ब्लॉग म्हणजे काय? What is Blog in Marathi?

ब्लॉग म्हणजे काय? What is Blog in Marathi? ब्लॉगर कोण असतो? Who is Blogger? ब्लॉगिंग काय असते? What is Blogging in Marathi? ब्लॉगिंगचे प्रकार ? Types of Blogging? अशी अनेक प्रश्न आपल्या समोर निर्मान झालेली असतात. म्हणून ब्लॉगच्या या मालिकेद्वारे (Series) ब्लॉग व ब्लॉगिंग संबधीची विस्तृत माहीती आम्ही सादर करत आहोत. निश्चीतच आमचा हा प्रयत्न तुमच्या सर्व प्रश्न व शंका यांचे निराकरण करेल अशी आशा करतो.

ब्लॉग चा इतिहास

17 डिसेबर 1997 साली जोर्न बर्गर (Jorn Barger) द्वारा वेबलॉग (Weblog) या शब्दांचा वापर केला गेला. ब्लॉग Blog शब्द वेबलॉग Weblog या शब्दांचे संक्षिप्त (Short form) रुप आहे. पीटर मरहोल्ज (Peter Merholz) यांनी 1999 मध्ये peterme.com या संकेत स्थळावर “ब्लॉग” या शब्दाचा सर्वप्रथम वापर केला होता. आणि तेव्हापासुनच ब्लॉग हे शब्द वेब वरील लेख या संदर्भात प्रचलित झाले.

इंटरनेटच्या सुरवातीस सन 1990 च्या सुमारास एक अश्या व्यासपीठाची संकल्पना (Concept) उद्यास आली ज्या ठिकाणी लोक त्यांचे ज्ञान, विचार, अनुभव व माहितीची देवाण-घेवाण करु शकतील. जरी संकल्पना लहान असली तरी त्या संकल्पनेचा आशय खुप मोठा होता. या लहानश्या संकल्पनेचे रुपांतर नंतर ब्लॉग सारख्या मोठ्या व्यासपीठ (Platform) मध्ये झाले.

ब्लॉग या‍संकल्पनेची सुरवात होण्यापुर्वी व्याक्ति त्यांचे विचार व मत मांडण्यासाठी वर्तमानपत्र, पुस्तके किंवा मासिकांचा आधार घेत असत. याची जागा आता इंटरनेट वर आधारित “ब्लॉग” या संकल्पनेनी घेतलली घेतली आहे.

what is blog in marathi
अनुक्रमणिका दर्शवा

ब्लॉग म्हणजे काय? – What is Blog in Marathi?

एखाद्या विषयावर केलेले लेखन किंवा लिहलेली माहिती (Article) म्हणजेच ब्लॉग होय. ब्लॉग म्हणजे ख-या अर्थाने इंटरनेट किंवा वेब वर प्रकाशित केली जाणारी माहीतीचे पाने असतात. ब्लॉग म्हणजे दैनिक किंवा विशीष्ठ कालावधी मध्ये प्रकाशित केली जाणारी वाचन सामग्री असते. वाचकांसाठी ब्लॉग च्या माध्यमाने एखाद्या विषया संबधी माहीतीची श्रृखंला Series प्रस्तूत केलेली असते. याला वेब-लॉग (WebLog) देखिल म्हणतात.

ब्लॉग अशी इलेक्ट्रॉनिक पाने (Electronic Page) असतात जे इंटरनेटच्या माध्यमाने प्रकाशित केली जातात. ब्लॉग हे अनेक विषय असलेल्या पानांचा संच असतो, जशी वेगवगळे विषयाचीं पाने एका पुस्तकात असतात.

ब्लॉग मध्ये लेख (Article), चित्र (Images), चलचित्र (Videos) आणि बाह्य दुवे म्हणजेच इतर वेबसाईडच्या लिंक (External Link) यांचा समावेश असतो. ब्लॉग मध्ये या सर्व सामग्रींचा वापर केला जातो जेणेकरुन त्या ब्लॉगचा आशय व हेतू (Purpose) स्पष्ट होतो.

कोणीही ब्लॉग लिहू शकतो?

तुम्हाला ब्लॉगिंगचा (Blogging) छंद (Interest) आहे? तुम्हाला आवडणा-या विषयात तुम्ही निपुर्ण (Perfect) आहात? तुम्ही दर्जेदार लिहू (Quality Writing) शकता? तुमच्या ज्ञानाला इतरासोबत सामायिक (Share) करायची इच्छा आहे? या सर्व प्रश्नांची उत्तर हो असेल तर तुम्ही ब्लॉग लिहू (Blog Writing) शकता.

तुम्ही एक ब्लॉगर म्हणून तुमचे भविष्य या क्षेञामध्ये घडवू शकता. तसेच ब्लॉग लिहण्यासाठी काही प्रमाणात इंटरनेट, संगणक व साफ्टवेअरचे ज्ञान आवश्यक आहे.

ब्लॉगर कोण असतो?

ब्लॉग लिहणारा लेखक (Writer) म्हणजे ब्लॉगर होय. लेखक हा ब्लॉगचा महत्चाचा भाग आहे कारण एक लेखकच असतो जो एखाद्या ब्लॉगच्या विषयाची सविस्तर माहीत लिहत असतो. ब्लॉग चा विषय, त्या विषयाचे ज्ञान, लिहण्याची शैली (Writing Style) व माहिती मांडण्याचे कौशल्य (Writing Skill) हे ब्लॉगर ची जमेची बाजू असतो.

ब्लॉगिंग म्हणजे काय असते? – Blogging in Marathi?

वेगवेगळ्या विषयावर ब्लॉग च्या माध्यमाने सतत लिहत राहणे आणि ते प्रकाशित करणे यालाच ब्लॉगिंग असे म्हणतात. ब्लॉग द्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत एखाद्या विषयावर माहिती देत राहणे ब्लॉगिंग मुळ उद्देश असतो.

बॉगचा विषय निवडणे, ब्लॉगची शब्दावली, लिहण्याची पद‌धत, माहितीचे स्त्रोत (Source of Information), चिंत्रांचा वापर अश्या अनेक बांबींची नियाजनपुर्व मांडणी (Formatting) करुन एक परीपुर्ण ब्लॉग तयार होते, वरील सर्व प्रकियेलाच ब्लॉगिंग म्हणु शकतो.

पोस्ट आणि पाने/पेज काय असतात?

पोस्ट म्हणजे लेख किंवा माहीतीचे पानावरील स्वरुप (Page Layout) होय. एका विशीष्ठ बेव-पानांवर त्याविषयीचा लेख म्हणजे पोस्ट होय. थोडक्यात ब्लॉगर द्वारे एखाद्या विषयावर एकत्र केलेली माहीती ज्या बेव-पानांवर प्रदर्शीत केली जाते त्याला पोस्ट What is Post and Page? असे म्हणतात.

ब्लॉग मध्ये पेज हे एका खास हेतूसाठी वापरली जातात. जसे ब्लॉगचे मुख्यपृष्ठ (Blog’s Homepage), संपर्क (Contact Page), स्वता:ची माहिती देणारे पेज (About us page), अशी अनेक पाने जे ब्लॉग-पोस्ट नाहीत त्यांना त्या ब्लॉगचे पेज असे म्हणतात.

Guide of Blog Writing Marathi

ब्लॉगची दुसरी श्रृंखला….

ब्लॉग पोस्ट कसे लिहावे?

ब्लॉगसाठी विषय कसा निवडावा?

तुम्हाला ज्या विषयाचे ज्ञान आहे, तुमची आवड, छंद, तुमची रुची असलेल्या कोणताही क्षेत्र हा तुमच्या ब्लॉगसाठी एक उत्तम विषय असु शकतो. ब्लॉगचा विषय निवडताना How to choose Topic for Blog? एक गोष्ठ लक्षात ठेवा जो विषय तुम्ही निवडलेला आहे त्यावर तुम्हाला उत्तम रित्या लिहता येणे जरुरी आहे.

तुम्ही ब्लॉगिंगला सुरवात करत आहात तेव्हा सोपे व साधारण विषय निवडा. जेणकरुन तुम्हाला संपुर्ण ब्लॉगची मांडणी करण्यामध्ये कोणतीही समस्या निर्मान होणार नाही.

ब्लॉगचे विषय – Types of Blog

आजपर्यंत अनेक विषयावर ब्लॉग प्रकाशित झालेले आहेत आणि होत आहेत. ब्लॉग कोणत्याक विषयावर उपलब्ध आहेत याची सुची (List) व माहिती खाली देत आहोत. सुचिममध्ये दिलेल्या एखादा विषय तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या ब्लॉग साठी तो विषय निवडु शकता. निश्चीतच या माहितीने तुमच्या ज्ञानात अजून भर पडेल.

Types of Blog

1. शैक्षणिक ब्लॉग ‍

शैक्षणिक ब्लॉग (Educational Blog) चा मुख्य हेतू ज्ञान देणे किंवा शिक्षा देणे असतो. पर्यावरण, विज्ञान, इतिहास, सामाजिक, आर्थिक… असे अनेक विषयावर लिहले जाते. शाळा-महाविघालये, प्रशिक्षण संस्था, तसेच त्या-त्या विषयावे तज्ञ मंडली मार्फत शैक्षणिक ब्लॉग लिहली जातात. शैक्षणिक माहीती, अध्ययन, संबधी माहीती देण्याचे देण्याचे कार्य करतात.

2. फोटोग्राफी ब्लॉग

फॉटोग्राफीची ब्लॉगला (Photography Blog) फोटोब्लॉग किंवा फोटोलॉग या नावाने देखिल ओळखतात. पर्यावरण, प्राणी, पक्षी, एतिहासीक स्थळे… किंवा असे कोणतेत्यही विषयाचे फोटो जे सामायिक व प्रकाशित केली जातात त्याला फोटोग्राफी ब्लॉग म्हणतात. फॉटोग्राफीची आवड असणारे लोक फोटो व त्याच्या संबधीत वर्णनाचा यामध्ये समावेश करतात.

3. व्यावसायीक ब्लॉग

व्यावसायीक ब्लॉगचा (Business Blog) वापर त्यांची विक्री वाढवण्यासाठी करत असतात. उत्पादन केलल्या वस्तुंची माहिती संदर्भात सविस्तर लेख लिहतात. वाचकांना अश्या ब्लॉगच्या आधारे त्या उत्पादना विषयी माहिती दिली जाते.

4. पाककला ब्लॉग

पाककला ब्लॉग (Recipes Blog) खुप प्रसिद्ध आहेत. स्वादिष्ट आणि रुचक जेवन कसे बनवावे? नव-नविन व्यंजन बनवण्यिाचा पद्धती, व आहारासंबधी माहिती ज्या ब्लॉग मध्ये दिलेली असते त्याला पाककला ब्लॉग म्हणतात.

5. फॅशन डिझाईनिंग ब्लॉग

फाईफ स्टाईल, वेषभुषा, फॅशन, ट्रेंन्ड यांची अद्यावत माहीती या प्रकारच्या ब्लॉग (Fashion Design Related Blog) मध्ये दिलेली असते. आजच्या युवा पिढी मध्ये या प्रकारच्या ब्लॉग मध्ये अधिक रुची आहे.

6. प्रवास वर्णनावर आधारित ब्लॉग

गढ, किल्ले, प्रेक्षणिय स्थळे, किंवा प्राथनास्थळे सारख्या कोणताही ठिकाणचा केलेला प्रवास व त्याचे वर्णन यालाच प्रवास वर्णना ब्लॉग (Travelling Blog) म्हणतात. एखाद्या सहल किंवा प्रावसाची सुरवात करण्यापुर्वी अनेक जण त्या प्रवासासंबधीची माहिती घेत आसतात. त्यांच्यासाठी अशी माहिती ब्लॉगद्वारे उपलब्ध करुन दिली जाते. थोडक्यात या प्रकारचे ब्लॉग हे एका गाईड सारखे काम करतात ज्यामध्ये प्रवासाचा वृतांत दिलेला असतो.

7. गेमिंग ब्लॉग

ऑनलाईन किंवा ऑफलाईन खेळले जाणारे खेळ विषय माहिती जे ब्लॉग देताता त्यास गेमिंग ब्लॉग (Gaming Blog) म्हणतात.

8. पुस्तके व साहित्य

प्रकाशित होणारी अनेक नविन पुस्तके, कादंबरी व कथा-संग्रह यांच्या संबधी माहिती उपलब्ध करुन दिली जाते. साहित्या विषयाची चर्चा, लेखकांचे आणि वाचकाचे मत सारख्या अनेक गोष्ठिंचा (Books and Literature Blog) यामध्ये समावेश असतो.

9. कला व डिजाईन ब्लॉग

कोणत्याही प्रकारची कला किंवा डिजाईन संबधीची माहिती या प्रकारच्या ब्लॉगद्वारा (Art and Design Blog) दिली जाते. एक कलाकार जेव्हा त्याची कला सादर करतो तेव्हा तो त्या कलेसंबधीची अधिक विस्तृत चर्चा यादवारे मांडत असतो. कलाकारांचे मुलाखती, त्यांचे मत, विचार व जिवनप्रवासचे वर्णन देखिल या प्रकारच्या ब्लॉग मध्ये दिलेला असतो.

मोफत ब्लॉगिंगची सुविधा देणारे वेबसाईट

तुम्हाला ब्लॉगची सुरवात करायची आहे का? जर तुमचे उत्तर हो असेल तर सुरवातीला मोफत ब्लॉगिंगची सुविध (Free Blogging Service Platform) देणारे वेबसाईट यांचा वापर कसा करायचा हे पाहु. कारण या ठिकाणी तुमचे बॉलींगचे कैशल्य तपासता येईल. ब्लॉगिंग मधील बारकावे, ब्लॉग कसा लिहतात? ब्लॉग लिहताना कोण-कोणत्या गोष्ठींचा गरज असते? या सर्व घटकांचा पुर्व-अभ्यास (Study) करता येईल. जेणे करुन तुमचे बॉलींगचे कैशल्य तपासता/लक्षात येईल.

1. ब्लॉगर.कॉम – Blogger.com

https://www.blogger.com ही गूगलची ची एक प्रसिद्ध सेवा आहे जी सर्वांना निशुल्क ब्लॉग प्रकाशीत (Blog Publishing) करण्याची सेवा प्रदान करते. पुर्वी ब्लॉगस्पॉट (Blogspot) या नवाने ओळखली जाणारी या सेवेची सुरवात 1999 मध्ये पायरा लॅब (Pyra Lab) केली होती. 2003 मध्ये गूगल ने ही सेवा विकत घेतली आणि ब्लॉगर या नावाने सर्वांना निशुल्क उपलब्ध करून दिली.

ब्लॉगरवर ब्लॉग लिहिणे खूप सोपे आहे कारण ब्लॉग लिहिण्यासाठी कोणतीही प्रोग्रामिंग भाषा (Programming Language) माहित असणे आवश्यक नाही म्हणूनच बहुतेक ब्लॉगर्सना ते आवडते. वेबसाईडचा इंटरफेस अगदी सोपा आहे आणि काही निवडक पर्यायांद्वारे अगदी कमी वेळेमध्ये येथे प्रकाशित करू शकतो. म्हणूनच जर तुम्ही ब्लॉगिंग सुरवात करणार असाल तर ब्लॉगर सेवेचा आवश्य वापर करा.

2. वर्डप्रेस – WordPress

https://wordpress.org वर्डप्रेस ही एक मुक्त स्रोत सामग्री (CMS) व्यवस्थापन प्रणाली आहे, जी वापरकर्त्याला वेबसाइट आणि ब्लॉग तयार करण्याची सेवा प्रदान करते. वर्डप्रेस ब्लॉगिंगची प्रगत प्रणाली मानली जाते. कारण यामध्ये अनेक प्रकारे तुमचे ब्लॉग डिझाइन आणि व्यावस्थापनाची (Management) करण्याची सुविधा देते.

वर्डप्रेस द्वारा अनेक प्रकारचे प्लगइन व थीमस् (Plug-in and Themes) विनामूल्य उपलब्ध केलेले आहेत ज्याचा वापर करून वेबसाइट अधिक सुंदर बनवू शकता. वर्डप्रेस वापरायला खूप सोपे आहे. पण हो काही वेळेस तुम्हाला एचटीएमएल किंवा जावास्क्रिप्ट सारख्या वेब प्रोग्रामिंग आवश्यकता भासु शकते.

3. विक्स.कॉम – wix.com

https://www.wix.com विक्स.कॉम हे एक निशुल्क वेबसाइट बिल्डर टूल (Tool) आहे. ड्रॅग आणि ड्रॉप (Drag & Drop) सारख्या सुविधेचा वापर वेबसाइट तयार करण्यासाठी केला जातो. वेबसाईट किंवा ब्लॉग तयार करण्यासाठी Wix ने अनेक डिझाईन टेम्प्लेट्स (Design Templets) मोफत उपलब्ध करुन दिलेले आहेत. जर तुम्हाला वेबसाइट डिझाइनचे कोणतेही ज्ञान नसेल तर तुम्ही या टेम्प्लेट्स चा वापर करुन सुंदर अश्या ब्लॉगची रचना कमी वेळात करु शकता.

ब्लॉग काय असतो?

ब्लॉग म्हणजे दैनंदिन किंवा विशीष्ट कालावधीमध्ये प्रकाशीत केली जाणारी बेव वरील माहितीचे पाने असतात. तसेच ब्लॉगच्या वेब पानवरील स्वरुपाला ब्लॉग पोस्ट असे म्हणतात.

ब्लॉग किती प्रकारची असतात?

ब्लॉगचे मुख्यत: वयक्तीक ब्लॉग आणि व्यावसायीक ब्लॉग असे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते. लेखक जेव्हा वयक्तीकरित्या एका विषयावरती लिहतो त्याला वयक्तीक ब्लॉग म्हणतात. वस्तू व सेवा संदर्भातील माहिती देणा-या ब्लॉगला व्यावसायीक ब्लॉग असे म्हणतात.

ब्लॉग कोणत्या विषयावरती असु शकतो?

शैक्षणिक ब्लॉग, लाईफ स्टाईल ब्लॉग, फॅशन ब्लॉग, न्युज ब्लॉग, फुड बॉग, फोटोग्राफी ब्लॉग, टेक्नॉलॉजी ब्लॉग, फिटनेस ब्लॉग, ट्रॅव्हल बॉग… अश्या कितीतरी विषयावर ब्लॉग लिहता येतो. ब्लॉगचा विषय या पैकि एखादा विषय निवडुन ब्लॉग लिहता येतो.

कोणत्या प्रकारचे ब्लॉग सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत?

लाईफ स्टाईट ब्लॉग आणि फॅशन ब्लॉग यामध्ये युवांची खास रुची आहे आहे त्यामुळे या प्रकारची ब्लॉग इंटरनेटवर सर्वात जास्त शोधली व वाचली जातात. कारण युवा आणि त्यांच्या जिवन शैली व ट्रेन्ड संबधीत माहिती यामध्ये दिली जाते. इतर अनेक अशी अनेक ब्लॉग आहेत त्यांमध्ये वाचकांची रुची आहे जसे फुड ब्लॉग आणि फिटनेस ब्लॉग!

शेअर करा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *