संगणक कसे कार्य करते?

संगणकाचे हे अनेक स्तरावर कार्य करते यामध्ये संगणकाला माहीती देणे व प्रक्रिया केलेली माहीती मिळवणे इतकेच कार्य महत्त्वाची असतात असे नही. संगणक कोणत्या स्तरावर कोणते कार्य करतो तसेच वापरकर्ता म्हणुन आपण संगणकाचा कसा वापर करतो हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. संगणक कसे कार्य करते? याची माहीत आपण या प्रकरणात पाहणार आहोत तर चला सुरवात करुया…

संगणक कसे कार्य करते? – Computer Works Marathi Mahiti

संगणकाची कार्यपद्धतीची विभागणी व हताळणी संगणकाचा सि.पि.यु. म्हणजेच सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिट (C.P.U. – Central Processing Unit) द्वारे केली जाते. वापरकर्त्याने इनपुट डिव्हाईस द्वारे दिलेला कच्च्या माहितीच्या स्वरूपातील डेटा वर संगणकाचा सि.पि.यु. हा विभाग प्रक्रिया (Process) करून हवे तसे परीणाम (Result) आऊटपुट डिव्हाईसद्वारे प्रक्रिया केलेली माहीतीच्या (Information) स्वरूपात देतो.

संगणकाचे पुर्ण कार्य इनपूट, प्रोसेस व आऊटपूट या तिन स्तरावर चालते. युझरने म्हणजेच वापरकर्त्याने डेटा हा इनपूट डिव्हाईस द्वारे दिल्यानंतर संगणका मधील सि.पि.यु. त्या डेटावर प्रक्रिया करून आपणास हवा तसा निष्कर्ष देतो. थोडक्यात संगणका दिलेली माहीती स्वता:च्या भाषेत रुपांतर करतो व आपणास समजेल अशी माहिती आऊटपूट डिव्हाईसद्वारे आपणास पुरवतो.

उदा. आपणास एखादे प्रश्न विचारल्यास तो प्रश्न आपण समजुन घेतो पुन्हा त्या प्रश्नावर विचार करतो . आणि त्या प्रश्नाचे उत्तर देतो अगदी तशीच क्रिया संगणकाच्या बाबतीत देखील घडते.

संगणकाचा इतिहास | Computer History Marathi Mahiti

संगणकाची कार्यपद्धती – How Work Computer System?

1. डेटा (Data)

कच्ची माहिती (Raw Information) किंवा मसुदा म्हणजे डेटा होय. जो वापरकर्ता इनपुट डिव्हाईस द्वारे संगणकाला देत असतो. डेटा मध्ये वेगवेगळी अक्षरे, अंक व चिन्हांचा प्रक्रिया न केलेला बांबीचा समावेश होतो. संगणकाने कश्या व कोणत्या पध्दतीने कार्य करावे यासाठी ज्या सुचना देण्यात येतात त्याचाही समावेश डेटा मध्ये होतो.

संगणका मध्ये वापरत असलेल्या सिस्टिम व ऍ़प्लिकेशन सॉफ्टवेअर मधील उदा. न्यु, प्रिंट, सेव्ह, डिलीट … सारख्या विविध सुचनांचे पालन/वापर करतो या दिलेल्या कमांड किंवा सुचनांना देखिल आपण डेटा म्हणू शकतो. हा डेटा माऊस, कि-बोर्ड, स्कॅनर, मायक्रोफोन सारख्या इनपूट डिव्हाईस द्वारे संगणकाला देत असतो.

डेटाचे प्रकार – Types of Data Marathi Mahiti

⦁ अल्फाबेटिकल डेटा (Alphabetical Data)
संगणकाला फक्त शब्दांच्या (Alphabetical) स्वरूपात जो डेटा दिला जातो त्याला अल्फाबेटिकल डेटा म्हणतात. यात 26 अल्फाबेट चा वापर करण्यात येतो. या मध्ये कॅपिटल व स्मॉल अश्या अल्फाबेटचा समावेश असते. ते A-Z, a-z

⦁ स्पेशल कॅरेक्टर (Special Character )
स्पेशल कॅरेक्टर (Special Character) हे सुद्धा अल्फाबेटिकल डेटा (Alphabetical Data) मध्ये गणले जातात. यात काही खास चिन्हांचा वापर करण्यात येतो. जसे !,#,$,%,&,*…..etc आणि याचा वापर खास हेतूसाठी करण्यात येतो.

⦁ न्युम्यारीक डेटा (Numeric Data)
0-9 आणि 10 अंकाचा (Number or Digit) वापर संगणका मध्ये करण्यात येतो. त्याला नंबर (Number) देखिल म्हणतात. या नंबर किंवा अंकाना न्युम्यारीक डेटा (Numeric Data) असे म्हणतात. उदा. 12, 01, 125, 89575…..etc

⦁ अल्फान्युम्यारीक डेटा (Alphanumeric Data)
अल्फाबेट (Alphabet) आणि नंबरचा (Number) या दोन विभिन्न डेटाचे मिश्रण म्हणजे अल्फान्युम्यारीक डेटा होय. उदा. A2, ab+2b=5…etc

2. इनपूट (Input)

वापरकर्त्याकडून संगणकाला जो डेटा किंवा सुचना दिली जाते त्याला इनपूट असे म्हणतात. संगणकाला इनपूट देण्यासाठी आपण ज्या डिव्हाईस चा वापर करतो त्याला इनपूट डिव्हाईस असे म्हणतात. उदा. कि-बोर्ड, माऊस, स्कॅनर…

3. प्रासेस (Process)

इनपूट डिव्हाईसद्वारे संगणकाला जो डेटा दिला जातो त्या डेटा वर संगणकाचा एक भाग म्हणुन कार्य करणा-या सि.पि.यु. म्हणजेच सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिट (C.P.U. – Central Processing Unit) हा भाग जो क्रिया किंवा कार्य करतो त्याला प्रोसेस किंवा प्रक्रिया असे म्हणतात.

संगणकाला दिलेल्या डेटा वर संगणक प्रक्रिया करून अंतिम आऊटपुट देत असतो. थोडक्यात इनपूट डिव्हाईसद्वारे द्वारे मिळालेली माहिती व सुचनांच्या स्वरूपानुसार त्यावर प्रक्रिया करणे जेणेकरून वापरकर्त्यास हवे असणारे आऊटपुट मिळावे.

प्रोसेसिंग युनिटचे विभाग

  • कंट्रोल युनिट
  • ए.एल.यु.
  • मेमरी युनिट

4. आऊटपुट (Output)

संगणकाला इनपूट दिल्यानंतर संगणकालाचा सि.पि.यु. म्हणजेच सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिट हा भाग त्या डेटा वर प्रक्रिया करतो व जी माहिती आपणास देतो त्याला आऊटपुट असे म्हणतात. संगणक आऊटपुट देण्यासाठी मॉनिटर, प्रिंटर सारख्या साधनांचा उपयोग करतो त्या साधनांना आऊटपुट डिव्हाईस असे म्हणतात.

संगणक दोन प्रकारामध्ये आऊटपुट देतो. 1. सॉफ्ट आऊटपूट 2. हार्ड आऊटपूट

1. सॉफ्ट आऊटपूट : Soft Output
मॉनिटर/स्क्रिन (Monitor/Screen) वर जो आऊटपूट दिला जातो त्याला सॉफ्ट आऊटपूट असे म्हणतात. तसेच फ्लॉपी, सि.डी., डिव्हिडी द्वारे दिल्या जाणाऱ्या आऊटपूटला देखिल सॉफ्ट आऊटपूट म्हणतात.

2. हार्ड आऊटपूट : Hard Output
जो आऊटपूट प्रिंटर द्वारे पेजवर प्रिंन्टींगच्या (Printing) स्वरुपात दिला जातो. त्यास हार्ड आऊटपूट असे म्हणतात.

5. माहिती/इंफॉरमेशन (Information)

वापरकर्त्याकडून कडून इनपूट मिळाल्यानंतर सि.पी.यु. त्या भागावर प्रक्रिया करून जो अंतिम आऊटपुट (Final Output) देतो त्यास माहिती किंवा इंन्फॉरमेशन असे म्हणतात.

माहिती यंत्रनेचे घटक

माहिती यंत्रनेचे (Information System) महत्त्व आणि विस्तारामुळे विविध कार्य आणि पर्यायाशी वापरकर्त्याला जोडण्याचे कार्य संगणक करत असतो. संगणकाचा विचार केला तर यासाठी विशिष्ठ अश्या माहिती यंत्रनेने जोडलेले आहे. आणि या यंत्रणा संगणक वापरण्यास व हताळण्यास मदत करत असते.

माहिती यंत्रणेचे एकूण पाच घटक किंवा पाच भागात विभागणी करण्यात आलेली आहे. वापरकर्ता किंवा संगणकाचा वापरकरणारे लोक, पध्दती, सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि डेटा. माहिती यंत्रणेमध्ये वापरकर्ता म्हणजेच युझर जो संगणक हताळत असतो, तो हार्डवेअरद्वारे सॉफ्टवेअरच्या मदतीने सॉफ्टवेअर व हार्डवेअर वापरावयाच्यापध्दती च्या नुसार डेटा संगणकाला देत असतो.

संगणकाला डेटा देण्यासाठी वापरकर्ता हार्डवेअर तसेच वेगवगळया ऍ़प्लिकेशनचा वापर करतो आणि त्या ऍ़प्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर करून वापरकर्ता हवा तसा निष्कर्ष मिळवत असतो. माहिती यंत्रणेमध्ये पाच घटकांमधील एकही घटकांची कमतरता पुर्ण माहीती यंत्रणेला प्रभावीत करत असते. त्यामुळे माहीती यंत्रणेचे हे पाचही घटक महत्त्वाचे आहेत.

1. वापरकर्ता – User

युझर म्हणजेच वापरकर्ता हे माहीती यंत्रणेचा महत्त्वपुर्ण घटक आहे. मायक्रोकॉम्प्यूटरचा विचार करता अनेक वापरकर्ते आपल्या उपयोगिते नुसार संगणकाचा वापर करत असतात. व स्वता:च्या कार्याला व गुणवत्तेला अधिकाधिक परीपुर्णता देत असतात.

2. पद्धती – Manual

संगणक हताळण्याचे म्हणजेच त्यातील सॉफ्टवेअर्स व हार्डवअरच्या वापरासंबंधीच्या काही नियम व पध्दती असतात. पध्दती द्वारे वापरकर्ता सॉफ्टवेअर्स व हार्डवअर वापरण्यासबंधी मार्गदर्शन मिळवत असतात. सॉफ्टवेअर्स व हार्डवअरच्या उत्पादकांकडून किंवा विशेषज्ञाकडुन त्या खास प्रकारे लिहलेल्या असतात. युझर मॅन्युअल किंवा वापरासंबधीच्या पध्दती प्रिंन्टेड स्वरुपात अथवा इलेक्ट्रॉनिक स्वरुपात उपलब्ध असतात.

3. सॉफ्टवेअर – Software

सॉफ्टवेअर युझरला सुविधा म्हणजेच रिर्सोस उपलब्ध करुन देत असतात. सॉफ्टवेअरच्या मदतीने युझर म्हणजेच वापरकर्ता संगणक वापरत असतो. सॉफ्टवेअर प्रक्रिया न केलेला डेटा माहितीमध्ये रुपांतरी करत असतात. यामध्ये वेगवेगळ्यासिस्टिम व ऍ़प्लिकेशन सॉफ्टवेअरचा समावेश असतो.

डेटा व सुचना वर प्रक्रिया करण्यासाठी आणि हार्डवेअरचे नियंत्रण व व्यावस्थापनासाठी सॉफ्टवेअर आवश्यक असतात. यामध्ये सिस्टिम सॉफ्टवेअर व ऑपरेटिंग सिस्टिम महत्त्वाची असतात. डेटाचे रुपांतर फायनल आऊटपुट (Result) मध्ये देण्याचे कार्य सॉफ्टवेअर्स करत असतात. उदा. वर्ड प्रोसेसिंग, प्रझेंन्टेशन, डेटाबेस सारख्या सुविधेसाठी युझर मायक्रोसॉफ्ट ऑफिस या सॉफ्टवेअर पॅकेजचा वापर करतो.

4. हार्डवेअर – Hardware

माहिती यंत्रणेचे हार्डवेअर हे एक महत्त्वाचे असे वैशिष्ट्ये आहे. संगणक हा विविध हार्डवेअर चा संच असतो. उदा. वापरकर्ता डेटा एन्ट्रीसाठी कि-बोर्ड व माऊस सारख्या इनपुट डिव्हाईसचा चा वापर करतो तसेच डेटावर प्रक्रिया करण्यासाठी सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिट चा उपयोग केला जातो, प्रक्रिया केलेल्या माहीती दर्शवण्यासाठी मॉनिटर व प्रिंन्टरसारख्या हार्डवेअरचा उपयोग होतो. डेटा स्विकरणे, त्याचे माहितीमध्ये रूपांतर करणे आणि ति माहीती वापरकर्त्या समोर सादर करणे यासारखी महत्त्वाचे कार्य कॉम्प्यटरच्या वेगवेगळ्या हार्डवेअरकडुन केली जातात.

माऊस, कि-बोर्ड, मॉनिटर, सिस्टिम युनिट, आणि इतर उपकरणांचा समावेश हार्डवेअर मध्ये होत असतो. वेगवेगळया हार्डवेअरचे कार्य हे वेगवेगळे असतात. वापरकर्त्याकडून व सॉफ्टवेअर द्वारे हार्डवेअर नियंत्रित केली जातात.

5. डेटा – Data

कच्ची माहीती किंवा मसुदा किंवा प्रक्रिया न केलेली माहीती म्हणजे “डेटा” होय. संगणक इनपुट डिव्हाईस च्या मदतीन डेटा स्विकारत असतो. व संगणकाने प्रक्रिया केलेला डेटा/माहीती आऊटपुट डिव्हाईसद्वारे देत असतो.

शेअर करा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *