ब्लॉगर.कॉम काय आहे?

Blogger.com गूगलची ब्लॉग प्रकाशीत करण्याची सुविधा प्रदान करणारी एक प्रसिद्ध सेवा आहे. 1999 मध्ये मध्ये पायरा लॅबने (Pyra Labs) या सेवेची सुरवात केली नंतर 2003 मध्ये गूगलने या सेवेचे अधिग्रहन केल. ब्लॉगर विनामूल्य ब्लॉग प्रकाशित करण्याची सुविधा देते. होस्टिंग आणि डोमेन सारख्या सुविधा ब्लॉगर मार्फत निशुल्क उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. या संकेतस्थळाचा उद्देश सामान्यत: वाचकांना रुची असणारे विषय ब्लॉग पोस्टच्या माध्यमाने सामायिक करता येतात.

जर तुम्ही एखाद्या विषयावर ब्लॉग प्रकाशित करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही blogger.com एक योग्य पर्याय आहे ज्याठिकणी तुमचा ब्लॉग विनामूल्य प्रकाशित करू शकता आणि याच्या मदतीने तुमचे विषय वाचकांच्या आवडीनुसार ब्लॉग पोस्टच्या माध्यमाने प्रकाशित करू शकता.

ब्लॉगिंगच्या श्रृखंले मधील मालिकेतील “ब्लॉग – ब्लॉगिंग म्हणजे काय?” भाग 1 आणि “ब्लॉग पोस्ट कसे लिहावे?” भाग 2 वाचला असेल, तर तुम्हाला ब्लॉगिंगचा हा तिसरा भाग “Blogger.com Marathi Guide” समजण्यास सोपे जाईल. तुम्हाला ब्लॉग संबधी सर्व प्राथमीक माहिती यामध्ये वितृत पणे दिलेली आहे.

what is blogger.com marathi

Blogger.com ब्लॉगिंग साठी सर्वाधिक का वापरले जाते?

ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हण्टले कि आपल्या समोर सर्वप्रथम Blogger.com याच संकेतस्थळाचे नाव येते. वापरकर्त्यांना अगदी सहतेने वापरता येणारे ब्लॉगिंग व्यासपीठ म्हणुन खुप प्रचलित व प्रिसिद्ध झाले. ब्लॉगर मार्फत अनेक सुविधा निशुल्क उपलब्ध करुन दिल्या जातात त्यामुळे ब्लॉगर किंवा जे ब्लॉगिंग सारख्या क्षेत्रात नवीन आहेत ते सर्वप्रथम येथुनच सुरवात करतात.

कोणतीही वेबसाइट तयार करण्यासाठी Java, HTML, आणि CSS सारखी प्रोग्रामिंग भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असते, परंतु blogger.com वर ब्लॉग वेबसाइट तयार करण्यासाठी तुम्हाला यापैकी कोणत्याही प्रोग्रामिंग भाषेचे ज्ञान असणे आवश्यक नाही. ब्लॉगर सर्वसाधारण इंटरफेस असलेले आणि वापरकत्यासाठी सहजतेने वापरता येणारे CMS “कंटेट मॅनेजमेंट सिस्टीम” संकेतस्थळ आहे. यासाठी तुम्हाला संगणक आणि इंटरनेटचे थोडेसे ज्ञान आवश्यक आहे.

ब्लॉगर.कॉम चि वैशिष्ट्ये | Feature of Blogger.com Marathi

1. डिव्हाईस फ्रेन्डली – ब्लॉगर संकेतस्थळ च्या आधारे लॅपटॉप किंवा संगणका वर ज्या पद्धतीने ब्लॉग लिहता येते अगदी त्याप्रमाणेच मोबाईल वर सहजतेने ब्लॉग लिहता येते. यासाठी फक्त मोबाईल आणि त्यामध्ये इंटरनेट असणे गरजेचे आहे.

2. पुर्ण पणे निशुल्क: ब्लॉगिंग सेवा प्रदान करते – ब्लॉग प्रकाशित करण्यासाठी यामध्ये कोणतेही शुल्क आकारले जात नाहीत. यामध्ये होस्टिंग, डोमेंन आणि सुरक्षा असे अनेक वैशिष्ट्ये अगदी निशुल्क पणे वापरता येतात. वापरकर्ता त्याची इच्छा असेपर्यंत या सुविधेचा वापर करु शकतो.

3. वापरण्यासाठी सोपे आहे – ब्लॉग वेबसाईड बनवण्याकरीत काही प्रमाणात एच.टि.एम.एल. किंवा जावा, आणि सि.एस.एस. सारख्या प्रोगामिंग भाषेचे ज्ञान असणे जरुरी असते. परंतू Blooger.com वापरताना यापैकिं किंवा कोणत्याही प्रकारच्या प्रोगामिंग लॅग्वेज येणे आवश्यक नाही. अगदी संगणक व इंटरनेट वापरण्याचे ज्ञान पुरेसे आहे.

4. कस्टम डोमेन वापरण्याची सुविधा देते – ब्लॉगर वरती ब्लॉग तयार करताना यु.आर.एल. म्हणजेच तुमच्या वेबसाईडचा पत्ता हा मुळ डोमेन चा सब डोमेंन असतो. Blogger.com वरती तुम्ही जेव्हा एखादा ब्लॉग तयार करता तेव्हा तुम्हाला ब्लॉगर द्वारे त्याचा सबडोमेन निवडावा लागतो. उदा. itworldmarathi.blogger.com असा तुमचा ब्लॉगर वेबसाईडचा असतो.

तुम्ही एखादे डोमेन नेम खरेदी केले असेत तेव्हा ब्लॉगरच्या सब-डोमेन नेम ऐवजी तुमचा स्वता:चा डोमेन या ठिकाणी जोडु शकतो. उदा. itworldmarathi.blogger.com या ऐवजी theitworld.in असा कस्टम डोमेन निवडण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. थोडक्यात ब्लॉगरच्या सबडोमेन नेम ऐवजी तुमचा स्वता:चे डोमेन नेम या ठिकाणी जोडु शकतो.

5. गूगलच्या इतर सेवा यासह वापरता येतात – गूगल डॉक, गूगल फॉर्म, ॲनालिटीक, सर्च कंन्सोल, ॲडसेन्स … सारख्या अनेक गूगलच्या सेवा सहजतेने तुमच्या ब्लॉगशी जोडु शकतो. गूगलच्या एकाच इमेल आयडी द्वारे गूगलद्वारे दिल्या जाणा-या सर्व सेवा तुमच्या ब्लॉगर वेबसाईड वरती वापरता येतात.

6. सुरक्षित आणि लवचिक – वेबसाईड हॅक होणे, सर्वर डाऊन होणे सारख्या समस्या सहसा होत नाहीत कारणे हे सर्व गूगलच्या सुरक्षेत असते. तसेच SSL सुरक्षा सारखे वैशिष्ट्ये निशुल्क प्रदान करते. SSL प्रमाणपत्र HTTPS स्वरुपामध्ये एनक्रिप्टेड माहितीची देवाणघेवाण करण्यास अनुमती देते जे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे

7. ऍडसेन्स द्वारे पैसे कमवण्याचे साधन – ऍडसेन्स गूगलची जाहिरात सेवा आहे. या सेवा आंतर्गत गूगल तुमच्या ब्लॉग वर जाहिरात प्रदर्शीत करुन तुम्हाला ऍडसेन्स सुविधे अंतर्गत पैसे कमविण्याची संधी देते.

8. जलद गतिने ब्लॉग पब्लीश करु शकता – वेबसाईडचा इंटरफेस अगदी सोपा आहे आणि काही निवडक पर्यायांद्वारे अगदी कमी वेळेमध्ये येथे ब्लॉग प्रकाशित करू शकतो. म्हणूनच जर तुम्ही ब्लॉगिंग सुरवात करणार असाल तर ब्लॉगर सेवेचा आवश्य वापर करा कारण हे वापरण्यास अगदी सोपे आहे.

9. गूगल सर्च वरती लवकर इन्डेक्स होतो – ब्लॉगर वर प्रकाशीत होणारे ब्लॉग गूगल सर्च मध्ये लवकर इन्डेक्स होतो. चांगली माहिती असणारे प्रभावशाली ब्लॉग प्राथमिकतेने आणि जलद सुर्च सुचिमध्ये दर्शवले जाते.

10. सुटसुटितपणे पर्यायांचा वापर – ब्लॉग पब्लीश करण्यासाठी किचकट पर्यांयाचा यामध्ये समावेश नाही. त्यामुळे अगदी सहजतेने काही मोजक्या पर्यायांचा वापर करुन ब्लॉग प्रकाशीत करता येतो. ब्लॉगरचे पोस्ट एडिटर वापरण्यास अगदी सोपे आहे. नवीन पोस्ट तयार करणे, त्यामध्ये बदल करणे किंवा आर्टिकलची कोणतेही माहिती सहजतेने बदला येते.

ब्लॉगर वापरण्यात येणारी मर्यादा

1. ब्लॉग डिझाईन करण्यासाठी मर्यादित पर्याय – प्रगत ब्लॉगिंग वेबसाईड जसे वर्डप्रेसच्या तुलनेत ब्लॉगर मध्ये ब्लॉग डिझाईनसाठी मर्यादीत पर्याय उपलब्ध आहेत. वर्डप्रेस मध्ये अनके थिमस् आणि प्लगइन्स् चा वापर करुन ब्लॉगला आकर्षक रुप देता येते. परंतु ब्लॉगर मध्ये ब्लॉगची मांडणी किंवा रचना करण्यासाठी थिमस् किंवा प्लगइन्स् सारखे पर्याय उपलब्ध नाहीत.

2. संपुर्णपणे गूगलचे नियंत्रण – ब्लॉगर वर तयार होणारे सर्व संकेतस्थळ गूगलच्या नियम व अटींच्या अनुसार वापरावे लागते. एखादे नियम किंवा अटी भंग होणाच्या स्थितीमध्ये गूगल तुमचे ब्लॉगर संकेतस्थळ रद्द करु शकतो.

3. इतर आवश्यक सोयिसाठी प्लग-इन वापरता येत नाहित – एखादे नवीन वैशिष्ट्ये किंवा सुविधा वापरयाची असेल तर ते वापरता येत नाही. ब्लॉगर वरती उपलब्ध असलेल्याच परंतु मर्यादित सोई वापरता येतात.

4. अपडेटेड नसेलेले ब्लॉग वर ट्रॅफिक कमी येते – ब्लॉगर वरती असलेल्या ब्लॉग वर सतत माहिती प्रकाशीत होणे गरजेचे असते. ज्या ब्लॉग वर सतत किंवा ठराविक काळाच्या अंतराने माहिती प्रकाशीत केली जाते अशी ब्लॉग ॲक्टीव ब्लॉगच्या श्रेणित येतात. असे ॲक्टीव ब्लॉग गूगल सर्च सुचिमध्ये प्रदर्शीत होतात. परंतू अपडेटेड किंवा ॲक्टीव नसलेले ब्लॉग गूगलच्या सर्च परीणामामध्ये दर्शवले जात नाहित त्याच्याच परीणाम म्हणजे अश्या ब्लॉग संकेतस्थळा वर गूगलद्वारे ट्रॅफिक कमी येते.

5. मर्यादित थिम उपलब्ध आहेत – ब्लॉगचे दर्शमान स्वरुप म्हणजेच त्या ब्लॉगचे टेम्पलेट किंवा थिम होय. ब्लॉगचे प्रत्येक भाग व माहिती यांची रचना ब्लॉगर द्वारे उपलब्ध होणा-या थिम अनुसार असते त्या मध्ये बदल करण्याचे किंवा आपल्या आवडीनुसार डिझाईन करण्याचे पर्याय मर्यादित आहेत.

शेअर करा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *