळ आणि त्यावरील माहितीचे जाळे आहे. इंटरनेट किंवा वेब ब्राऊजर एक प्रकारचे स्त्रोत आहे जे संकेतस्थळा वरील माहितीला ॲक्सेस करण्याची सुविधा प्रदान करते. वेब ब्राऊजर काय आहे? व्यावस्थित समजण्यासाठी काही महत्वाच्या संकल्पना समजुन घेणे आवश्यक आहे.

Web Browser Basics Marathi

वेब म्हणजे काय? (What is Web?)

वेब एक प्रकारचे आंतरजाळे आहे. असंख्य संकेतस्थळ आणि त्याआंतर्गत असणा-या वेबपानांना जोडून जाळ तयार होते आणि या जाळ्यांच्या स्वरुपाला वेब असे संबोधले जाते. उदा. अनेक संकेतस्थळ आणि त्यावरील असंख्य पाने विशीष्ठ आणि खासा पत्यांद्वारे जोडलेली असतात त्या संकेतस्थळांचा सुचीबद्ध संग्रह म्हणलेच वेब असतो.

वेब ला www या संकल्पनेने देखिल ओळखले जाते ज्याचा अर्थ होतो वर्ल्ड वाईल्ड वेब (World Wide Web). वेब वरली माहितीला इंटरनेटच्या मदतीने वापरली जाते. वेब जगात प्रवेश करण्यासाठी इंटरनेट महत्वाचा दुवा असतो.

वेब पेज काय असतात? (Web Page in Marathi)

वेब पेज माहितीची अशी पाने असतात जे विशीष्ठ उद्देशाने लिहलेली आणि डिझाईन केलेली आसतात. वेब पेजेस वरील माहिती टेक्स्ट, इमेज, ऑडिओ, व्हिडीओ सारख्या घटकांच्या स्वरुपात असते. वेबपेज HTML सारख्या प्रोगा्रमिंग भाषेचा वापर करुन तयार केली जातात. प्रत्येक बेवपेज फाईलच्या स्वरुपात संकेतस्थळासह सर्व्हर संगणकावरती साठवलेली असतात. तसेच Java, CSS, सारख्या प्रोग्रामींग भाषेचा वापर वेगवेगळ्या हेतुसाठी केलेला असतो.

वेबपेज वापरण्यासाठी ठिकाण आणि वेळेच बंधन नसते. जगामध्ये कोणत्याही ठिकाणी वरुन संगणक आणि मोबाईलद्वारे वेबपेज पाहता येऊ शकतात. बेवपेज वापरण्यासाठी URL संकल्पनेचा वापर केला जातो. URL वेब पानांचा खास आणि युनिक पत्ता असतो. URL मध्ये वेबसाईट, वेबपेजच्या पत्त्यासह काही चिन्हांचा देखिल वापर केलेला असतो. SSL सुरक्षा प्रणालीसह संगणक आणि मोबाईल वरती वेबपेजेस सुरक्षितपणे वापरता येतात.

वेबसाईट काय असते? (Website in Marathi)

वेबसाईट अनेक वेबपेजेसचा संग्रह असतो. वेबपेजेस वेबसाईटच्या उद्देश आणि कार्य स्पष्ट करत असते. वेबसाईट पर्सनल आणि व्यावसायीक प्रकारची असतात. पर्सनल वेबसाईट मध्ये ब्लॉग सारख्या विशीष्ट विषयावर माहिती देणा-या वेबसाईटचा समावेश होते. व्यावासायीक वेबसाईट कंपनी किंवा व्यावासायाच्या संबधीत माहिती, विक्री, उत्पादनाची माहिती आणि सेवा संबधित माहिती प्रदान करत असते.

वेबसाईट वापरण्यासाठी ठिकाण आणि वेळेच बंधन नसते. जगामध्ये कोणत्याही ठिकाणी वरुन संगणक आणि मोबाईल द्वारे वेबसाईट पाहता येऊ शकतात. वेबसाईट वापरण्यासाठी URL संकल्पनेचा वापर केला जातो. URL वेब पानांचा खास आणि युनिक पत्ता असतो. URL मध्ये वेबसाईट, वेबपेजच्या पत्त्यासह काही चिन्हांचा देखिल वापर केलेला असतो. SSL सुरक्षा प्रणालीसह संगणक आणि मोबाईल वरती वेबसाईट सुरक्षितपणे वापरता येते.

  • आयपी ॲड्रेस – (I.P. Address) – वेबसाईटचा पत्ता विशीष्ठ अश्या अंकाच्या (192.198.1.1.) संरचने मध्ये दर्शवलेला असतो त्याला आयपी ॲड्रेस असे म्हणतात. वेबसाईट अंकामध्ये लक्षात ठेवणे अवघड असते म्हणुन त्याचे रुपांतर डोमेन नेम मध्ये केले जाते. उदा. www.example.com
  • डोमेन नेम – (Domain Name) – वेबसाईट युनिक म्हणजेच खास पत्तयाद्वारे ओळखली आणि वापरली जाते त्याला डोमेन नेम असे म्हणतात. डोमेन नेम मध्ये डोमेन एक्सटेन्शन जसे .com, .in, .org, .net … असे अनेक प्रकार असतात.
  • यु.आर.एल. – (URL) – युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर म्हणजेच URL होय. युआरएल मध्ये प्रोटोकॉल, SSL सुरक्षा, डोमेन नेम, आणि वेबपानांचा पत्ता सह काही चिन्हांचा समावेश असतो. URL एक खास पत्ता असतो जो जगामध्ये प्रत्येक पानांसाठी वेगवेगळा आणि युनिक असतो. यु.आर.एल. – URL संबधील आधिक माहिती “यु.आर.एल. काय असतो? संपुर्ण माहिती” या ब्लॉग मध्ये दिलेली आहे.
website url
  • हायपरलिंक – (Hyperlink) – वेबसाईट वरील प्रत्येक वेबपेज एकमेंकाना लिंक द्वारे जोडलेली असतात ज्याला हायपरलिंक असे म्हणतात. हायपरलिंक द्वारे ज्या संकेतस्थळा मध्ये असतो त्याला वेबसाईट असे म्हणतात. वेबसाईट डोमेन नेम आणि आयपी ॲड्रेसच्या स्वरुपात असते. उदा. www.theitworld.in

ब्राऊजींग कशला म्हणतात? (What is Browsing in Marathi?)

वेब वरील माहिती पाहणे किंवा वापरणे या क्रियेसाठी ब्राऊजींग शब्द वापरता जातो. एका वेबपेज वरुन दुस-या वेबपेजवर जाणे, माहिती वाचणे, संगित ऐकण, व्हिडीओ पाहणे या सर्व क्रिया ब्राऊजिंग या संकल्पने आंतर्गत येतात. थोडक्यात पाने चाळणे किंवा पाहणे याला ब्राऊजिंग असे म्हणतात.

वेब ब्राऊजर म्हणजे काय? (Web browser basics Marathi)

वेब आणि ब्राऊजर या दोन शब्दावरुन याचा अर्थबोध होतो. वेब वरती असलेल्या वेबसाईट पाहण्यासाठी किंवा त्यावरील माहिती वापरण्यासाठी “वेब ब्राऊजर” चा उपयोग होतो. वेब ब्राऊजर एक प्रकारचे ऍप्लीकेशन असतात जे इंटरनेट द्वारे वेबसाईट वापरण्याची सुविधा प्रदान करत असतात.

माहितीचे जाळे म्हणजेच वेब आणि वेब वरील माहिती वाचता किंवा पाहता येईल अश्या स्वरुपात बदण्याचे कार्य करण्या-या घटकाला ब्राऊजर असे म्हणतात. ब्राऊजर एक प्रकारचे ऍप्लीकेशने आहे जे इंटरनेटच्या मदतीने वापरले जाते. इंटरनेट द्वारे वेब जगामधील कोणत्याही माहिलीलस ॲक्सेस करता येते.

सारांश – वेब ब्राऊजर म्हणजे काय?

वेब एक प्रकारचे आंतरजाळे आहे. असंख्य संकेतस्थळ आणि त्याआंतर्गत असणा-या वेबपानांना जोडून तयार होणा-या जाळ्याला वेब असे संबोधले जाते. वेब ब्राउजर इंटरनेट जोडणीद्वारे संकेतस्थळ आणि त्यावरील वेबपानांची पृष्ठे डॉक्युमेंट स्वरुपात प्रदशीत करत असतो.

वेबसाईट, डोमेन, यु.आर.एल. अश्या संकल्पनेची माहिती आपण या ब्लॉग मध्ये विस्तृत पणे मांडली आहे. या विषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि सुचनांचे स्वागत आहे. धन्यवाद!

शेअर करा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *