कीबोर्ड म्हणजे काय? प्रकार आणि कार्य

कॉम्प्यूटरला डेटा व सुचना (Instruction) देण्यासाठी कीबोर्ड या महत्त्वाच्या इनपूट डिव्हाईसचा वापर करण्यात येतो. कीबोर्ड अनेक प्रकार आणि आकारामध्ये उपलब्ध आहेत. कीबोर्ड हे टाईपरायटर सारखे दिसत असले तरी कॉम्प्यूटरला नियंत्रण व हताळण्यासाठी करण्यासाठी यावर काही अतिरीक्त्त कि असतात. यांचा वापर करुन डेटा व इंन्ट्रक्शनस् कॉम्प्यूटरला देत असतो.

नंबर, अल्फाबेट आणि सिम्बॉल यांचा वापर करून कॉम्प्यूटरच्या कोड भाषेमध्ये इलेक्ट्रॉनिक सिग्नलस् हे कीबोर्ड द्वारे दिले जातात. तसेच संगणकातील अनेक कार्य नियंत्रित करण्यासाठीसुद्धा काहि खास प्रकारच्या किज चा समावेश कीबोर्ड वरती केलेला असतो.

Computer Keyboard Marathi Mahiti

कीबोर्ड चे प्रकार – Types of Keyboard Marathi Mahiti

कि-बोर्डचे अनेक प्रकार आज उपलब्ध आहेत. कि-बोर्डची वैशिष्टे, आकार, डिझाईन आणि तंत्रज्ञानाच्या आधारे कि-बोर्डचे अनेक प्रकारात वर्गीकरण करता येऊ शकते. थोडक्यात संगणक वापरकर्ता त्याच्या गरजेनुसार कि-बोर्ड ची निवड करत असतात. प्रचलीत व सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाणारी कि-बोर्डची यादी खालील प्रमाणे दिलेली आहे यावरुन कि-बोर्डचे वर्गीकरण वापर सहज लक्षात येईल.

1. ट्रॅडिशनल कीबोर्ड

ट्रॅडिशनल कि-बोर्ड या प्रकराच्या कि-बोर्ड चा आकार आयताकृती (Square) असून हा आकाराने मोठा असतो. याला पारंपारीक कि-बोर्ड देखिल म्हणतात. Tradition Keyboard वर फक्शन, नेव्हिगेशन न्युमेरिक व वेगवेगळ्या प्रकारच्या कि चा समावेश असतो.

2. फ्लॅक्सिबल कीबोर्ड

फ्लॅक्सिबल कि-बोड चे वैशिष्ट्ये म्हणजे आकाराने लहान असतात. तसेच या प्रकाराच्या कि-बोर्ड मध्ये फ्लॅक्सिबल (Flexible) रबराचा वापर केलेला असतो. Flexible Keyboard याची रचना अशी असते कि याला सहज गुंडाळुन कोठेही घेऊन जाता येता आणि जागाही कमी व्यापतो.

3. एरगॉनॉमिक कीबोर्ड

एरगॉनॉमिक प्रकारच्या कि-बोर्ड ची गणना पारंपारीक कि-बोर्ड मध्ये केली जात असली तरी याचा आकार थोडासा कर्व (Curve) प्रमाणात असतो. जे वापरकर्ते सारखे कॉम्प्यूटरचा वापर डेटा एन्ट्रीसाठी किंवा कि-बोर्डचा जास्त प्रमाणात वापर करतात त्यांचासाठी Ergonomic Keyboard प्रकाराच्या कि-बोर्ड ची निर्मीती करण्यात आली. कारण या प्रकाराच्या कि-बोर्ड मुळे मनगटावर ताण कमी पडतो व हताळण्यास व वापरण्यास सोईचे जातो.

नविनतम ब्लॉग – संगणक हार्डवेअर म्हणजे काय? प्रकार आणि कार्य

4. वायरलेस कीबोर्ड

या प्रकाराच्या कि-बोर्ड (Keyboard) द्वारे डेटा हे वायरलेस सिग्नल (Wireless Signals) द्वारे सिस्टिम युनिट (system Unit) पर्यंत पाठवला जातो. इतर कि-बोर्ड प्रमाणे यात जोडणीसाठी वायर किंवा केबल (Connectivity cable) चा वापर करण्यात येत नाही. कॉम्प्यूटरला डेटा देण्यासाठी या प्रकारच्या कि-बोर्ड मध्ये रेडिओ व इन्फ्रारेड (Radio & Infrared Wave) लहरींचा उपयोग करण्यात येतो. त्यामुळे Wireless Keyboard हताळण्यास सापे व सोयीचे जाते आणि ते सहज एका ठिकणाहुन दुसऱ्या ठिकाणी हलवीता येऊ शकते.

5. व्हर्च्युअल कीबोर्ड

व्हर्च्युअल कीबोर्ड एक प्रकारचे अभासी कीबोर्ड असतात. म्हणजेच Virtual Keyboard मध्ये फिजीकली हार्डवेअर कीबोर्ड एवजी सॉफ्टवेअरद्वारे निर्मीत अभासी कीबोर्डची रचना केलेली असते. कॉम्प्युटर किंवा जास्त करुन मोबाईल मध्ये या प्रकारचे कीबोर्ड वापरली जातात. टच-स्क्रिन किंवा सरफेस कंम्प्युटर डिव्हाईसेस मध्ये या प्रकारचे कीबोर्ड वापर होतो.

6. गेमिंग कीबोर्ड

Gaming Keyboard रचना आणि डिझाईन खासकरुन कॉम्प्युटर गेम खेळणा-या गेमर यांना लक्षात ठेऊन केलेली असते. कीबोर्ड वरील किज लवचिक आणि उच्च कार्यक्षमतेने वापरता येतात. किज मधील अंतर, कि-स्ट्रोक आणि रिस्पॉन्स्ट टाईम या सर्व गोष्टींची विचार करुन या प्रकारचे कीबोर्ड तयार केली जातात. तसेच कीबोर्ड पॅनल मध्ये LED लाईटस वापरली जातात जणेकरुन कमी प्रकाशामध्ये सुद्धा कीबोर्ड वरील किज सहज दिसतात.

7. मल्टीमिडीया कीबोर्ड

कॉम्प्युटर वर संगित ऐकताना किंवा व्हिडीओ पाहताना यासर्व गोष्टी कीबोर्ड द्वारे नियंत्रित करण्यासाठी कीबोर्ड वर अतिरीक्त किज दिली जातात. तसेच इंटरनेट ब्राऊजींग साठी वेगळ्या किजची रचना कीबोर्ड वर केलेली असत अश्या अतिरीक्त किज असलेल्या कीबोर्डला Multimedia or Internet Keyboard म्हणतात.

8. क्वर्टी कीबोर्ड

क्वर्टी शब्द कीबोर्ड वरती किजच्या संरचनेबद्दल वापरला जातो. कीबोर्ड लक्षपुर्वक पाहिले असता अल्फाबेटिकज किज च्या पहिली रांगेत सुरवातीचे सहा अल्फाबेट Q-W-E-R-T-Y हा शब्दा दिसतो. त्या नुसार या प्रकारच्या कीबोर्डला Qwerty Keyboard म्हणुन ओळखले जातात.

9. कि ऑब्जेक्टेड कीबोर्डचे प्रकार – Key Objected Keyboard Type

  1. 83 key’s pc & XT keyboards
  2. 84 key’s AT keyboards
  3. 101 key’s Enhanced keyboards
  4. 104 key’s Enhanced keyboards
  5. 127 key’s Enhanced Internet Ready Multimedia keyboards

कीबोर्ड चे घटक – Keyboard Part or Element

1. किज् – Key Switches

कि-बोर्ड वरील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे किज होय. संगणक नियंत्रण करणे, माहिती किंवा टेक्स्ट स्वरुपातील डेटा देण्यासाठी किज यांचा वापर होतो. कि-बोर्ड वरील बटन दाबने याला कि-स्टोक असे म्हणतात.

2. कीबोर्ड कि इंडिकेटरस् – Keyboard Key Indicator

कि-बोर्ड वरील उजव्या बाजूस न्युमेरीक कि-पॅड वरती स्टेटस इंडिकेटर (Status Indicater) असतात जे लहान लाईट च्या स्वरुपात असतात. यामध्ये न्युम लॉक, कॅप्स् लॉक आणि स्क्रॉल लॉक हे डावीकडुन उजवीकडे या स्वरुपात असतात. कि-बोर्ड वरील न्युम लॉक, कॅप्स् लॉक आणि स्क्रॉल लॉक या (Num lock, Caps locks & Scroll lock) कि चा उपयोग करुन त्या कि साठींच्या असलेले सुविधा चालू किंवा बंद करता येतात. कि साठींच्या सुविधा चालू असल्यास स्टेटस इंडिकेटरची लाईट चालू स्वरुपात दिसेल.

  • Num Lock
  • Caps Lock
  • Scroll Lock

3. कीबोर्ड कनेक्टेव्हिटी – Connectivity Type

संगणकाला माहिती देण्यासाठी कि-बोर्ड संगणकाला जोडणे आवश्यक आहे. जोडणी दोन प्रकारची असतात. 1 वायरद्वारे जोडणी 2. वायरलेस जोडणी.

  1. वायर जोडणी
    कॉम्युवाटरला कि-बोर्ड जोडणीसाठी सहसा वायरद्वारे जोडली जातात. या प्रकारला Wired Connectivity असे म्हणतात. PS-2 किंवा USB पोर्ट द्वारे कि-बोर्ड कॉम्युलाटरला जोडली जातात.
  2. वारयलेस जोडणी
    Wireless Connectivity मध्ये कॉम्युत्टरला कि-बोर्ड जोडणी साठी रेडिओ लहरींचा वापर होतो. इन्फ्रारेट, ब्लुटूथ किंवा वाय-फाय प्रकारच्या वारयलेस जोडणीचा समावेश होतो. कॉम्यूडलटरला डेटा देण्यासाठी रेडिओ लहरीद्वारे वर आधारीत तंत्रज्ञानाचा वापर होतो.

कीबोर्ड किज्-कॅटेगरी

कीबोर्ड वरील किं ची चार कॅटेगरी मध्ये विभागण्यात आले आहे.

computer keyboard Layout

1. अल्फाबेटिकल किज्

कॉम्प्यूटरला फक्त शब्दांच्या (Alphabetical) स्वरूपात डेटा देण्यासाठी कि-बोर्ड वरील Alphabetical Keys चा वापर केला जातो. यात 26 अल्फाबेट चा वापर करण्यात येतो. या मध्ये कॅपिटल व स्मॉल अश्या अल्फाबेटचा समावेश असते. ते A-Z, a-z

2. स्पेशल कॅरेक्टर

स्पेशल कॅरेक्टर (Special Character) हे सुद्धा अल्फाबेटिकल किज् (Alphabetical Key’s) मध्ये गणले जातात. यात काही खास चिन्हांचा वापर करण्यात येतो. जसे !,#,$,%,&,*…..etc आणि याचा वापर खास हेतूसाठी करण्यात येतो.

3. न्युम्येरीक किज्

0-9 या 10 अंकाचा (Number or Digit) वापर कि-बोर्ड वर करण्यात येतो. त्याला नंबर (Number) देखिल म्हणतात. या नंबर किंवा अंकाच्या स्वरुपातील किज्ना न्युम्येरीक किज् (Numeric Key’s) असे म्हणतात. उदा. 12, 01, 125, 89575…..etc

4. फंक्शनस् कि

फंक्शनस् कि (Function Key) ला प्रोग्रामेबल किज् (Programmable Key) देखिल म्हणतात. याद्वारे कॉम्प्यूटर चे सिस्टिम व ऍ़प्लिकेशन सॉफ्टवेअर हताळणे सोपे जाते. ऑपरेटिंग सिस्टिम व ऍ़पलीकेशन सॉफ्टवेअर (System & Application Software) मध्ये या कि वेगवेगळया हेतूसाठी वापरले जातात. तसेच यांचे वेगवेगळ्या ऍ़प्लिकेशन मध्ये वेगवेगळे वापर आहेत.

F1, F2, F3……F12 पर्यंतच्या किज् ह्या फंक्शनस् किज् (Function Key) म्हणून गणल्या जातात. या प्रत्येक कि चे कार्य ऍ़प्लिकेशन नुसार वेगवगळे व स्वतंत्र असे आहे.

5. नेव्हिगेशनल किज्

कि-बोर्ड वर एरो (Arrow) म्हणजेच बाणाच्या स्वरुपामध्ये असणाऱ्या किज् यांना नेव्हिगेशनल किज् (Navigational Keys) असे म्हणतात. यामध्ये अप, डाऊन, लेफ्ट व राईट या चार प्रकारच्या दिशाबाण किज् (Arrow Keys) चा समावेश असतो.

वर्ड प्रोसेसिंग ऍ़प्लिकेशन मध्ये कर्सर ची दिशा बदलण्यासाठी किंवा विशिष्ट शब्द व ओळिंवर जाण्यासाठी यांचा वापर केला जातो. तसेच वेगवेगळ्या ऍ़प्लिकेशन मध्ये या किंज् साठीचे राखीव कार्य करता येऊ शकतात. ऍ़प्लिकेशन च्या आवश्यकतेनुसार यांचे वेगवेगळे उपयोग आहेत.

6. स्पेशल कि

ऑपरेटिंग सिस्टिम व ऍ़पलीकेशन सॉफ्टवेअर (System & Application Software) मध्ये स्पेशल कि (Special Key) वेगवेगळ्या कारणसाठी व हेतू साठी वापरले जातात. यामध्ये शिफ्ट, इंटर, कंट्रोल आणि अल्टरनेट कि, एक्सेप कि, टॅब कि, स्पेस बार कि इत्यादी. किज् चा समावेश होतो.

7. टॉगल किज् – Toggle Keys

साधारणपणे कि-बोर्डवर उजव्या भागा (Left Section) मध्ये वरती अनुक्रमे न्युम लॉक, कॅप्स् लॉक, व स्क्रॉल लॉक साठीच्या सुविधा (Facility) बंद किंवा चालु असलेल्या लहान लाईट च्या स्वरुपामध्ये दर्शवले जाते. याला स्टेटस इंटिकेटर असे म्हणतात. न्युम लॉक, कॅप्स् लॉक, व स्क्रॉल लॉक साठीच्या सुविधा चालु असल्यास स्टेटस इंडिकेटरची लाईट चालू स्वरुपात दिसेल किंवा सुविधा चालू नसतील तर स्टेटस इंटिकेटर चि लाईट बंद स्वरुपात असतील.

कि-बोर्ड वरील न्युम लॉक, कॅप्स् लॉक आणि स्क्रॉल लॉक या (Num lock, Caps locks & Scroll lock) कि चा उपयोग करुन त्या कि साठींच्या असलेले सुविधा चालू किंवा बंद करता येतात.

8. कॉम्बीनेशन किज्

कॉम्बीनेशन किज् हे इतर किज् च्या सहाय्याने वापरली जातात. यामध्ये दोन किंवा तिन किज्चा एकत्र (Combination Keys) वापर केला जातो. यामध्ये कमांड व मेनुसाठीचे शॉर्टकट (Shortcut) म्हणुन याचा वापर होतो. यामध्ये कंट्रोल कि, शिफ्ट कि, अल्ट कि ई.

9. कर्सर कंट्रोल किज्

कर्सर टेक्स्ट (Text Cursor) म्हणजेच टायपिंग ब्लिंकिंग मार्क (Blinking Mark) जो पुढील शब्दांच्या एन्ट्रीसाठी टेक्स्ट पोझीशन (Text Position) दर्शवतो त्या Cursor Control Keys वापर करुन त्याबद्दलचे पोझीशन ठरवता येतो. टेक्स्ट मोड मध्ये होम, एन्ड, पेज अप, पेज डाऊन इ. किज् चा वापर होतो.

10. विंन्डोज् किज्

विन्डोज ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये खास प्रकारे विन्डोजच्या कार्यासाठी राखीव (Reserve) ह्या कि-बोर्ड किज् आहेत. यामध्ये विन्डोज किज् (Windows Key)´É राईट बटन किज् (Right Button Keys) यांचा समावेश होतो.

विंन्डोज किज चा वापर करून स्टार्ट मेनु मध्ये प्रवेश करता येतो तर राईट बटन किज् चा वापर निवडलेल्या ऑब्जेक्टच्या पर्याया साठी (Options) होतो.

शेअर करा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *