ब्लॉग पोस्ट कसे लिहावे? | Blog Writing Marathi

ब्लॉग पोस्ट कसे लिहावे? (How to Blog Writing Marathi) या प्रश्नासह त्यांची उत्तरे घेऊन आज प्रस्तुत आहोत. ब्लॉगिंग श्रृखंले मधील ही दुसरी पोस्ट आहे. ब्लॉग लेखन कश्या पद्ध्तीने असायला हवे आणि यामध्ये कोणते घटक महत्वाचे असतात त्या विषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ब्लॉग लेखनासाठी आवश्यक असणारी पायाभुत माहिती आपण या ब्लॉग मध्ये घेणार आहोत.

blog writing marathi information

ब्लॉगचा विषय कसा निवडावा ? How to define Blog Topic?

ब्लॉग ची सुरवात करण्यापुर्वी एक गोष्ठ लक्षात घ्या ब्लॉग एक असा व्यासपीठ आहे ज्यावरती एखाद्या विषयानुसार (Subject wise) लिहले जाते, विषयानुसार वाचले जाते. इंटरनेट वरती आजपर्यंत अनेक संकेतस्थळ पाहिले आहेत. प्रत्येक संकेतस्थळ एखाद्या विशीष्ठ विषयावर आधारीत असतात आणि त्या संकेतस्थळ वरील ब्लॉग पोस्ट त्या विषयाच्या उप-विषया वरती लिहलेले असतात.

उदा. तंत्रज्ञान विषयावर आधारीत संकेतस्थळ मध्ये इंटरनेट, संगणक, ॲप्लीकेशन, ब्राऊजिंग, , माहिती तंत्रज्ञान… असे कितीतरी विषयावर सखोल लेखन (Detailed Writing) आणि माहिती दिली जाते. असे विषयावरती लिहणा-या संकेतस्थळांना माहिती तंत्रज्ञान ब्लॉग (Technology Blog) म्हणतात.

सर्वप्रथम ब्लॉग ची सुरवात करण्यापुर्वी तुम्ही तुमच्या ब्लॉगचा विषय निवडा. विषय निवडण्यापुर्वी तुमची त्या विषयात आवड, तुमचे त्या विषयासंबधी ज्ञान, कौशल्य याची तपासणी करा. जर तुम्ही कुठे कमी पडत असाल तेव्हा त्या विषयावर वाचन करा. इतर ब्लॉग ते विषय कश्या पद्धतीने मांडतात, त्यांची लिहण्याची पद्धत अभ्यासा जणेकरुन तुम्ही तुमच्या लिखाणात सुधारणा करु शकता. प्रत्येक व्याक्ति/लेखकाची लिहण्याची शौली वेग-वेगळी आणि खास असते म्हणुन स्वता:ची शैली निर्मान करा, इतरांची शैली किंवा लिखाण कॉपी करु नका.

ब्लॉगचे शिर्षक कसे निवडावे – Define Blog Title

ब्लॉगचा विषय निवडल्यानंतर त्या विषयानुरुप त्याचे शिर्षक (Blog Title) निवडणे गरजेचे असते. कारण संपुर्ण ब्लॉग त्याच्या शिर्षकाद्वारेच ओळखले जाते. जसे एखदा व्याक्ती त्याच्या नावाने ओळखला जातो.

ब्लॉग लिहण्यापुर्वी ब्लॉगसाठी योग्य असा शिर्षक विचारपुर्णक निवडा जेणेकरुन वाचकांना तुम्ही लिहलेल्या ब्लॉग मध्ये कोणत्या संदर्भात माहिती दिलेली आहे याचे ज्ञान होईल. शिर्षक विषयानुसार, कमी शब्दांमध्ये आणि अर्थपुर्ण (Meaningful) असावा.

शिर्षक म्हणजे फक्त ब्लॉगचे टायटल किंवा शिर्षक नसुन संपुर्ण ब्लॉग मध्ये वापरण्यात येणा-या माहितीचे उप- शिर्षकामध्ये केलेले वर्गीकरण असते. प्रत्येक उप-शिर्षकाचा प्रकार व त्यांचा क्रम त्या शिर्षक आंतर्गत येणा-या माहितचे व्यावस्थिकरण (Arrangement) दर्शवतो. शिर्षकानुसार विषय व त्यांचा क्रम किंवा प्रकार-उपप्रकार समजण्यास सापे जाते.

Blog outline marathi information
ब्लॉगची रुपरेषा Blog Structure and Blog Outline | Blog Writing Marathi

ब्लॉगची रुपरेषा – Blog Outline/Blog Structure

ब्लॉग कसे लिहावे? आणि ब्लॉग कसे दिसावे? हे दोन्ही गोष्ठी वेगवेगळ्या आहेत. ब्लॉग लिहण्यामध्ये लेखकाचे कौशल्य, लिहण्याची पद्त, शब्दांचा वापर आणि वाचनाची सरलता याचा समावेश असतो. ब्लॉगचे शिर्षक, उप-शिर्षक, चिंत्रांचा वापर या सर्व दिसणा-या गोष्टी असतात. यांची रचना सुद्धा महत्वाची असते. या सर्वांची ठेवण (Arrangement) म्हणजेच त्या ब्लॉगची रुपरेषा (Outline) होय.

ब्लॉग लेखन Blog Post Marathi Writing

ब्लॉग लिखानाला सुरवात करण्यापुर्वी तो विषय कश्या पद्धतीने मांडायचा आहे याचा सराव करा. तुम्हाला मराठी टायपिंग (Typing) जमत नसेल तेव्हा त्यासाठी अनेक ऑनलाईन सुविधा (Online Services) उपलब्ध आहेत.

Google voice translation

1. गूगल टान्सलेट – मराठी टायपिंग

मराठी टायपिंग करीता “गूगल टान्सलेट” च्या स्पिच ट्रान्सलेटचा (Speech Translation) वापर करा. या विषयीची माहिती “गूगल ट्रान्सलेट Google Translate – भाषांतराचा सोपा मार्ग” या ब्लॉग मध्ये दिलेली आहे त्याचा वापर करा.
https://translate.google.co.in/

2. गूगल इनपुट साधने – Google Input Tool

https://www.google.com/intl/mr/inputtools/try/गूगल इनपुट साधने” या साधन /टुलचा (Google Input Tool) वापर करुन इंग्रजी शब्दांमध्ये टाईपिंग करा त्याचे रुपांतर मराठीत होईल. हे टायपिंग टुल वापरणे जरी सोपे असले तरी तुमची टाईपिंग गती (Typing Speed) उत्तम असणे गरजेचे आहे.

Google input tools

ब्लॉगचे लिखान पुर्ण झाल्यांनंतर तो परत एकदा वाचा त्यामध्ये काही चुका (Error) आहेत का? ते तपासा त्यामध्ये सुधारणा (Editing) करा. जोपर्यंत ब्लॉगचे लिखान समाधानकारक (Satisfactory) वाटत नाही तो पर्यंत सुधारणा करत रहा. कोणाचेही ब्लॉग परीपुर्ण नसतात त्यामध्से काहीतरी उणिवा हे असतातच परंतू त्या उणिवा जितक्या होतील तितक्या कमी करण्याचा पयत्न करा.

ब्लॉग विषयाची सुरवात – Writing Blog Subject

ब्लॉगची सुरवात त्या विषया संबधी संक्षिप्त माहिती देणारी असावी. त्यामध्ये कोणत्या विषयावर आधिक लिहले गेलेले आहे याची प्रचिती येते. ब्लॉगची सुरवात अधिक प्रभावशाली (Impressive) असावी जेणेकरुन वाचकांना ते आवडेल. शब्दांची रंचना, पॅराग्राफची मांडणी, भाषेची शैली दर्जेदार असावी.

सर्व वयोगटातील व्याक्ती, कोणताही व्यावसाय किंवा नौकरी करणा-या व्याक्तिंना सहज वाचता व समजता येईल अशी लिखाणाची पद्धत वापरा. ब्लॉग लिहताना एक गोष्ट लक्षात घ्या ज्या विषयावर तुम्ही लिहीत आहात तो विषय तुमच्यासाठी सोपा आहे परंतू वाचकांना नाही. म्हणून अगदी सोष्या भाषेमध्ये तुमचे विषय मांडण्याचा प्रयत्न करा.

मुख्य लेखन आणि पॅराग्राफ रायटिंग – Content Writing

पॅराग्राफ या इंग्रजी शब्दामधील “ग्राफ” या शब्दावरुन लक्षात आले असेल किं तुमच्या लेख/ब्लॉगचा आलेख म्हणजेच “पॅराग्राफ”. लेख मधील सर्व माहितीचा समावेश असतो. ब्लॉग मध्ये येणा-या प्रत्येक प्रश्न व विषयांचे खंड (Part) तयार करा त्याचे रुपांतर परिच्छेद (Paragraph- पॅराग्राफ) मध्ये करा जेणेकरुन तुमचा विषय क्लिष्ट (Difficult) न करता मुद्देसुद (Meaningful) पणे मांडता येईल. यामुळे वाचकांना तुम्ही लिहलेल्या ब्लॉगचा आशय वाचताना सहज लक्षात येईल.

एका परिच्छेद/पॅराग्राफ मध्ये 200 ते 300 शब्दांचा समावेश करा. पाच ते सहा ओळीं (Line) पर्यंत एक परिच्छेद पुर्ण करा त्यापेक्षा मोठे परिच्छेद टाळा. परिच्छेदाचे विशीष्ट असे मानक नाहीत कि इतक्याच ओळीत किंवा शब्दात असावे ते सर्वथा लेखक आणि वाचक यांच्या वरती अवलंबुन असतात. परंतु खुपच लांब-लचक परिच्छेद वाचताना डोळ्यांना त्रास होतो त्यामुळे वयक्तिकरित्या मला परिच्छेद लहान असलेलेच योग्य वाटतात.

ब्लॉगचा समारोप – Conclusion of Blog

ब्लॉगची समाप्ती किंवा समारोप (Conclusion) संपुर्ण लेखाच्या सारांशाने (Summaries) केलेले केव्हाही उत्तम. सारंश हे त्या संपुर्ण ब्लॉगचे अगदी कमी शब्दांमध्ये केलेली उजळणी (Revision) असते. ब्लॉगचा समारोप करताना काही वेळेस प्रश्नोतर (FAQ) किंवा त्या ब्लॉग मध्ये तुम्ही काय शिकलात? (What you Learn) अशी प्रश्न व त्यांची उत्तरे देऊनही करु शकता.

ब्लॉग मध्ये इमेज, कॅटेगरी व टॅगचा वापर

How to use Images, Categories and Tag in Blog

ब्लॉग पोस्ट कसे लिहावे (How to write blog Marathi) या ब्लॉग मध्ये लेखना संबधी आपण खुप चर्चा केली. लेखना व्यातिरीक इतर असे अनेक घटक आहेत जे महत्चाचे आहेत. त्याचा वापर कश्या पद्धतीने केला जातो? इमेज म्हणजेच चित्र, कॅटेगरी व टॅग ब्लॉग मध्ये कश्या पद्धतीने वापरतात याची माहिती घेऊ.

चित्रांचा / इमेजचा वापर – Using Feature or Blog Relevant Images

इमेजेस किंवा चित्र (Images or Picture) तुमच्या ब्लॉगची शोभा वाढवतात म्हणजे याचा अर्थ असा नाही कि कोणत्याही प्रकारच्या चित्राचा सामवेश तुम्ही ब्लॉग मध्ये करु शकता. ब्लॉगच्या विषय आणि संबध असलेल्या इमेजचा वापर करुन तुम्ही अधिक प्रभावी (Impressive) ब्लॉगची रचना करु शकता.

1. इमेजचे प्रकार – Types of Images

इमेज अनेक प्रकारची आहेत त्याच्या प्रकारनुसार त्यांचा वापरही तसा खास असतो. इमेज प्रकार पैकिं .jpg, .png, .gif या प्रकारच्या इमेजेच सर्वात जास्त वापर होतो. .jpg प्रकारच्या इमेजे ची पार्श्वभुमी अपारदर्शी आणि रंगामध्ये असते तर .PNG प्रकारच्या इमेजेस पारदर्शी पार्श्वभुमी असलेल्या असतात. .PNG प्रकारची इमेजेस वेबपानांसाठी वापरतात तसेच .JPG इमेजेचाही वापर होतो. .GIF इमेजेस हे चलचित्र म्हणजेच ॲनिमेटेड स्वरुपाची असतात.

इंटेनेटवरील पाने कमी गती असलेल्या इंटरनेट वर सुद्धा लवकर उघडता यावी म्हणुन ते वजनाने हलकी ठेवण्याकरीता काही खास प्रकारची इमेजेस तयार केली गेली. पैकिं .jpg, .png, यांचा सर्रास वापर केला जातो.

2. फिचर इमेजेस – Feature Images

फिचर इमेजेस (Feature Images) म्हण्सजेच ब्लॉगचे वैशिष्टये किंवा आशय (Meaning) स्पष्ट करणारी चित्र होय. या प्रकारच्या इमेजेस मध्ये ब्लॉगचा शिर्षक (Title) व त्यांसंबधी चिन्हे (Symbol), इतर चित्रे व वेगवेगळ्या फॉन्ट शैलिचा (Font Effect) वापर करुन त्यांना आकर्षक (Decorative) व अर्थपुर्ण स्वरुप दिले जाते.

फिचर इमेजेस यांना थंबनेल (Thumbnail) सुद्धा म्हणतात. फिचर इमेजेस निवडताना बॉगचा पुर्ण आशय समजूनच त्याला योग्य अर्थबोध होईल असे चित्र निवडा. फिचर इमेज ब्लॉगसाठी एकच असतो म्हणून गरज नसताना कोणतेही आणि कितीही चित्र ब्लॉगमध्ये ठासु नका. इमेजेच चा जास्त वापर तुमच्या वेबपांनाची गती कमी करु शकतो त्यामुळे वाचकांना त्या गोष्टीचा त्रास होईल. एक ब्लॉगर म्हणुन तुमची जबाबदारी आहे कि वाचकांचे अनुभव खराब होतो कामा नये.

3. ब्लॉग संबधित इमेजेस – Blog Related Images

ब्लॉगमध्ये सर्व गोष्टी शब्दांमध्ये सांगणे किंवा मांडणे शक्य नसते. शब्द आणि पॅराग्राफ वाचून कोणालाही कंटाळा येईल. तुमचे लेखन फक्त शब्दांपुरते मर्यादित न ठेवता त्याचे रुपांतर सचित्र माहिती मध्ये करा. ज्या ठिकाणी ब्लॉगचा आशय शब्दांमध्ये सांगणे शक्य नसतो तेव्हा इमेजेस द्वारे सहज व सोष्या पद्धतीने मांडता येते.

चिंत्रांचा वापर फक्त ब्लॉग सुंदर करण्यसाठी न करता ब्लॉग सबंधीत माहिती देण्यासाठी करा. उदा. संगणक काय आहे? असा प्रश्न असेल तेव्हा संगणक संबधी संपुर्ण माहिती लिहा आणि त्यासोबत संगणकाचे चित्र त्याच्या साधना सहीत दर्शवा. अश्या प्रकारची माहिती वाचकांना अधिक आकर्षक करते आणि लवकर समजते देखिल.

जोडणी किंवा हायपरलिंक – Hyperlink

एक बेवपेज जेव्हा दुस-या पेजला जोडला जातो त्याला हायपरलिंक (Hyperlink) असे म्हणतात. पेजेस एकमेकांना जोडणे म्हणजे हायपरलिंक! एखादे शब्द, वाक्य किंवा चित्र यांना जोडणी देऊन ते इतर पानांवरती वळवणे (Redirect) किंवा घेऊन जाणे.

ब्लॉगमध्ये स्वता:च्या संकेतस्थळावरील एका वेबपान इतर वेबपानांशी जोडतो किंवा बेवपेजेस जेव्हा एकमेकांना जोडली जातात त्याला आंतर्गत जोडणी किंवा इनटरनल लिंकींग (Internal Linking) म्हणतात.

इतर दुस-यांच्या संकेतस्थळा मधील वेबपानांना हायपरलिंक द्वारे स्वता:च्या ब्लॉगमध्ये जोडतो त्याला बाह्य किंवा एक्सटर्नल लिंकींग (External Linking) असे म्हणतात.

हायपरलिंक द्वारे ब्लॉगर अनेक मार्ग तयार करत असतो किंवा सुचवत असतो जे इतर माहितीच्या स्त्रोतापर्यंत (Source) घेऊन जात असतात. इंटरनेटच्या जगामध्ये हायपरलिंक संकल्पननेला खुप महत्व आहे. याची चर्चा पुढील ब्लॉग श्रृखले मध्ये “ॲडव्हान्ड ब्लॉग राईटिंग” मध्ये करणार आहोतच.

कॅटेगरी – Categories

आपल्या संकेतस्थळावर अनेक विषयावर पोस्टस् लिहलेली असतात, तसेच एका विषयावर अनेक पोस्टस च्या माध्यमाने माहिती दिली जाते. एखाद्या विशीष्ठ विषय असलेले अनेक पोस्ट एकच विषयाला अनुसरुन असतील तेव्हा कॅटेगरी (Category) द्वारे ते एकत्र आणले जाते. अनुक्रमे त्या पोस्टची एक सुची List तयार केली जाते आणि त्याला विषयानुसार नाव दिले जाते त्या दिलेल्या नावालाच आपण कॅटेगरी असे म्हणतो. थोडक्यात श्रेणी किंवा प्रकार यालाच इंग्रजीमध्ये कॅटेगरी म्हणतात.

कॅटेगरीचा मुख्य उद्देश (Intention) एकाच विषयावरील अनेक पोस्ट सुचीबद्ध् (Listing) करुन एकत्र (Collection) आणणे असतो. वाचकांची आवड असलेले त्या विषयाची सर्व पोस्ट एकत्र मिळतात जेणेकरुन वाचकांना त्या विषयावरील पोस्ट शोधण्याचा त्रास सहन करवा लागत नाही.

कॅटेगरी तुमच्या संकेतस्थळाला सुचिबद्ध रचना (Structure) प्रदान करते. एका ब्लॉगरच्या दृष्टीने कॅटेगरी खुप महत्वाच्या असतात. एकच विषय असलेल्या पोस्टयांची अनुक्रमणिका किंवा एक विषय असलेला पोस्टचा समूह तयार करता येतो जो वाचकांसाठी दिशादर्शक (Navigational) असतो.

टॅग – Tags

टॅग आणि कॅटेगरी दोन्ही वेगवेगळे व स्वंतत्र अर्थाने वापरली जातात. टॅग (Tag) हे शब्दांची रुपरेषा (Framework) असते. टॅग एक सुचक (Indicative) शब्द असतात जे ब्लॉग मधील महत्वाचे शब्द किंवा वारंवार वापरले जाणारे शब्द असतात. असे शब्द त्या ब्लॉगचा मुख्य आधार असतो.

उदा. “ब्लॉग” हा शब्द आपण टॅग म्हणून वापरला असेल तर ज्या काही पोस्ट मध्ये ब्लॉग संबधी माहिती दिली असेल त्या सर्व पोस्टचे टॅग म्हणुन “ब्लॉग” हा शब्द म्हणुन वापरतो. वाचक जेव्हा “ब्लॉग” या टॅगची निवड करतो तेव्हा या शब्दाचे टॅग ज्या-ज्या पोस्टमध्ये वापरले आहे ते पोस्ट किंवा ब्लॉग यांची यादी आपल्या समोर प्रस्तुत (Present) करतो.

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *