आज वर्ल्ड वाइड वेब वर असंख्य वेबसाइट्स आहेत ज्या वेगवेगळ्या विषयांवर माहिती देतात. या असंख्य वेबसाईट्स वरून आपल्याला हवी असलेली माहिती कशी शोधायची? असा प्रश्न निर्माण होतो. कोणती वेबसाइट कोणती माहिती प्रदान करते? किंवा ती वेबसाइट कोणत्या विषयावर आहे? अशा प्रश्नांची उत्तरे फक्त “सर्च इंजिन” कडे उपलब्ध असतात.
आज सर्च इंजिन हे एक असे माध्यम आहे, ज्याचा वापर करून संगणक, लॅपटॉप आणि मोबाईल उपकरणे इंटरनेटवर उपलब्ध असलेली सर्व माहिती जाणून घेऊ शकतात. वर्ल्ड वाईड वेबवर सर्च इंजिनच्या साहाय्याने आपण शोधलेल्या माहितीनुसार, शोधाचे परिमाण आणि त्या संदर्भातील सर्व माहिती आपल्यासमोर मांडली जाते.
सर्च इंजिन काय आहे? – Search Engine Marathi Mahiti
संगणक आणि मोबाईल डिजीटल माहितीचे स्त्रोत म्हणून सर्वाधिक वापरले जातात. कोणतेही माहिती शोधण्यासाठी गूगल, बिंग, याहू अश्या कितीतरी संकेतस्थळाचा वापर करतो ज्याला सर्च इंजिन असे म्हणतात.
सर्च इंजिन हा वेब आधारित पुर्णपणे स्वयंचलित संगणक प्रोग्राम आहे. सर्च इंजिन एक प्रकारचे संकेतस्थळ असते जसे वेब वर इतर अनेक वेबसाईट असतात अगदी तसेच. परंतू सर्च इंजिनच्या डेटाबेस आणि सर्व्हर वरती संपुर्ण जगभरातील वेबवर असलेले संकेतस्थळ आणि वेब पृष्ठावर उपलब्ध डेटाची संपुर्ण माहिती आणि त्यांचे स्त्रोत साठवलेली असतात.
सर्च इंजिनचे संकेतस्थळ अशा प्रकारे प्रोग्राम केलेले किंवा डिझाइन केलेले असते की, वापरकर्त्याने विनंती केलेल्या शोध अनुसार विषयाशी सुसंगत माहिती सर्च इंजिनच्या संग्रहीत डेटाबेस मधुन निवडली जाते आणि क्रमनुसार प्रदर्शीत केली जाते. शोध परीणाम मध्ये टेक्स्ट, आर्टीकल, इमेजेस्, व्हिडीओज्, व इतर फाईलच्या स्वरुपात माहिती क्रमवार दिली जाते.
सर्च इंजिन मध्ये आपण जो शोध शब्द प्रविष्ट करतो त्याला संगणकीय भाषेत “कीवर्ड” म्हणतात. कीवर्ड म्हणजे शब्दांचा समूह, हे कीवर्ड खूप महत्त्वाचे असतात कारण संपूर्ण सर्च इंजिनचे कार्य त्यावर अवलंबून असते. कीवर्ड स्वरुपात प्रविष्ट केलेली माहिती काय आहे? ती कशी आणि कोणत्या क्रमाने दाखवायची हे कीवर्ड द्वारे निश्चीत होते.
सर्च इंजिनवर शोधत असलेली कोणतीही माहिती शब्द, संख्या आणि चिन्हांनी बनलेला कीवर्ड असतो. उदाहरणार्थ, समजा आपल्याला “टॉप 10 सर्च इंजिन” शोधायचे आहे. संपूर्ण शब्दांच्या या संग्रहाला की-वर्ड म्हणतात. आणि त्यानुसार सर्च इंजिनमध्ये संग्रहित शब्दांच्या क्रमवारी केलेल्या यादीनुसार परिणाम आम्हाला सादर केले जातात.
सर्च इंजिनची कसे कार्य करते?
1. वेब क्रॉलर
“क्रॉल” प्रणाली वेबसाइट वरील पृष्ठे आणि डेटाबेसमध्ये कोणत्या प्रकारची माहिती संग्रहित आहे ते शोधते. या माहितीमध्ये पृष्ठे किती आहेत, पृष्ठाचे शीर्षक काय आहे, कोणते कीवर्ड वापरले आहेत, कोणत्या विषयाशी संबंधित तपशील, प्रतिमा, ऑडिओ, व्हिडिओ, पृष्ठावर कोणत्या लिंक्स ठेवल्या आहेत इत्यादी समाविष्ट आहे.

थोडक्यात क्रॉल प्रणाली वेब वर असलेल्या प्रत्येक वेबसाईड आणि त्यावरील प्रत्येक वेब पृष्ठांची माहिती गोळा करते किंवा शोधते. माहिती शोधण्याच्या प्रक्रियेला “क्रॉलिंग” म्हणतात. क्रॉलरद्वारे गोळा केलेली माहिती एका विशिष्ट क्रमाने सूचीबद्ध केली जाते. काही क्रॉलर्स वेबसाइटवर तयार केलेल्या पृष्ठाच्या कॅशे कॉपी देखील तयार करतात म्हणजेच ते उप-पृष्ठाच्या स्वरूपाची प्रत संग्रहित करतात.
2. इन्डेक्सींग
सर्च इंजिनच्या शोधात बॉट्सने शोधलेली आणि क्रॉल केलेली वेबपेजेस दाखवायची की नाही हे ठरवते, दाखवायचे असेल तर ते कोणत्या क्रमाने दाखवायचे हेही ठरवते. या प्रक्रियेला अनुक्रमणिका म्हणजेच इन्डेक्सींग असे म्हणतात. अनुक्रमणिके मध्ये पृष्ठ दुवे, शीर्षके आणि वर्णन समाविष्ट असतात.
सर्च इंजिन पृष्ठ अनुक्रमणिकेवर अवलंबून असतात आणि त्यानुसार शोधावर कार्य करतात. म्हणूनच कोणत्याही वेबसाइटचे पृष्ठ योग्यरित्या अनुक्रमित केलेले असणे आवश्यक आहे, ज्याचे सर्च परिणाम योग्यरित्या आणि शोधानुसार प्रदान केले जातात.
वेबसाइटवर प्रदान केलेल्या पृष्ठाची इन्डेक्सींग म्हणजेच अनुक्रमणिका महत्त्वपूर्ण आहे. यावरून त्या वेबसाइटमध्ये किती पेजेस आहेत, त्या पेजेसचा विषय काय आहे, त्यात कोणती माहिती समाविष्ट आहे हे कळते.
3. रॅकिंग
सर्च इंजिनच्या शोधात बॉट्सने शोधलेली आणि क्रॉल केलेली वेबपेजेस प्रदर्शीत करावयाची की नाही, कोणत्या क्रमांने, कोणत्या ठिकाणी दाखवायचे हेही ठरवते. या प्रक्रियेला रॅकिंग असे म्हणतात. रॅकिंग मध्ये पृष्ठ दुवे, शीर्षके आणि वर्णन समाविष्ट असतात.
थोडक्यात क्रॉल आणि इन्डेक्सींग झालेली माहिती सर्च इंजिनच्या वेबपेजवरती कोणत्या क्रमाने प्रदर्शीत करायची रॅकिंग प्रणालीद्वारे निश्चीत केली जाते.
📜 प्रचलित ब्लॉग
🏆 प्रश्नसंच
सर्च इंजिन द्वारे पेज रँकिंग कसे ठरवले जाते?
अल्गोरिदम हा एक पॅरामीटर आहे जो सर्च परिणामांमध्ये वेबसाइट आणि वेबपृष्ठांवर प्रदान केलेली माहिती कशी प्रदर्शित करायची हे निर्धारित करते. “इंडेक्स” ही अशी पद्धत आहे जी कोणत्याही वेबसाइटचा क्रम आणि रँक ठरवते.
सर्च इंजिनचे घटक
संपूर्ण इंजिनचे कार्य अनेक घटकांवरती अवलंबून असते. प्रत्येक घटक संबधीत कार्य पुर्ण करुन माहिती पुढच्या प्रक्रियेसाठी अग्रेषित करत असतो.
अ.क्र. | सर्च इंजिनचे घटक | कार्य |
---|---|---|
1 | वेब क्राऊलर | स्वंयचलीत प्रोग्राम किंवा बॉटस् यांना क्राऊलर म्हणतात. सर्च इंजिनसाठी वेब वरील माहिती एकत्र करतात. |
2 | इंडेक्सर | इंडेक्सर बॉटस् द्वारे एकत्र केलेल्या माहितीचे विश्लेषन करतात. माहितीच्या विषय आणि दर्जे नुसार इंडेक्स म्हणजेच अनुक्रम तयार करतात. |
3 | डेटाबेस | बॉटस् द्वारे शोधलेली माहिती व्यावस्थित, विषयानुसार आणि क्रमवार पद्धीतीने ज्या ठिकाणी संग्रह केली जाते त्याला सर्च इंजिनच्या डेटाबेस असे म्हणतात. सर्च परीणाम डेटाबेस मध्ये असलेल्या माहितीनुसार प्रदर्शीत केली जातात. |
4 | रॅकिंग | वेबसाईट आणि वेबपेजेस सर्च परीणामामध्ये कोणत्या स्थाना किंवा क्रमांकावर दर्शवले जावे ते रँकिंग द्वारे निश्चीत होत. रॅकिंग अग्लोरिदम अनेक घटकांसह वेबपेज रँक करण्यामध्ये महत्वाची भुमीका बजावत असतो. |
5 | सर्च इंटरफेस | वेब क्राऊलर, इंडेक्सर, डेटाबेस आणि रॅकिंग या सर्व घटकांचे एकत्र स्वरुप म्हणजेच सर्च इंटरफेस जे वेबसाईटच्या दृश्य स्वरुपात असतो. ज्यामध्ये माहिती शोधली जाते. उदा. google.com, bing.com, yahoo.com … |
सर्च इंजिन मध्ये आपण जो शोध शब्द प्रविष्ट करतो त्याला संगणकीय भाषेत “कीवर्ड” म्हणतात. कीवर्ड म्हणजे शब्दांचा समूह, हे कीवर्ड खूप महत्त्वाचे असतात कारण संपूर्ण सर्च इंजिनचे कार्य कीवर्ड अवलंबून असते. कीवर्ड स्वरुपात प्रविष्ट केलेली माहिती काय आहे? ती कशी आणि कोणत्या क्रमाने दाखवायची हे कीवर्ड द्वारे निश्चीत होते.
सर्च इंजिनवर शोधत असलेली कोणतीही माहिती शब्द, संख्या आणि चिन्हांनी बनलेला कीवर्ड असतो. उदाहरणार्थ, समजा आपल्याला “टॉप 10 सर्च इंजिन” शोधायचे आहे. संपूर्ण शब्दांच्या या संग्रहाला की-वर्ड म्हणतात. आणि त्यानुसार सर्च इंजिनमध्ये संग्रहित शब्दांच्या क्रमवारी केलेल्या यादीनुसार परिणाम आम्हाला सादर केले जातात.
5 प्रसिद्ध सर्च इंजिन
1. गूगल
जगामध्ये शोधसाठी google.com सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. अचुक आणि जलद गतीने परीणाम प्रदर्शीत करणे गूगल सर्च इंजिनचे महत्वाचे वैशिट्ये आहे.
2. बिंग सर्च
मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर निर्माता कंपनीचे bing.com सर्च इजिन प्रचलित आहे. ईमेल, ब्राऊजर, क्लाऊड स्टोरज आणि ऑफिस सुट असे अनेक सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
3. याहू
yahoo.com सर्च इंजिन सेवेसह इमेल, न्युज, फायनान्स सारख्या इतर अनेक सुविधा उपलब्ध करुन देतो. सद्यस्थितीमध्ये मायकोसॉफ्ट बिंग सर्च इंजिन आधारीत तंत्रज्ञान वापरतो.
4. डक डक गो
प्रायव्हसी महत्वाची असणार्या वापरकत्यांसाठी duckduckgo.com एक उत्तम सर्च इंजिन आहे. या सर्च इंजिन मध्ये वापरकत्याची कोणत्याही प्रकारची माहिती संकलित केली जात नाही.
5. यांडेक्स
yandex.com रुस देशाचे प्रचलित सर्च इंजिन आहे. इमेल, मॅप्स, ट्रान्सलेट इ. अनेक सेवा या सर्च इंजिनद्वारे प्रदान केली जातात.
आपण काय शिकलात?
वेब वर असलेली माहिती शोधणे, माहितीचे खंड तयार करणे, अनुक्रम ठरवणे आणि वापरकत्याने विनंती केलेल्या शोध साठी माहितीचे परीणाम उपलब्ध करुन देणे सर्च इंजिनचे प्राथमिक कार्य आहे. सर्च इंजिन वेबसाईट वरती माहिती शोधण्याकरीता किवर्ड प्रविष्ट करणे आवश्यक असते ज्याचे स्वरुप अंक, अक्षरे आणि चिन्हांच्या स्वरुपात असते.
सर्च इंजिन हा वेब आधारित स्वयंचलित प्रोग्राम आहे. क्रॉल, इन्डेक्सींग आणि रॅकिंग आधारे सर्च इंजिन माहिती स्त्रोतांचे संकलन, अनुक्रम आणि शोध परीणाम प्रदर्शीत करतो. अल्गोरिदम योग्य आणि अचुक माहिती प्रस्तुत करण्याचे कार्य करतात. धन्यवाद.