मेमरी म्हणजेच संगणकाचे स्मृती स्थान होय. संगणकाची मेमरी डिजीटली माहितीचा संग्रह करत असते तसेच त्यावरती प्रक्रिया करण्यास सक्षम असते. मेमरीचा वापर कश्या पद्धतीने आणि कोणत्या हेतु साठी केला जातो त्या अनुशंगाने संगणक मेमरीचे दोन भागात वर्गीकरण केले जाते.
प्राथमिक मेमरी संगणकाच्या सुरवातीला वापरली जाते ज्याचे मुख्य कार्य संगणकाला प्रक्रिये साठी डेटा उवलब्ध करणे आणि सग्रह करणे असते तर दुय्यम मेमरी डेटा कायमस्वरुपी साठवण्यासाठी वापरली जाते. सेकंडरी मेमरी म्हणजे काय? (Secondary Memory in Marathi) या ब्लॉग मध्ये संगणकाच्या सेकंडरी मेमरीची माहिती पाहणार आहोत.

अनुक्रमनिका
मेमरी म्हणजे काय? (Memory Meaning in Marathi)
संगणकाचा डेटा म्हणजेच माहिती साठवण्यासाठी ज्या उपकरणांचा उपयोग होतो त्याला मेमरी असे म्हणतात. मेमरीमध्ये संगणकाचा सर्व डेटा संग्रह होत असतो. संगणकाचा डेटा 0 आणि 1 या डिजीटल स्वरुपात साठवला जातो तसेच प्रक्रिया केला जातो. संगणक मेमरीचे मुख्यत: दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते.
प्रायमरी किंवा इन्टरनल मेमरी – संगणकाद्वारे सर्वप्रथम वापरली जाणारी मेमरी म्हणजेच प्रायमरी मेमरी होय. डेटा वर प्रक्रिया करण्यासाठी डेटा साठवणे गरजेचे असते त्यासाठी प्रायमरी मेमरी उपयोगात आणली जाते. संगणकाच्या मदरबोर्ड वर आणि सिस्टीम युनिटच्या आत याचा समावेश होतो म्हणुन प्रायमरी मेमरीला इन्टरनल मेमरी (Internal Memory) देखिल म्हणतात. प्रायमरी मेमरी साधनां मध्ये रॅम आणि रोम मेमरीचा समावेश होते, जे डेटा तात्पुरत्या स्वरुपात साठवण्यासाठी केला जातो.
सेकंडरी किंवा एक्सटर्नल मेमरी – प्रायमरी मेमरी नंतर डेटा ज्या स्टोरेज साधनांमध्ये साठवला जातो त्याला सेकंडरी मेमरी स्टोरेज म्हणतात. डेटा कधीही आणि कोठेही वापरता यावा यासाठी सेकंडरी मेमरीचा उपयोग सर्वाधिक केला जातो. संगणकाच्या बाह्य भागावरती यु.एस.बी पोर्ट किंवा वायरद्वारे जाडली जाते म्हणुन या मेमरीला एक्सटर्नल मेमरी असे म्हणतात. सेकंडरी मेमरी स्टोरेज साधनांमध्ये डेटा कायमस्वरुपी साठवता येणे शक्य असते. सेकंडरी मेमरी स्टोरज मध्ये हार्ड डिस्क, सि.डी., डि.व्ही.डी., एस.एस.डी. पेन ड्राईव्ह… सारख्या साधनांचा समावेश होतो.
सेकंडरी मेमरी म्हणजे काय? (Secondary Memory in Marathi)
फाईल स्वरुपात डेटा कायमस्वरुपी साठवण्यासाठी सेकंडरी मेमरी स्टोरेज उपयोगात आणली जातात. सेकंडरी मेमरी साधने संगणकाला वायर द्वारे (Wired Connectivity) जोडली जातात किंवा यु.एस.बी. (USB Port) सारख्या पोर्टला जोडली जातात. सेकंडरी मेमरी मध्ये डेटा फाईलच्या स्वरुपात डिजीटली कायमस्वरुपी साठवता येतो, या गुणधर्मामुळे सेकंडरी मेमरीला नन-व्होलेटाईल म्हणजेच कायमस्वरुपी मेमरी असे म्हणतात.
सेकंडरी मेमरीमध्ये हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क, कॉपेंक्ट डिस्क आणि इतर रिम्युव्हेबल मेमरी साधणांचा समावेश होतो. सेकंडरी मेमरीमधील स्टोरेज साधणांचा (Storage Devices) वापर करून संगणक वापरकर्ता हा विविध स्वरूपाचा डेटा साठवत असतो किंवा स्टोअर करत असतो आणि गरजेनुसार याचा वापर करत असतो.
📜 वाचनीय ब्लॉग ….
सेकंडरी मेमरी डिव्हाईसचे प्रकार (Secondary Memory device Types)
1. फ्लॉपी डिस्क (Floppy Disk)
फ्लॉपी डिस्क (Floppy Disk) हे संग्रहणाचे साधन म्हणुन पुर्वी प्रचलीत होते. याचा वापर अनेक प्रकारे डेटा व माहितीच्या साठवणीसाठी केला जात असे. फ्लॉपी डिस्कच्या मदतीने डेटा अनेक प्रकारे वापरला जातो. फ्लॉपी डिस्क हे अनेक प्रकारच्या संग्रहन क्षमतेनुसार उपलब्ध आहेत. यामध्ये 1.44, साडे तिन इंचाची फ्लॉपी डिस्क जास्त प्रमाणात वापरली जातात.
फ्लॉपी डिस्क हे प्लास्टीकच्या आवरणामध्ये असते. या आवरणाला डिस्क जॅकेट जसे असे म्हणतात. फ्लॉपी डिस्क मध्ये मायलर प्लास्टीकचे सपाट गोलाकार तुकडे वापरले जातात. या मायलर प्लास्टीकवर मेटल ऑक्साईड फिल्मचे आवरण असते. इलोक्ट्रोमॅग्नेटिकचा भार या फिल्मवर निर्माण करून यावर डेटा लिहला जातो किंवा संग्रहित केला जातो. याच पध्दतीने पुन्हा तो संग्रहित डेटा वाचला जातो. तसेच या डिस्क मधील डेटा पुसून (Erase) दुसरा डेटा संग्रहित करता येत असे. यातील काही फ्लॉपी डिस्क एका बाजुने किंवा दोन्ही बाजुने डेटा संग्रहित किंवा लिहता येत असे.

2. हार्ड डिस्क (Hard Disk)
सेकंडरी स्टोरेज साधणांमधील महत्त्वाचे स्टोरेज साधण म्हणजे हार्डडिस्क. हार्डडिस्क सिस्टिम युनिटच्या आत मध्ये घट्ट बसवलेली असते. म्हणुन याला फिक्स्ड डिस्क (Fixed) देखिल म्हणतात. हार्डडिस्क या सेकंडरी स्टोरेज साधणांमध्ये वेगवेगळी सिस्टिम व ऍ़प्लिकेशन सॉफ्टवेअर साठवलेली (Store) असतात. ज्यांचा वापर संगणक चालु होण्यासाठी, ऑपरेटिंग सिस्टीम कार्यान्वीत करून संगणक सिस्टीम वापरता येईल असे वातावरण तयार करण्यासाठी महत्त्वाचे असते. वापरकर्ता त्याच्या अनेक प्रकारच्या फाईल्स् व फोल्डर म्हणजेच डेटा हार्डडिस्क वर साठवत असतो.
संगणकचे विविध सॉफ्टवेअर, प्रोग्राम व खुप मोठ्या प्रमाणात डेटा साठवण्यासाठी किंवा संग्रहणासाठी हार्ड डिस्क चा उपयोग केला जातो. मायक्रोसंगणक मध्ये हार्ड डिस्क चा वापर संगणकची ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजेच कार्यकारी यंत्रणा (Operating System) व अनेक प्रकारच्या प्रोग्राम व फाईलचा संग्रहनाचे माध्यम म्हणुन हार्ड डिस्क खुप प्रचलीत आहेत व वापरली जातात.
3. ऑप्टीकल डिस्क (Optical Disk)
कॉपेंक्ट डिस्क म्हणजेच सि.डी किंवा डिव्हीडी (DVD), ब्लु-रे डिस्क (Blue Ray Disk or BD) यांना ऑप्टीकल (Optical disk) डिस्क असे म्हणतात. या ऑप्टीकल डिस्कचा वापर मोठया प्रमाणावर डेटा साठवण्यासाठी होत असतो. यामध्ये विविध प्रकारचे संगित, चित्रे, चलचित्रे, व विविध प्रकारचे फाईल्सचा संग्रहासाठी किंवा साठवणीसाठी ऑप्टीकल डिस्क वापरण्यात येतात. ऑप्टीकल डिस्क मधील साठवलेला डेटा अनेक संगणक वर अनेक वेळा वापरता येतो.
ऑप्टीकल डिस्क वर डेटा साठवणीसाठी व साठवलेला डेटा वाचण्यासाठी लेझर बिम किंवा प्रकाश परिवर्तकाचा (Reflected Light) वापर केलेला असतो. ऑप्टीकल डिस्क वरील डेटा प्रकाश परिवर्तकाचा वापर करून “0” आणि “1” या संगणकीय भाषेत वाचला आणि लिहला जातो. ऑप्टीकल डिस्क ह्या साडे तिन, पावणे पाच, सव्वा पाच, आठ, आणि बारा इंच सारख्या आकारात उपलब्ध आहेत. यामध्ये पावणेपाच इंच हा सामान्यपणे वापरला जाणारा आकार आहे.
4. सॉलिड स्टेट ड्राईव्ह स्टोरेज (Solid State Drive Storage)
सॉलिड – स्टेट स्टोरेज या स्टोरेज डिव्हाईस चा वापर जलद गतिने डेटा साठवण्यासाठी व साठवलेला डेटा पुसून (Erasable) परत साठवण्यासाठी केला जातो. यामध्ये डेटा लिहण्यासाठी व वाचण्यासाठी रिड राईट हेड सारखे हलणार-फिरणारे भाग नसतात. डेटा आणि माहिती इलेक्ट्रॉनिक माध्यमातुन साठवली व पुर्नप्रस्थापित केली जाते.
5. पेन ड्राईव्ह (Pen Drive or USB Flash Drive)
पेन ड्राईव्ह / कि चेन ड्राईव्ह या सेकंडरी स्टोरजचा वापर डेटा साठवण्यासाठी व साठवलेला डेटा पुसून (Erase) परत दुसरा डेटा लिहण्यासाठी किंवा भरण्यासाठी वापरतात. या प्रकारचे सेकंडरी स्टोरज डिव्हाईस आकाराने अगदी लहान असतात म्हणुन त्यांना पेन ड्राईव्ह किंवा कि-चेन ड्राईव्ह असे म्हणतात.
पेन ड्राईव्ह किंवा कि-चेन ड्राईव्ह या स्टोरज डिव्हाईसची साठवण (storage capacity) क्षमता 1 जिबी ते 32 जिबी पर्यंत व त्यापेक्षही जास्त असु शकते. तसेच ते संगणकच्या यु.एस.बी. (USB Port) पोर्टला जोडता येतात व त्याद्वारे डेटा ट्रान्स्फर (Transfer or read and write) करता येतो.
6. एस.डी मेमरी कार्ड (SD Card or Memory Card)
एस.डी कार्ड (SD Card) किंवा मेमरी म्हणजे सिक्योर डिजीटल कार्ड होय. एस.डी कार्ड एक प्रकारची फ्लॅश मेमरी आहे .या सेकंडरी स्टोरज डिव्हाईस आकाराने अगदी लहान (small in size) प्रकारची असतात. याचा वापर डिजीटल कॅमेरामध्ये छायाचित्र व चलचित्रे (Video) साठवण्यासाठी करता येतात.
तसेच मोबाईल व आय-पॉड मध्ये देखिल फ्लॅश मेमरी वापरली जाते. एम.पी.थ्रि. (MP3) व विविध प्रकाराच्या संगित व व्हिडीओ फाईल्स् चा संग्रह (store) करून ते ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी करतात. फ्लॅश मेमरी या सेकंडरी स्टोरज डिव्हाईस ची साठवण क्षमता (storage capacity) 1 जिबी ते 32 जिबी पर्यंत व त्यापेक्षही जास्त असु शकते.