ऑप्टीकल डिस्क म्हणजे काय?

ऑप्टीकल डिस्क संगणक मध्ये डिजीटल डेटा स्टोरेज करण्यासाठी वापरले जाणारे महत्वाचे माध्यम आहे. संगणकाद्वारे डिस्कवरती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने डेटा लिहता आणि वाचता (Read & Write) येतो. ऑप्टीकल डिस्क सेकंडरी आणि पोर्टेबल स्टोरज (Portable Storage) साधन आहे.

ऑप्टीकल डिस्क एक प्रकारचे पारदर्शक आणि हार्ड प्लास्टीकची गोलाकार चकती असते. त्यावरती अगदी लहान गोलाकार (Spiral) रेषांची अच्छादलेली परावर्तीत रंगाची फॉईल लेअर असते. पॉलिकार्बोनेटची लेअर फॉईल लेअर साठी एक प्रकारची सरक्षा कवचाचे कार्य करते तसेच लेझर बिम (Laser Beam) द्वारे डेटा स्टोअर करत असते.

CD DVD Blu Ray Disk Marathi

ऑप्टीकल डिस्क म्हणजे काय? (What is Optical Disk in Marathi?)

कॉपेंक्ट डिस्क म्हणजेच सि.डी., ब्लू-रे किंवा डिव्हीडी (Compact disk or CD DVD Blu Ray Disk) यांना ऑप्टीकल (Optical disk) डिस्क असे म्हणतात. या ऑप्टीकल डिस्कचा वापर मोठया प्रमाणावर डेटा साठवण्यासाठी होत असतो. यामध्ये विविध प्रकारचे संगित (Music), चित्रे (Picture), चलचित्रे (Video), व विविध प्रकारचे फाईल्सचा संग्रहासाठी किंवा साठवणीसाठी ऑप्टीकल डिस्क (Optical disk) वापरण्यात येतात. ऑप्टीकल डिस्क मधील साठवलेला डेटा अनेक संगणक वर अनेक वेळा वापरता येतो.

ऑप्टीकल डिस्क वर डेटा साठवणीसाठी व साठवलेला (Store & Read) डेटा वाचण्यासाठी लेझर बिम (Laser Beam) म्हणजेच प्रकाश परिवर्तकाचा (Reflected Light) वापर केलेला असतो. ऑप्टीकल डिस्क वरील डेटा प्रकाश परिवर्तकाचा वापर करून “0” आणि “1” या संगणकीय भाषेत वाचला आणि लिहला जातो. ऑप्टीकल डिस्क ह्या साडे तिन, पावणे पाच, सव्वा पाच, आठ, आणि बारा इंच सारख्या आकारात उपलब्ध आहेत. यामध्ये पावणे पाच इंच हा सामान्यपणे वापरला जाणारा आकार आहे.

डिस्क ड्राईव्ह काय असतात? (What is Disk Drive?)

अनेक प्रकारच्या ऑप्टीकल डिस्क (Optical Disk), कॉम्पॅक्ट डिस्क (Compact Disk) म्हणजेच सि.डी., डि.व्हि.डी. डिस्क वाचण्यासाठी किंवा त्यावर डेटा लिहण्यासाठी/संग्रहित करण्यासाठी डिस्क ड्राईव्ह (Disk Drive) ची आवश्यकता असते. हा डिस्क ड्राईव्ह संगणकला जोडलेला असतो. डिस्क ड्राईव्ह मध्ये कॉम्पॅक्ट डिस्क (Compact Disk) Insert करून कॉम्पॅक्ट डिस्क मधील डेटा वाचता येते.

तसेच डिस्क ड्राईव्हचा वापर करून डेटा कॉम्पॅक्ट डिस्क वर लिहता देखिल येतो. डिस्क ड्राईव्हच्या क्षमतेनुसार तो आत इन्सर्ट केलेल्या कॉम्पॅक्ट डिस्क किंवा डि.व्हि.डी. डिस्क वर डेटा लिहू शकतो किंवा लिहलेला डेटा वाचू (Read) शकतो.

ऑप्टीकल डिस्कचे प्रकार (Optical Disk types)

1. कॉम्पॅक्ट डिस्क किंवा सि.डी. (Compact Disk or CD in Marathi)

कॉम्पॅक्ट डिस्क हया सि.डी. (Compact disk or CD) या नावानेही खुप प्रचलीत आहेत. अनेक प्रकारची संगित, व्हिडीओ, संग्रहीत करण्यासाठी व ते ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी याचा उपयोग होतो. वापरकर्ता (User) कॉम्पॅक्ट डिस्क मध्ये डेटा संग्रहीत (Store) करून तो अनेक वेळा वापरत असतो. तसेच अनेक प्रकारचे संगित (Music), चित्रे (Picture), चलचित्रे (Video), व विविध प्रकारचे फाईल्स्चा संग्रहासाठी किंवा साठवणीसाठी कॉम्पॅक्ट डिस्क वापरल्या जातात.

कॉम्पॅक्ट डिस्कच्या वाचण्या आणि लिहण्याचा गतिचा (Speed) विचार केला तर 24X सि.डी ड्राईव्ह (24X CD Drive) दर सेंकंदाला 7.2 एमबी (Per Second 7.2 MB) एवढा डेटा दर सेकंदाला ट्रान्स्फर (Transfer) करू शकतो. ड्राईव्ह च्या क्षमता व वेगानुसार (Capacity & Speed) सि.डी. वर डेटा त्या गतीने लिहला व वाचला (Read & Write) जातो.

कॉम्पॅक्ट डिस्क चे प्रकार (Compact Disk or CD)

1.1 सि.डी. रोम (CD-ROM – Compact Disk Read Only Memory)

सि.डी. रोम म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क रिड ओन्ली मेमरी होय. या डिस्क मध्ये साठवलेली संगीत, चलचित्रे, व अनेक प्रकारच्या फाईल्स् फक्त वाचता किंवा वापरता येतात. या प्रकारच्या सि.डी. मधील कोणताही डेटा नष्ट करता येत नाही अथवा तो पुसता (Erase) येत नाही. किंवा त्यामध्ये डेटा लिहता (Write) येत नाही. म्हणुन या प्रकारच्या डिस्कला सि.डी. रोम (CD ROM) म्हणजेच कॉम्पॅक्ट डिस्क रिड ओन्ली मेमरी (Compact Disk Read Only Memory ) असे म्हणतात.

1.2 सि.डी.आर. (CD-R Compact Disk Recordable)

कॉम्पॅक्ट डिस्क रिकॉर्डेबल (CD R – Compact Disk Recordable) म्हणुन या सि.डी.आर. (CD-R) डिस्क प्रचलीत आहेत. या प्रकारच्या डिस्क वर फक्त एकदा डेटा लिहता येतो नंतर मात्र या डिस्क वर कोणताही डेटा लिहता येत नाही किंवा लिहलेला डेटा नष्ट करता येत नाही. परंतु डिस्क वर लिहलेला डेटा अनेक वेळा वाचु शकतो व त्याचा वापर अनेक वेळा करू शकतो. म्हणुन याला वॉर्म – राईट वन्स् रिड मेनी (WORM-Write Once Read Many) असे देखिल म्हणतात.

कॉम्पॅक्ट डिस्क वर डिस्क ड्राईव्हच्या (Disk Drive) मदतीने डेटा लिहला किंवा साठवला (write or store) जातो या लिहण्याच्या व साठवण्याच्या पद्धतीला सि.डी. बर्न (CD Burn) करणे असे म्हणतात. सि.डी.आर. ड्राईव्हच्या मदतीने डेटा कॉम्पॅक्ट डिस्क लिहला जात असतो. सुधारीत तंत्रज्ञानाने मात्र आज कॉम्पॅक्ट डिस्कवरील रिकाम्या राहिलेल्या डिस्क मधील जागा परत वापरता येऊ शकते.

1.3 सि.डी.आर.डब्ल्यू. (CD-RW-Compact Disk Re-Writable)

कॉम्पॅक्ट डिस्क रि-राईटेबल म्हणजेच सि.डी.आर.डब्ल्यू. डिस्क होय. यांना इरेझेबल कॉम्पॅक्ट डिस्क (Erasable Compact Disk) देखिल म्हणतात. म्हणजेच यावरील डेटा पुसून (Erase) परत लिहण्यासाठी (write) वापरत्या येण्याजोगे ऑप्टीकल डिस्क होय.

संगणक म्हणजे काय? संपुर्ण माहिती

हार्डवेअर म्हणजे काय? प्रकार आणि कार्य

2. डिजिटल व्हर्सटाईल/व्हिडीओ डिस्क (DVD – Digital Versatile or Video Disk )

सि.डी. (CD) चा पर्याय म्हणून डि.व्हि.डी. (DVD) वापरण्यात येतात. यातील डेटा साठवणीची क्षमता ही जिबी (Storage Capacity in GB) मध्ये असते. साधारणत: सि.डी. एवढ्या आकाराच्या डि.व्हि.डी. मध्ये खुप मोठ्या प्रमाणात डेटा संगहीत केला जातो. म्हणजेच 4.7 जिबी ते 17 जिबी पर्यंत डेटा एका डि.व्हि.डी. डिस्क (DVD Disk) वर साठवला किंवा संग्रहीत करता येतो.

डि.व्हि.डी. चा वापर चांगल्या प्रतिची चलचित्रे (Video) व संगित (Music) साठवण्यासाठी (Store) केला जातो. तसेच अनेक मोठया क्षमतेचा डेटा साठवण्यासाठी डि.व्हि.डी. उपयोग करण्यात येतो. मायक्रोकॉम्प्यूटर (Microcomputer) सोबत डि.व्हि.डी. ड्राईव्ह (DVD Drive) हा असतोच या डि.व्हि.डी. ड्राईव्ह च्या मदतीने सि.डी किंवा डि.व्ही.डी. वर डेटा लिहता व वाचता (Read & Write or Burn DVD) येतो.

2.1 डि.व्हि.डी. रोम (DVD-ROM | Digital Versatile or Video Disk Read Only Memory

डि.व्हि.डी. रोम म्हणजे डिजिटल व्हर्सटाईल किंवा व्हिडीओ डिस्क रिड ओन्ली मेमरी होय. यामध्ये उत्तम प्रकारचे चलचित्रे (Video, संगीत (Music), व अनेक प्रकारच्या फाईल्स् साठवली किंवा संग्रहीत केलेली असतात. डि.व्हि.डी. रोम डिस्क मधील कोणताही डेटा नष्ट होत नाही अथवा पुसता येत नाही. तसेच त्यावर डेटा लिहता म्हणजेच (write) बर्न करता येत नाही. म्हणुन या प्रकारच्या डिस्कनां डि.व्हि.डी. रोम म्हणजेच डिजिटल व्हर्सटाईल किंवा व्हिडीओ रिड ओन्ली मेमरी डिस्क असे म्हणतात.

2.2 डि.व्हि.डी.- आर (DVD-R | Digital Versatile or Video Disk Recordable)

डिस्क ड्राईव्हच्या मदतीने डि.व्हि.डी. आर वर फक्त एकदाच डेटा लिहता (write ones) येतो. आणि तो डेटा अनेक वेळा यातील गुणवत्तेवर कोणताही परिणाम न होता बऱ्याच वेळा वाचता (Read) देखिल येतो. म्हणुनच या प्रकारच्या डि.व्हि.डी. ला डि.व्हि.डी. आर म्हणजेच डिजिटल व्हर्सटाईल किंवा व्हिडीओ डिस्क रिकॉर्डेबल असे म्हणतात.

डि.व्हि.डी.- आर प्रकारच्या डिस्क वर फक्त एकदा डेटा लिहता येतो नंतर मात्र या डिस्क वर कोणताही डेटा लिहता येत नाही किंवा लिहलेला डेटा नष्ट करता येत नाही तसेच पुसता देखिल येत नाही. परंतु डिस्क वर लिहलेला डेटा अनेक वेळा वाचु शकतो व त्याचा वापर करू शकतो.

2.3 डि.व्हि.डी.आर.डब्ल्यू., डि.व्हि.डी रि-राईटेबल, (DVD-RW | Digital Versatile or Video Disk Re-Writable)

डिजिटल व्हर्सटाईल किंवा व्हिडीओ रि-राईटेबल डिस्क म्हणजेच डि.व्हि.डी.आर.डब्ल्यू. डिस्क (DVD-RW {Digital Versatile or Video Disk Re-Writable}) होय. यांना इरेझेबल डिस्क (Erasable disk) देखिल म्हणतात. म्हणजेच यावरील डेटा पुसून परत लिहण्यासाठी वापरत्या येण्याजोगे डि.व्हि.डी. डिस्क होय. डिजिटल व्हर्सटाईल किंवा व्हिडीओ रि-राईटेबल डिस्क मध्ये डेटा अनेक वेळा लिहला व वाचला जाऊ शकतो.

सारांश

ऑप्टीकल डिस्क संगणकाचे दुय्यम संग्रहन साधन आहे. सि.डी., डि.व्ही.डी., आणि ब्लू-रे डिस्क असे ऑप्टीकल डिस्कचे मुख्य प्रकार आहेत. ऑप्टीकल डिस्कच्या प्रकार आणि संग्रहन क्षमतेनुसार याचा वापर केला जातो. संगणकामध्ये असलेल्या डिस्क ड्राईव्हच्या मदतीने डेटा वाचला जातो तसेच लिहला देखील जाऊ शकतो. ऑप्टीकल डिस्क संग्रह केलेला डेटा अनेक संगणकावरती अनेक वेळा वापरता येतो.

ऑप्टीकल डिस्क म्हणजे काय? what is Optical Disk? And its type या ब्लॉगच्या माध्यमाने ऑप्टीकल डिस्क संबधी माहिती विस्तृत पणे वर्णन केलेली आहे यासंबधी आपले काहि प्रश्न, सुचना आणि अभिप्राय असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये निश्चीत कळवा. धन्यवाद !

शेअर करा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *