विंन्डोज 11 – किबोर्ड शॉर्टकट किज्

कि-बोर्ड शॉर्टकट किज् काय असतात?

कॉम्प्युटर मध्ये कमांड, मेंनु आणि इतर अनेक पर्यायांची निवड करण्यासाठी माऊसचा वापर करतात. परंतू काही वेळेस माऊसद्वारे पर्यायांची निवड करण्यासाठी वेळ लागतो, म्हणजेच माऊसद्वारे मेनुची, कमांड आणि पर्यायांची निवड करुन ते माऊसद्वारे क्लिक करावे लागते… त्याऐवजी सरळ किबोर्ड शॉर्टकटद्वारे या वेळखाऊ क्रिया ऐवजी जलद गतिने कमांड आणि पर्यायांची निवड करता यावी यासाठी किबोर्ड शॉर्टकट वापरली जातात.

कमांड किंवा एखादी क्रिया किबोर्ड वरील दोन किंवा तिन किज् संयुक्त पणे एकत्रीत वापरली जाते त्यास कि-बोर्ड शॉर्टकट (Windows Shortcut Keys in Marathi) असे म्हणतात. कि-बोर्ड वरील दोन किंवा तिन किज् एकत्रित पद्धतीने दाबुन त्या साठीच्या क्रिया कार्यान्वीत केल्या जातात.

windows shortcut keys marathi info

कि-बोर्ड शॉर्टकट कश्या पद्धतीने वापरायची असतात?

उदा. एखादे फोल्डर कॉपी करावयाचे असल्यास पहिल्यांदा तो फोल्डर माऊसद्वारे निवडायाचे असतो त्यानंतर कि-बोर्ड वरील “CTRL” कि बाणि “C” कॅरेक्टर एकत्रित दाबायचे असते त्याच्या परीणाम स्वरुप कॉपी कमांडसाठी असणारी क्रिया त्या फोल्डरसाठी लागू होतो. अशीच क्रिया ऍप्लीकेशन मधील निवडलेले टेक्स्ट किंवा ऑब्जेक्ट लागू होते.

विंन्डोज सिस्टीम शॉर्टकट किज् – Windows Shortcut Keys Marathi

किबोर्ड वरील विंन्डाज किजचा वापर सिस्टीम कि म्हणुन केला जातो.

अ.क्र.कमांड‍शॉर्टकट किज्उपयोगऍप्लीकेशन
1.Open Start MenuWin Keyविंन्डोज ऑपरेटिंग सिस्टीमचा स्टार्ट मेनु एक प्रकारचे केंद्र आहे ज्याद्वारे कॉम्प्युटर मधील ऍप्लीकेशन, पर्याय आणि सेटिंग उपलब्ध करुन दिली जातात.डेस्कटॉप
2.RunWin+Rविन्डोज ऍप्लीकेशन किंवा सर्व्हीसेस चालू करण्यासाठी “Run” कमांडचा वापर करतात.डेस्कटॉप
3.File ExplorerWin+Eफाईल व फोल्डरचे व्यावस्थापन करणारे ऍप्लीकेशन “फाईल एक्सप्लोरर” शॉर्टकट पद्धतीने उघडण्यासाठीफाईल एक्सप्लोरर
4.Show or HindWin+Dचालु असलेली सर्व ऍप्लीकेशन टास्कबारवरती मिनीमाईज किंवा मॅक्सीमाईज करण्यासाठी. डेस्कटॉप वरील सर्व विंन्डो शो किंवा हाईंड (दर्शवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी) करण्यासाठीडेस्कटॉप
5.Hind AppWin+Mचालु असलेली सर्व ऍप्लीकेशन टास्कबारवरती हाईंड करण्यासाठीडेस्कटॉप
6.Quick Link MenuWin+Xकॉम्प्युटर मधील महत्वाचे मेनू व कमांडची यादीडेस्कटॉप
7.UtilityWin+Uऑपरेटिंग सिस्टीम मधील महत्वाच्या युटिलीटीज् पर्याय उपलब्ध होतात.विंन्डोज
8.Task ViewWin+Tabचालू असलेले सर्व ऍप्लीकेशन यादी (List) स्वरुपामध्ये डेस्कटॉपवरती पाहण्यासाठीडेस्कटॉप
9.Quick Link Menuकॉम्प्युटर मधील महत्वाचे मेनू व कमांडची यादीडेस्कटॉप
10.Computer SettingWin+Iकॉम्प्युटर संबधीत अनेक प्रकारच्या सुविधा आणि सेटिंग निवडण्यासाठी या शॉर्टकट द्वारे सेटिंग विंन्डो उघडता येतो.विंन्डोज
11.Action CenterWin+Aटास्कबार वरील विंन्डोजचे ऍक्शन सेटिंग पॉप-अप विंन्डोचा वापर करुन महत्वच्या पर्यायांची निवड करु शकता.विंन्डोज
12.Windows SearchWin+S or Qविंन्डोज सर्च पॅनलद्वारे कॉम्प्युटर मधील फाईल, फोल्डर, ऍप्लीकेशन, सेटिंगस्, तसेच ऑनलाईन माहितीचा शोध घेऊ शकता.विंन्डोज सर्च
13.Lock ComputerWin+Lकॉम्प्युटर लॉक करण्यासाठीडेस्कटॉप
14.EmojiWin+
Semicolon (;) or Dot (.)
इमोजी पॅनलविंन्डोज
15.Windows Clipboard BinWin+Vविंन्डोज क्लिपबोर्ड असे घटक आहे ज्या ठिकाणी कॉपी केलेले ऑब्जेक्ट सेव्ह केली जातात. तसेच त्यासंबधी अनेक सुविधा याद्वारे वापरता येतात.विंन्डोज
16.Print ScreenWin+PrtScnचालू असलेल्या ॲप्लीकेशन किंवा डेस्कटॉप विन्डोचा पुर्ण आकारामध्ये असलेले चित्र इमेजच्या स्वरुपामध्ये घेण्यासाठी या शॉर्टकटचा उपयोग होतो.विंन्डोज

बेसिक विंन्डोज शॉर्टकट किज

विंन्डोज डेस्कटॉप, कंट्रोल पॅनल, फाईल एक्सपोरर तसेच विंन्डोजसंबधीत महत्वाच्या किबोर्ड शॉर्टकटचा समावेश “Basic Windows Shortcut Keys” या शिर्षकातंर्गत केलेला आहे.

अ.क्र.कमांड‍शॉर्टकट किज्उपयोगऍप्लीकेशन
1.RebootCtrl+Alt+Delकॉम्प्युटर बंद करुन चालू करणे याला रिबूट असे म्हणतात. या शॉर्टकटचा वापर करुन कॉम्प्युटर बंद करुन परत चालू (Restart) करता येतो. तसेच टास्क मॅनेजर, साईन आऊट सारख्या पर्यायांचा वापर करु शकतो.डेस्कटॉप
2.Close or ExitCtrl+Wडेस्कटॉप स्क्रिनवर असलेले कोणतेही विंन्डो बंद (Close) करण्याकरीताडेस्कटॉप
3.Select AllCtrl+Aसर्व फाईल, फोल्डर निवडण्यासाठी या कमांड शॉर्टकटचा वापर केला जातो.फाईल एक्सप्लोरर
4.Snap WindowsWin+Left Arrow Keyडेस्कटॉच्या डाव्या बाजूस विंन्डो अर्धाजागेवरती (Half Screen Snap) हाफ स्क्रिन घेण्याकरीताडेस्कटॉप
5.Snap WindowsWin+Right Arrow Keyडेस्कटॉच्या उजव्या बाजूस विंन्डो अर्धाजागेवरती (Half Screen Snap) हाफ स्क्रिन घेण्याकरीताडेस्कटॉप
6.Switch ApplicationAlt+Tabएका पेक्षा जास्त चालू (Running) असलेली ऍप्लीकेशन स्विच करुन इतर कोणत्याही ऍप्लीकेशनवरती जाता येते.डेस्कटॉप
7.DeleteDELफाईल किंवा फोल्डर डिलीट करण्यासाठी “DEL” शॉर्टकट कि उपयोगात येते. विंन्डोजमध्ये डिलीट केलेल्या फाईल रिसायकल बिन मध्ये हलवल्या जातात.विंन्डोज
8.DeleteShift+Delनिवडलेले फाईल किंवा फोल्डर रिसायकल बिन मध्ये न हलवता सरळ कॉम्प्युटर (हार्डडिस्क किंवा स्टोरेज साधन) मधुन डिलीट करण्यासाठी या कि-बोर्ड शॉर्टकटचा उपयोग होतो. या पद्धतीने डिलीट केलेली फाईल परत मिळवता येत नाही.विंन्डोज
9.
10.Print ScreenPrint Screenकॉम्प्युटरच्या स्क्रिनवरती चालु असलेले कोणत्याही ऍप्लीकेशनचे किंवा घटकाचे चित्र स्वरुप इमेज “स्क्रिनशॉट” फाईलमध्ये घेण्यासाठी या शॉर्टकटचा उपयोग होतो.डेस्कटॉप
11.Print ScreenAlt+Print Screenडेस्कटॉप किंवा सुरु असलेल्या ऍप्लीकेशनचे स्क्रिनशॉट घेता येते.डेस्कटॉप
12.PropertiesAlt+Enterनिवडलेल्या फाईल किंवा फोल्डरचे प्रॉपर्टीज/वैशिष्ठे पाहण्यासाठी या पर्यायाचा वापर करतात.फाईल एक्सप्लोरर
13.SwitchingAlt+Esडेस्कटॉपवर चालु असलेले ऍप्लीकेशन स्विच करुन एकानंतर एक या अनुक्रमाने पाहण्यासाठीडेस्कटॉप
14.EscapeEscचालू असेलेली कोणतेही क्रिया थांबवण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी याचा वापर हातो.विंन्डोज

विंन्डोज फंक्शन किज (F1-F12) – Shortcut Keys Marathi

नोटपॅट, पेंन्ट, वर्डपॅड सारख्या ऍप्लीकेशन मध्ये वापरली जाणारी बेसिक कि-बोर्ड शॉर्टकट किज् चा समावेश या मध्ये केलेला आहे.

अ.क्र.कमांड‍शॉर्टकट किज्उपयोगऍप्लीकेशन
1.HelpF1विंन्डोज ऑपरेटिंग सिस्टीम किंवा कोणत्याही ऍप्लीकेशन मध्ये मदत (Help) पर्यायाचा वापर करण्यासाठी F1 या फंक्शन किज् चा वापर करतात.सर्व ऍप्लीकेशन
2.RenameF2फाईल किंवा फोल्डरचे नाव बदलण्यासाठी “Rename” कमांड ऐवजी F2 या शॉर्टकटचा वापर करु शकता.फाईल एक्सप्लोरर
3.SearchF3फाईल एक्सप्लोरर मध्ये फाईल फोल्डर शोधण्याठी आणि वेब ब्राऊजर सारख्य ऍप्लीकेशनमध्ये टेक्स्ट शोधण्यासाठीफाईल एक्सप्लोरर आणि ब्राऊजर
4.Shut DownAlt+F4चालू असलेले ऍप्लीकेशन बंद करण्यासाठी तसेच डेस्कटॉप वरती असताना या शॉर्टकट द्वारे कॉम्प्युटर बंद करणे, रिस्टार्ट, लॉग ऑफ… सारखे पर्याय उपलब्ध होतात.सिस्टीम मेनू
5.RefreshF5डेस्कटॉप, फाईल एक्सप्लोरर मधील फाईल व फोल्डर आणि वेब ब्राऊजर रिफ्रेश करता येतात.डेस्कटॉप
6.Active Address BarF6फाईल एक्सप्लोरर आणि वेब ब्राऊजर मधील ॲड्रेस बार ॲक्टीव्ह करण्यासाठी या फंक्शन किजचा वापर होतो.फाईल आणि वेब एक्सप्लोरर
7.Spelling Grammar CheckF7मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऍप्लीकेशन मध्ये याचा वापर खासकरुन ग्रामर आणि स्पेलिंग मध्ये सुधारणा तपासण्यासाठी होतोमायक्रोसॉफ्ट ऑफिस

हे सुद्धा वाचा… फोल्डरचे आयकॉन बदला 3 सोप्या पद्धतीने

बेसिक ऍप्लीकेशन कि-बोर्ड शॉर्टकट किज्

विंन्डोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये समावेश असलेले नोटपॅड, वर्डपॅड, पेंन्ट आणि ब्राऊजर हे बेसिक ऍप्लीकेशन म्हणून ओळखली जातात. बेसिक ऍप्लीकेशन मध्ये असे अनेक कमांड आहेत जे सर्व ऍप्लीकेशन मध्ये एक सारखी आहेत तसेच त्यांच्या शॉर्टकट किज् सुद्धा सारखी आहेत. उदा. न्यु, ओपन, सेव्ह, कट, कॉपी, पेस्ट….सारखी अनेक कमांड जे सर्वच ऍप्लीकेशन वापरली जातात. या आंतर्गत कमांड आणि त्यांच्या शॉर्टकटचा समावेश केलेला आहे.

अ.क्र.कमांड‍शॉर्टकट किज्उपयोगऍप्लीकेशन
1NewCtrl+Nनविन फाईल तयार करणेनोटपॅट, पेंन्ट, वर्डपॅड
2OpenCtrl+Oकॉम्प्युटर मध्ये सेव्ह असलेली फाईल ऍप्लीकेशन मध्ये उघडण्यासाठी या कमांड शॉर्टकटचा उपयोग होतो.ऍप्लीकेशन
3.SaveSave+Sऍप्लीकेशन मध्ये तयार केलेली फाईल कॉम्प्युटर मध्ये साठवण्यासाठी (Save) या कमांडचा उपयोग होतो.ऍप्लीकेशन
4.Save asCtrl+Shft+Sसेव्ह असलेली परंतू ऍप्लीकेशन मध्ये उघडलेल्या फाईलची प्रत इतर नावाने किंवा इतर कोणत्याही लोकेशनवरती साठवण्यासाठी या कमांड शॉर्टकटचा वापर होतो.ऍप्लीकेशन
5.PrintCtrl+Pफाईलची कागदावरती प्रिंन्ट काढण्यासाठी Ctrl+P या शॉर्टकटचा उपयोग होतो.ऍप्लीकेशन
6.ExitCtrl+Wऍप्लीकेशन विंन्डो बंद करण्यासाठी हा पर्याय वापरतात.ऍप्लीकेशन

FAQ’s : सामान्य प्रश्न

शॉर्टकट किज् म्हणजे काय?

कमांड, मेनु किंवा पर्याय माऊसद्वारे निवडण्या ऐवजी किबोर्ड वरील दोन किंवा तिन किज् चा एकत्रीत वापर करुन केला जातो. शॉर्टकट किज् चा वापर सहजा जलद गतिने कमांडच्या क्रिया कार्यान्वित करण्यासाठी केला जातो.

F1 फंक्शन किज् चा वापर कश्यासाठी होता?

ऍप्लीकेशन कसे वापरावे? कमांड, सुचना किंवा मदत सारख्या सोयी वापरण्यासाठी F1 फंक्शन किज् चा उपयोग होता. उदा. नोटपॅड सारख्या ऍप्लीकेशनच्या ॲक्टिव्ह विंन्डो मध्ये असताना F1 किज एकदा दाबल्यानंतर हेल्पसाठीचा विंन्डो उघडला जातो.

फोल्डर आणि फाईल रिनेम करण्यासाठी कोणत्या किबोर्ड शॉर्टकटचा वापर होतो?

किबोर्ड वरली F2 फंक्शन किज् द्वारे फोल्डर किंवा फाईल रिनेम (नाव बदलणे) केली जाते. यासाठी रिनेम करावयाचे फोल्डर किंवा फाईल निवडली जाते त्यानंतर “F2” या फंक्शन किज् चा उपयोग केला जातो.

कॉम्प्युटर बंद करण्यासाठी कोणत्या किबोर्ड शॉर्टकटचा वापर केला जातो?

Alt+F4 या शॉर्टकटचा वापर करुन तुम्ही तुमचा कॉम्प्युटर बंद (Shut Down) करु शकता तसेच रिस्टार्ट, लॉग आफ, स्लिप मोड आणि स्वीच युझर सारख्या पर्यायांची आवश्यकतेनुसार निवड करु शकता.

शेअर करा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *