हार्डवेअर म्हणजे काय? प्रकार आणि कार्य

हार्डवेअर म्हणजे काय? – Computer Hardware in Marathi

मायक्रो संगणकाचा विचार करता यामध्ये वेगवेगळया हार्डवेअरचा (Hardware) समावेश/वापर केलेला असतो. संगणकाच्या ज्या भागाला आपण पाहू शकतो किंवा स्पर्श करू (See and Touch) शकतो संगणकाच्या त्या भागाला थोडक्यात हार्डवेअर म्हणु शकतो. संगणकाचे हार्डवअर हे विजेवर (Electricity) चलणारे उपकरण असतात. म्हणुन यांना इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस देखिल (Electronic Device) म्हणतात.

Computer hardware in marathi mahiti

संगणक हार्डवेअरचे कार्यपद्धती

वापरकर्ता हार्डवेअर व सॉफ्टवअरच्या समन्वयातून कॉम्प्यूटर वापरत व हताळत असतो. वापरकर्ता हार्डवेअरचा वापर करून कॉम्प्यूटरला डेटा व सुचना देत असतो. मानवी भाषेतील डेटा व सुचना कॉम्प्यूटरच्या भाषेमध्ये बदलण्याचे कार्य हार्डवेअर डिव्हाईस सॉफ्टवेअर्स च्या माध्यमाने/मदतीने करत असतात.

उदा. डेटा व सुचनांच्या एन्ट्रीसाठी कि-बोर्ड व माऊस चा वापर होतो. तर त्या डेटा व सुचनावर प्रक्रिया करण्यसाठी सि.पि.यु. (C.P.U. – Central Processing Unit) चा वापर होतो. प्रक्रिया केलेल्या डेटा व सुचनाची माहिती दर्शवण्यासाठी मॉनिटर व प्रिंन्टर सारख्या हार्डवेअरचा वापर होतो.

प्रोसेसिंग डिव्हाईस Processing Hardware/Devices
मेमरी डिव्हाईस Memory Hardware/Devices
इनपुट डिव्हाईस Input Hardware/Devices
आऊटपुट डिव्हासेस Output Hardware/Devices

Computer Keyboard Marathi Mahiti

संगणक हार्डवेअरचे प्रकार व कार्य – Hardware Types in Marathi

Computer Hardware Name and Types in Marathi

1. सिस्टीम युनिट – System Unit

सिस्टम युनिट संगणकाचा महत्त्वाचा विभाग आहे. सिस्टम युनिट एका चौकोणी बॉक्सच्या आकारात असतो. संगणकाची महत्वाची हार्डवेअर याच्या आत बसवलेली असतात. मदरबोर्ड, मायक्रोप्रोसेसर, हार्ड डिस्क्, संगणक मेमरी, पावर सप्लाय युनिटसारखी हार्डवेअर या बॉक्स मध्ये एका संरचेनेमध्ये बसवलेली असतात. संगणक हार्डवेअर व वापरकर्त्याच्या सुरक्षेच्या कारणाने बॉक्स प्रकारच्या अवारणाने ते सुरक्षित केलेली असतात.

संगणकाचे मॉनिटर, माउस, की बोर्ड, स्पिकर, पेन ड्राइव्ह आणि प्रिंटर सारख्या हार्डवेअरला जोडण्यासाठी सिस्टीम युनिटच्या मागे जोडणीसाठी अनेक पोर्ट उपलब्ध असतात ज्या द्वारे अनेक प्रकारचे हार्डवेअर संगणकाशी जोडता येतात. संगणकाचा मुख्य वीज पुरवठा SMPS या युनिटद्वारे केला जातो ज्याची जोडणी सिस्टीम युनिटच्या मागे दिलेली असते.

सिस्टीम युनिटच्या समोरील भागावरती पॉवर स्विच असतात जे संगणक चालू आणि बंद करण्यासाठी वापरली जातात. तसेच फ्लॉपी डिस्क ड्राइव्ह, डीव्हीडी ड्राइव्ह आणि यु.एस.बी. पोर्ट दिलेली असतात.

2. मायक्रोप्रोसेसर – Microprocessor

मायक्रोप्रोसेसर म्हणजेच संगणक मधील महत्त्वाचे प्रोसेसिंग डिव्हाईस होय (Processing Device). मायक्रोप्रोसेसर मदरबोर्डच्या प्रोसेसर सॉकेट मध्ये घट्ट बसवलेले असते. डेटा व सुचना वर प्रक्रिया करण्याचे तसेच या मधील ए.एल.यु. हा भाग तर्क व गणिती प्रक्रिया सारखे कार्य करत असतो. एक प्रकारे हे मायक्रोप्रोसेसर युनिट संगणकाच्या मेंदु सारखे काम करत असते.

Microprocesser motherboard ram

3. मदरबोर्ड – Motherboard

मदरबोर्ड (Mother Board) याला सिस्टीम बोर्ड (System Board) देखिल म्हणतात. मदरबोर्ड संगणकाचा एक महत्वाचा भाग आहे. वेगवेगळ्या प्रकारची महत्त्वाची हार्डवेअर मदरबोर्डच्या मदतीने एकत्र आणली जातात. स्टोरेज डिव्हाईस, कॉम्प्यूटर मेमरी, कि-बोर्ड, माऊस … सारखे अनेक हार्डवेअर कॉम्प्यूटरशी संलग्न करण्यासाठी मदरबोर्ड आवश्यक असतो.

4. रॅम – RAM

रॅम यालाच रॅन्डम ऍ़क्सेस मेमरी (RAM-Random Access Memory) असे म्हणतात. रॅम ही कॉम्प्यूटरची तात्पुरत्या (Volatile) स्वरुपातील मेमरी म्हणुन ओळखली जाते. वापरकर्ता करत असलेले किंवा कॉम्प्यूटर वर चालु असलेले कार्य तात्पुरत्या स्वरूपात साठवण्याचे महत्त्वाचे कार्य रॅम मेमरी करत असते. रॅम मेमरीची क्षमता जितकी अधिक त्या प्रमाणात डेटा संग्रहन क्षमता जास्त असते.

5. हार्ड डिस्क ड्राईव्ह – HDD

कॉम्प्यूटर मध्ये महत्त्वाचे संग्रहनाचे (Storage Media) माध्यम म्हणुन हार्ड डिस्क (Hard disk Drive) प्रचलित आहेत. जास्त संग्रहन क्षमता व डेटा लिहण्या-वाचण्याची जलद गति या वैशिष्ट्यांनी कॉम्प्यूटरमध्ये हार्ड हे संग्रहणाचे माध्यम म्हणुन वापरले जाते.

HDD CD Monitor

6. सि.डी./डी.व्ही.डी. रोम व रायटर – CD/DVD

सि.डी./डी.व्ही.डी. डिस्क (Disk) मध्ये असणारी संगित, फिल्म, गाणी व पिक्चर हे कॉम्प्यूटर वरती पाहण्याकरीता किंवा कॉम्प्यूटरमध्ये संग्रहित (Store) करण्यासाठी सि.डी./डी.व्ही.डी. रोम याचा वापर केला जातो. तसेच वापरकर्तात्यांचा डेटा किंवा माहीती सुद्धा सि.डी./डी.व्ही.डी. रायटर चा वापर करून सि.डी. किंवा डी.व्ही.डी. डिस्क मध्ये साठवता येते.

7. मॉनिटर – Monitor

कॉम्प्यूटर वर चालु असलेल्या कार्य मॉनिटरच्या पडद्यावर (Screen) सादरीकरण करण्याचे महत्त्वाचे कार्य मॉनिटर करत असतो. टेलिव्हीजन संचासारखे याचे रुप जरी असले तरी ते खास कॉम्प्यूटरसाठी बनवण्यात आलेले आहे. कॉम्प्यूटर वर चालु असलेले कोणतेही कार्य जलद गतिने मॉनिटर पडद्यावर (Screen) सादर करतो व त्या मुळे वापरकत्याने त्यापुढे कोणते कार्य करावे ते ठरवणे यामुळे शक्य होते.

सीआरटी, एलसीडी आणि एलईडी असे अनेक प्रकारचे मॉनिटर्स आपण पाहिले असतील. मॉनिटरचा आकार, रंगाची स्पष्टता आणि पिक्सेल सारख्या अनेक वैशिष्टयामुळे ते वेगवेगळ्या प्रकारात विभागली जातात. तसेच मॉनिटरमध्ये वापरलेले तंत्रज्ञान त्यांना वेगळी ओळख देतात. वापरकर्ता त्याच्या आवश्यकता व हेतूनसार मॉनिटर निवड करत असतात. आजच्या संगणक युगात आपण LED एलईडी आणि ओ-लिड (OLED) सारखे प्रगत आणि आधुनिक तंत्रज्ञान असलेल मॉनिटर वापरत आहोत.

8. कि-बोर्ड – Keyboard

सर्वसाधारण पणे कि-बोर्ड – Keyboard हे टाईपरायटर सारखे दिसत असले तरी यावरती कॉम्प्यूटर हाताळण्यासाठी काही विशिष्ट किं म्हणजेच कळांचा वापर केलेला असतो. शब्द, संख्या, वेगवेगळी चिन्हे आणि सुचना कॉम्प्यूटरला देण्यासाठी कि-बोर्ड या हार्डवेअर चा वापर होतो. कि-बोर्ड द्वारे कॉम्प्यूटरला डेटा देतो म्हणुन याला इनपुट डिव्हाईस (Input Device) म्हणजेच आदान साधन असे म्हणतात. कि-बोर्ड वर अनेक प्रकारच्या कि म्हणजेच कळांची विशिष्ट प्रमाणे रचना केलेली असते.

Keyboard mouse printer

9. माऊस – Mouse

मॉनिटरच्या स्क्रिन वरील दिसणारे बाण (Aero) या प्रतिकावर माऊस – Mouse या हार्डवेअर साधणाचे नियंत्रण (Control) असते. एखाद्या ऑब्जेक्टच्या निवडीसाठी (Object Selecting) किंवा त्या ऑब्जेक्टच्या पर्यायासाठी (Option) माऊस वापरला जातो. मॉनिटरच्या स्क्रिन वरील बाणाच्या हालचाली व ऑब्जेक्ट निवडीवर माऊस (Mouse) नियंत्रण करत असतो. संगणकाच्या स्क्रिन वरील कोणताही भाग माऊस द्वारे सोप्या पद्धतीने वापरला जातो.

10. प्रिंन्टर – Printer

चित्र (Image & Graphics), टेक्स्ट डॉक्युमेंट (Text Document) व इतर कोणत्याही प्रकारच्या ऑब्जेक्टची प्रत कागदावर हवी असल्यास प्रिन्टर (Printer) या हार्डवेअर चा वापर केला जातो. यामध्ये रंगित व मोनोक्रोम (Colour & Monochrome) प्रकारचे प्रिंन्टर उपलब्ध आहेत.

प्रिंटर अनेक प्रकारामध्ये उपलब्ध आहेत. प्रिंटिंगच्या गरजेनुसार याची निवड केली जाते. प्रिंन्टरच्या प्रमुख प्रकारामध्ये 1. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर 2. इंकजेट प्रिंटर 3. लेझर प्रिंटर असे प्रकार पडतात. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर मध्ये काळ्या रंगाची शाई असलेले टेप किंवा रिबन वापरली जाते. इंकजेट प्रकारच्या पिंन्टर मध्ये तिन रंगाची शाई वापरली जाते जे द्रव स्वरूपात असते. लेझर प्रिंटर लेझर तंत्रज्ञानाचा वापर करुन कागदावर छपाई करतात. या प्रकारच्या पिंन्टर मध्ये रंग हे पाऊडरच्या स्वरुपात असतात.

11. एस.एम.पी.एस. – SMPS

संगणकातील पॉवर सप्लाय युनिटला एसएमपीएस (SMPS – Switch Mode Power Supply) असे म्हणतात. SMPS हा संगणक सिस्टीम युनिटचा एक महत्त्वाचा भाग आहे कारण या द्वारे उच्च व्होल्टेज एसी (AC-Analog Current) चे रुपांतर डीसी (DC-Direct Current) करंटमध्ये करतो. संगणकाच्या हार्डवेअर डिव्हासेस यांना ज्या प्रमाणात विद्युत प्रवाहाची आवश्यकता असते तितकाच विद्युत प्रवाह एसएमपीएस (SMPS) द्वारे संगणक हार्डवेअरला पुरवला जातो जो सेमीकंडक्टरद्वारे नियंत्रित केलेला असतो.

smps pendrive scanner hardware

12. पेनड्राईव्ह – Pen Drive

पेनड्राईव्हला फ्लॅश ड्राइव्ह किंवा मेमरी स्टिक देखील म्हणतो कारण ते आकाराने लहान आणि वजनाने हलकी असल्याकारणाने ते सहजपणे वापरता येते.. पेनड्राईव्ह हे एक प्रकारचे संगणकाचे लवचिक स्टोरेज डिव्हाइस आहे ज्याद्वारे डेटा संग्रहित केला जातो आणि एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर वापरला जातो. याचा वापर जास्त करुन वैयक्तिक आणि महत्वाचा डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो जो कोणत्याही कोणत्याही ठिकाणी कोणत्याही संगणका वरती वापरता येतो.

पेन ड्राइव्ह वेगवेगळ्या स्टोरेज क्षमतेचे आहेत, यामध्ये 1GB ते 1TB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. पेनड्राईव्ह ही संगणकाच्या यूएसबी म्हणजेच युनिव्हर्सल सिरीयल बस या पोर्टला जोडले जातात. या प्रकारच्या स्टोरेज डिव्हाईसे हे रि-रायटेबल असतात म्हणजेच यामधील डेटा कितीही वेळेस पुसून (Format) परत-परत वापरता येतो.

13. स्कॅनर – Scanner

स्कॅनरच्या सहय्याने एखाद्या कागदावरील शब्द किंवा चित्र स्वरूपातील माहिती स्कॅनरद्वारे (Scanner) संगणकाला समजेल व त्या माहिती वर प्रक्रिया करू शकेल अश्या स्वरुपात रुपांतरीत करीत असतो. शब्द किंवा चित्रे स्वरूपातील माहिती जशीच्या तशी संगणकामध्ये संरक्षीत किंवा स्टोअर (Save & Store) करण्यासाठी स्कॅनरचा उपयोग होत असतो.

कागदावर छापलेले माहिती आणि फोटो / प्रतिमा संगणकामध्ये घेण्यासाठी किंवा साठवण्यासाठी स्कॅनरसारखे हार्डवेअर वापरले जातात. स्कॅनर हे एक माध्यम आहे जे कागदावर छापलेली माहिती संगणक सहजपणे प्रक्रिया करु शकेल अश्या इलेक्ट्रॉनिक डेटामध्ये रूपांतरित करतो. स्कॅनरचे अनेक प्रकार आहेत त्यापैकि फ्लॅटबेड स्कॅनर आणि हँडहेल्ड स्कॅनर लोकप्रिय आहे.

पोर्टेबल स्कॅनर Portable Scanner

या प्रकारचे स्कॅनर हे हाताने धरण्याजोगे इतके लहान असतात. ते ज्या टेक्स्ट (Text) वरून किंवा इमेजवरुन (Image) फिरवले जाते तशी माहीती वाचतो. व त्या प्रकारचा डेटा/माहीती संगणकाला देत असतो.

फ्लॅटबेड स्कॅनर Flatbed Scanner

फ्लॅटबेड स्कॅनरची रचना समतल व सपाट अशी असते. एखादे पेज किंवा इमेजस्कॅनरच्या काचेच्या पृष्ठभागावर ठेवण्यात येते आणि संगणका मध्ये ते पेज किंवा इमेजस्कॅन करून घेतली जाते. जास्तीत जास्त वापरकर्ते फ्लॅटबेड स्कॅनर (Flatebed Scanner) चा वापर करतात. फ्लॅटबेड स्कॅनर च्या मदतीने इमेज व टेक्स्टपेज संगणका मध्ये सेव्ह करता येते व या द्वारे अनेक प्रति तयार करता येतात.

14. वेब कॅमेरा – Web Camera

वेब कॅमेऱ्याला व्हिडीओ कॅमेरा असेही म्हणतात, तो आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपला जोडलेला असतो, ज्यामुळे आपण व्हिडीओ कॉलिंग करू शकतो. वेब कॅमेऱ्याचा वापर करून आपण इमेज आणि व्हिडीओ डिजिटल पद्धतीने कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करू शकतो किंवा कोणाशीही शेअर करू शकतो. तसेच याचा वापर इंटरनेट व्हिडिओ कॉलिंगसाठी केला जातो. वेब कॅमेऱ्याची स्पष्टता किंवा गुणवत्ता पिक्सेलवर अवलंबून असते, ज्या वेब कॅमेऱ्याची पिक्सेल संख्या अधिक असेल तो अधिक स्पष्ट व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो.

वेबकॅमेरा (Web camera) हा एक प्रकारचा डिजीटल कॅमेरा आहे. आणि तो संगणकाला जोडलेला असतो. वेबकॅमेरा चा वापर करून स्थिर (Image) किंवा चलचित्रे (Video) घेता येतात तसेच ते आपल्या संगणक वरती साठवता येतात. आणि आपणास हव्या त्या वेळी ते इंटरनेटवर प्रकाशित करू शकतो.

web camera barcode reader digital camera

15. बारकोड रिडर – Barcode Reader

बारकोड रिडर (Barcode Reader) हे देखिल स्कॅनरचा एक प्रकार आहे. या द्वारे तो सांकेतीक (Code) स्वरूपातील माहिती वाचतो/स्कॅन (Scan) करतो व वापरकर्त्यास समजू शकेल या स्वरूपात बदलत असतो. शॉपिंग मॉल किंवा मोठ्या दुकानांमध्ये वस्तुच्या पॅकिंगवर उभ्या व आडव्या रेषा असतात. या रेषां म्हणजे सांकेतीक अंक असतात त्याला बारकोड (Barcode) म्हणतात. उभ्या व आडव्या रेषा रेषातील सांकेतीक अंक वाचण्यासाठी बारकोड रिडरचा उपयोग होतो. आणि या बारकोड मध्ये अनेक माहिती संकलीत केलेली असते.

बारकोड रिडर या यंत्रणेद्वारे एखाद्या वस्तूची किंमत, दिनांक, स्टॉक, वजन तसेच उपलब्ध साठा याची माहीती इलेक्ट्रॉनिक कॅश रजिस्टर मध्ये नोंद करता येते. त्यामूळे माहिती अद्यावत ठेवली जाते. बारकोड रिडर ला युनिव्हरर्सल प्रोडक्ट कोड (UPC – Universal Product Code) देखिल म्हणतात.

16. डिजीटल कॅमेरा – Digital Camera

स्थिर (Image) किंवा चलचित्रे (Video) घेण्यासाठी डिजीटल कॅमेराचा उपयोग होतो. डिजीटल कॅमेरेद्वारे घेण्यात आलेली स्थिर आणि चलचित्रे कॅमेरॅच्या मेमरीमध्ये (Memory) डिजीटली (Digitally) सेव्ह किंवा साठवली जातात. डिजीटल कॅमेराचा उपयोग करून काढण्यात आलेली स्थिर आणि चलचित्रे आपणास हव्या त्या वेळी आपल्या कॉम्प्यूटर वर सेव्ह करता येतात तसेच ते पाहता येत व त्यांची प्रिन्टरद्वारे प्रिंन्ट देखिल काढता येते.

17. स्पीकर – Speaker

संगणकातील ऑडिओ स्वरुपातील माहिती ऐकण्यासाठी स्पीकरचा वापर केला जातो. हे एक महत्त्वाचे ऑडिओ आउटपुट डिव्हाईस आहे या हार्डवअेरचा वापर करुन संगणकामध्ये आपण चित्रपट आणि गाणी ऐकू शकतो. लॅपटॉप सारख्या संगणकामध्ये ते इनबिल्ड दिलेली असतात तर डेस्कटॉप सारख्या संगणकावर आवश्यकतेनुसार विकत घेऊन वापरावी लागतात.

speaker microphone

18. मायक्रोफोन – Microphone

आवाज, ध्वनी व संगित (Audio, Sound, and Music) संगणकाला प्रक्रिया करता येतिल अश्या स्वरुपात रुपांतरीत करण्याचे कार्य ऑडिओ इनपुट डिव्हाईस (Audio Input Devices) करत असतात. या मध्ये मायक्रोफोन (Microphone) हे एक प्रचलित व महत्त्वाचे ऑडिओ इनपुट डिव्हाईस आहे.

मायक्रोफोनद्वारे आवाज, संगित व ध्वनि डिजीटली संगणकामध्ये स्टोअर करू शकतो व त्याचा वापर करू शकतो. याचा वापर खासकरुन ऑनलाइन संभाषणसाठी होतो. तसेच आवाज रेकॉर्ड करणे आणि संगणकाला ऑडिओ इनपुट कमांड देण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.

शेअर करा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *